State Excise Department Bharti Practice Paper 01 : जवान सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०१

Maharashtra State Excise Department Bharti Practice Paper 01 | Darubandi Police bharti Practice Paper 01

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५१२ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक, चपराशी या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “जवान (पोलीस) (Constable)” या पदाची पात्रता हि माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार “जवान (पोलीस) (Constable)” सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

जवान (Constable) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०१

विभाग-१ मराठी

1) “मी मुंबईला जाईन” वाक्यामधील काळ ओळखा?
1) वर्तमानकाळ
2) भूतकाळ
3) भविष्यकाळ
4) यापैकी नाही
उत्तर: 3) भविष्यकाळ

2).”पंक” शब्दाचा अर्थ काय आहे?
1) चिखल
2) महल
3) गोंधळ
4) पंकज
उत्तर: 1) चिखल

3) “नागेश एका वाघा सारखे चालत होता’ अलंकार ओळखा?
1) यमक अलंकार
2) अनुप्रास अलंकार
3) उपमा अलंकार
4) उत्प्रेक्षा अलंकार
उत्तर: 3) उपमा अलंकार

4) “बालमन” या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
1) कर्मधारय
2) द्विगु
3) इंद
4) बहुव्रीही
उत्तर: 1) कर्मधारय

5) अनुलेखन व श्रुतलेखन ज्यावेळेस दिलेल्या वेळेतच करावयाचे असते तेव्हा त्या क्रियेस कोणते लेखन म्हणतात?
1) गतिलेखन
2) शुध्दलेखन
3) सुलेखन
4) श्रुतलेखन
उत्तर: 1) गतिलेखन

6) पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात?
1) गण
2) चरण
3) वित
4) यती
उत्तर: 2) चरण

7) पुढील शब्दाचा समास सांगा, चक्रपाणी.
1) द्वंद्व समास
2) बहुव्रीही समास
3) तत्पुरुष समास
4) अव्ययीभाव समास
उत्तर: 2) बहुव्रीही समास

8) शकुन या शब्दाला विरूधार्थी शब्द कोणता?
1) अशकुन
2) अपशकुन
3) निशकुन
4) दुःशकुन
उत्तर: 2) अपशकुन

9) ‘अनुस्वार’ व ‘विसर्ग’ यांना काय म्हणतात?
1) स्वर
2) व्यंजन
3) स्वरादी
4)यापैकी नाही
उत्तर: 3) स्वरादी

10) सदु बैलाला मारतो, या वाक्यातील कर्म ओळखा.
1) सदू
2) बैलाला
3) मारतो
4) वरील सर्व
उत्तर: 2) बैलाला

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the word:
Suspect
A. Definitive
B. Decisive
C. Disputable
D. Clear
Answer: C. Disputable

12) Identify the figure of speech in the following sentence:
She did not realize that opportunity was knocking at her door.
A. Hyperbole
B. Personification
C. Apostrophe
D. Metaphor
Answer: B. Personification

13) Convert the following active to passive voice:
Everyone loves Prof. Shah
A. Prof. Shah was loved by everyone
B. Prof. Shah is being loved by everyone
C. Prof. Shah is loved by everyone
D. Everyone seems to love Prof. Shah
Answer: C. Prof. Shah is loved by everyone

14) Identify the figure of speech in the following sentence:
This new car cost a million lakhs of rupees
A. Apostrophe
B. Metaphor
C. Hyperbole
D. Personification
Answer: C. Hyperbole

15) Identify the word that’s closest in meaning to the word:
Principle
A. Ruler
B. Head of educational institute
C. Doctrine
D. Associate
Answer: C. Doctrine

16) Choose the most suitable conjunction for the given sentence:
The weather was fine——– we decided to go out for a long walk.
A. but
B. and
C. because
D.as
Answer: B. and

17) Which of the following is NOT a Collective Noun?
A. Army
B. Cattle
C. Person
D. Public
Answer: C. Person

18) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
The scene of crime was loath——- to look at.
A.-full
B.-some
C.-ly
D.-ness
Answer: B.-some

19) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
if it rains he said we will stay indoors
A. If it rains he said we will stay indoors.
B. “If it rains,” he said, “we will stay indoors.”
C. “If it rains!” he said, ‘we will stay indoors.
D. If it rains, he said, we will stay indoors,
Answer: B. “If it rains,” he said, “we will stay indoors.”

