TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 05 With Video {Topic :- मराठी भाषेतील म्हणी व त्यांचा अर्थ}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 05 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- मराठी भाषेतील म्हणी व त्यांचा अर्थ}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (मराठी भाषेतील म्हणी व त्यांचा अर्थ)

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ: –

खालील म्हणीन साठी योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

(१) ‘तळे राखी तो पाणी चाखी’
(a) राखीव तळ्याचे पाणी पिण्यास योग्य असते.
(b) तळ्याकाठी राहणारा तळ्याचे पाणी पितो.
(c) तहानलेला तळ्याकाठी पाणी पितो.
(d) ज्याच्याकडे एखाद्या वस्तूचे रक्षण करण्याची जबाबदारी असते, तो त्या
वस्तूचा उपभोग घेतोच.

(२) वरातीमागून घोडे
(a) वरातीच्या पाठीमागून घोडे चालणे.
(b) वरातीसाठी योग्य वेळी घोडा नसणे.
(c) योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
(d) योग्य वेळी घोड्यावर बसणे.

(३) शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
(a) चांगले काम केले की अभिनंदन होते.
(b) चांगल्या प्रकारचे फळ झाड लावावे.
(c) चांगले संस्कार असतील तर चांगलेच वर्तन होते.
(d) सुपीक जमीन फळ बागे साठी योग्य असते.

(४) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
(a) लहान वयात मुलाचे गुण व अवगुण दिसणे.
(b) लहानपणी खूप त्रास देणे
(c) जन्मतः अपंग असणे.
(d) नेहमी आपलेच खरे करणे.

(५) खायला काळ अन् भुईला भार.
(a) बक्कासुरा सारखे जेवण करणारी व्यक्ती.
(b) निरूपयोगी व्यक्ती.
(c) कठीण काम न करणारी व्यक्ती.
(d) खूप वजन असणारी व खूप खाणारी व्यक्ती.

(६) नाचता येईना आंगण वाकडे
(a) बळजबरीने काम करणे.
(b) नाच करण्यासाठी योग्य जागा नसणे.
(c) न आवडणारे पदार्थ खाणे.
(d) न करता येणारे काम, आपला दोष लपवून कामात दोष दाखवणे.

(७) कर नाही त्याला डर कशाला.
(a) गुन्ह्याला माफी नसते.
(b) ज्याने काही गुन्हा केला नसेल, त्याला भीती बाळगण्याची गरज नसते.
(c) भीती दायक ठिकाणी गेलेच नाही तर भिती वाटत नाही.
(d) ज्याला हाथ नाही त्याला कोणीच मारत नाही.

(८) गळा नाही सरी, सुखे निद्रा करी
(a) जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते.
(b) डोक्यात विचार असतील तर झोप येत नाही
(c) सोबत कुणी नसलं की झोप छान लागते.
(d) संपत्ती बरोबर अभिमान देखील वाढतो.

(९) हत्ती गेला, पण शेपूट राहिले.
(a) काम करताना कंटाळा येणे.
(b) हत्तीचे शेपूट लहान असते.
(c) पाऊस पडून गेला की पूर येतो.
(d) मोठे काम पूर्ण होताना थोडेसे काम राहणे.

(१०) यथा राजा तथा प्रजा
(a) सर्व सामान्य लोक नेहमीच वरिष्ठांचे अनुकरण करतात.
(b) राजाचा हुक्कुम सर्व मान्य असतो.
(c) राजा जेथे जातो तेथे प्रजा जाते.
(d) राजा प्रजेचा सर्व बाजूंनी विचार करतो.

(११) राईचा पर्वत करणे.
(a) छोट्या गोष्टीला महत्व न देणे.
(b) कष्ट करून उदर निर्वाह करणे.
(c) कारण नसतांना वाद घालत बसणे.
(d) शुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे.

(१२) आधणातले रडतात आणि सुपातले हसतात.
(a) जे तांदूळ शिजतात तेच रडतात.
(b) परीवर्तन हाच संसाराचा नियम आहे, आज सुख तर उद्या दुःख.
(c) गरिबीत दुःख सोसावे लागते.
(d) श्रीमंतीत सुखं उपभोगता येत.

(१३) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(a) जो हुशार असतो तोच पास होतो.
(b) नदी पेक्षा झरा खळखळून वाहतो.
(c) वजनाने कमी असलेली वस्तू जास्त दूर जाते.
(d) ज्या माणसाजवळ बुद्धिमत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो.

(१४) लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडा पाषाण.
(a) दुसऱ्यांना नेहमी कमी लेखणे.
(b) स्वतःस खूप हुशार समजणे.
(c) लोकांना नेहमी ब्रम्हज्ञान शिकवणे
(d) लोकांना उपदेश करायचा, पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

(१५) असतील शिते तर जमतील भूते
(a) जवळ पैसा असला की सर्वजण जवळ येतात.
(d) लग्न कार्यात जेवण करण्यासाठी गर्दी जमते.
(c) जेथे साखर पडते तेथे मुंग्या जमा होतात.
(d) भूतांना शीते आवडतात.

(१६) धर्म करता कर्म उभे राहते.
(a) प्रत्यकाचे कर्म त्याला कधीच सोडत नाही.
(b) दानधर्म केला तर पुण्य लाभते.
(c) प्रत्येक धर्म वेगळा असतो
(d) एखाद्याला साह्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागणे.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT