करोनाला हरवण्याची कल्पना सुचवणाऱ्याला ४२ लाख इनाम!!- Fight Corona IDEAthon
Fight Corona IDEAthon असं या आयडियाथॉनचं नाव आहे. हे एक ओपन चॅलेंजच आहे म्हणा ना. एआयसीटीई म्हणजेच ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी एकत्रितपणे हे चॅलेंज सुरू केलं आहे. करोनावर मात करण्याची कल्पना सुचवा आणि इनाम जिंका!!
करोना व्हायरसपुढे अख्ख्या जगाने गुडघे टेकले आहेत. भारत लॉकडाऊन स्थितीत आहे. भारतासह संपू्र्ण जग या महामारीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, भारतात केंद्र सरकारकडून देशवासियांना एक आवाहन करण्यात आलं आहे, खरं तर आवाहनापेक्षा एक आव्हानच आहे हे. करोनावर मात करण्याची कल्पना सुचवा आणि इनाम जिंका!! ही आयडियाथॉन २७ आणि २८ मार्च रोजी होणार आहे.
Fight Corona IDEAthon असं या आयडियाथॉनचं नाव आहे. हे एक ओपन चॅलेंजच आहे म्हणा ना. एआयसीटीई म्हणजेच ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी एकत्रितपणे हे चॅलेंज सुरू केलं आहे. ज्यांच्या कल्पनांची निवड होईल त्यांना ४२ लाखांपर्यंतचे इनामही आहे.
#FightCORONA IDEAthon @ #AICTEdge:
Calling #Innovators, #Hackers, #Researchers, #Startups & #Professionals to channelize efforts to #innovate for a #social cause that can help Nation rise as one in #FightAgainstCorona
For details: https://t.co/lJRqWGszVE#IDEAthon #21daylockdown pic.twitter.com/fFgfFAXiJ4— AICTE (@AICTE_INDIA) March 25, 2020