20) He died a —— death.
A. great
B. magnificent
C. glorious
D. superficial
Answer: C. glorious

विभाग-३ गणित

21) द.सा.द.शे. 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल?
1) 60रु.
2) 6 रु.
3) 100 रु.
4) 600रु.
उत्तर: 4) 600रु

22) 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल?
1) 320 मीटर
2) 640 मीटर
3) 960 मीटर
4) 1280 मीटर
उत्तर: 4) 1280 मीटर

23) सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या, जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
1) 81
2) 82
3) 75
4) 78
उत्तर: 4) 78

24) एका शितपेय बनविणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते. तर तेच यंत्र 5 तासात किती बाटल्या भरेल?
1) 700
2) 740
3) 800
4) 840
उत्तर: 1) 700

25) एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10 टक्के सुट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल?
1) 9 रुपये
2) 8.50 रुपये
3) 9.50 रुपये
4) 8 रुपये
उत्तर: 1) 9 रुपये

26) ताशी 72 कि.मी. वेगाने धावणारी 163 मीटर लांबीची आगगाडी 237 मीटर लांबीचा पुल किती वेळात ओलांडून जाईल?
1) 20 सेकंद
2) 40 सेकंद
3) 1 मिनीट
4) 2 मिनीटे
उत्तर: 1) 20 सेकंद

27) एका बिस्किटच्या पुड्यात जेवढी बिस्कीटे आहेत, तेवढ्याच संख्येएवढे पुडे खरेदी केले तेव्हा एकूण 81 बिस्कीटे मिळाली. तर प्रत्येक पुड्यात किती बिस्कीटे आहेत ?
1) 12
2) 7
3) 8
4) 9
उत्तर: 4) 9

28) 10 मिटर + 100 सेमी किती?
1) 10 मीटर
2) 11 मीटर
3) 110 मीटर
4) 111 मीटर
उत्तर: 2) 11 मीटर

29) एका विशेष सांकेतिक भाषेत DATE = 30, FADE = 16 तर BAT =?
1) 23
2) 26
3) 22
4) 24
उत्तर: 1) 23

30) 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. दहाव्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी रुपये 23 होते, तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती?
1) 2 रुपये
2) 11 रुपये
3) 5 रुपये
4) यापैकी नाही
उत्तर: 3) 5 रुपये

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.
1) कर्नाटक
2) आंध्र प्रदेश
3) मध्य प्रदेश
4) छत्तीसगढ़
उत्तर: 3) मध्य प्रदेश

32) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?
1) कोपरगाव
2) श्रीरामपूर
3) अकलूज
4) प्रवरानगर
उत्तर: 4) प्रवरानगर

33) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
1) लोकमान्य टिळक
2) गोपाळ कृष्ण गोखले
3) गणेश आगरकर
4) महादेव गोविंद रानडे
उत्तर: 4) महादेव गोविंद रानडे

34) कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
1) 80 अंश पूर्व रेखावृत
2) 90 अंश पश्चिम रेखावृत्त
3) 180 अंश रेखावृत्त
4) 0 अंश रेखावृत्त
उत्तर: 3) 180 अंश रेखावृत्त

35) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?
1) पोलीस महासंचालक
2) अपर पोलीस महासंचालक
3) विशेष पोलीस महानिरिक्षक
4) पोलीस आयुक्त
उत्तर: 1) पोलीस महासंचालक

36) शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
1) बाजीराव पेशवे
2) नानासाहेब पेशवे
3) शिवाजी महाराज
4) संभाजी महाराज
उत्तर: 1) बाजीराव पेशवे

37) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
1) जो बायडन
2) बराक ओबामा
3) हिलरी क्लिंटन
4) माईक पेन्स
उत्तर: 1) जो बायडन

38) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
1) अॅमेझॉन
2) नाईल
3) मिसिसीपी
4) सिंधू
उत्तर: 2) नाईल

39) सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?
1) दुबई
2) कुवेत
3) सिरीया
4) सौदी अरेबिया
उत्तर: 4) सौदी अरेबिया

40) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
1) कानपूर
2) मिरत
3) झांशी
4) अराह
उत्तर: 2) मिरत

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT