Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 04 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०४

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 04 |Animal Husbandry Department Practice paper 04 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०४

विभाग-१ मराठी

1) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
वावडी उडवणे
A. हुप्या माकड पाहिल्याची राजेशने गावात वावडी उडवली.
B. राजू पडल्यावर मित्रांनी हसून त्याची वावडी उडवली.
C. शिल्पाचे लग्न चांगल्या घरी जमले नाही म्हणून तिच्या पालकांनी गावात वावडी उडवली.
D. अचानक आलेल्या वादळाने रस्त्यावर वावडी उडवली.
Answer: A. हुप्या माकड पाहिल्याची राजेशने गावात वावडी उडवली.

2) “दोरखंड” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. पाणी
B. चहाट
C. चंडांशू
D. कोदंड
Answer: B. चहाट

3) पोटीच एक पद लांबविला दुजा तो
पक्षी तनू लपवि भूप तपा पाहतो|
वरील वाक्यातील अलंकार कोणता?

A. उत्प्रेक्षा
B. अर्थान्तरन्यास
C. भ्रांतिमान
D. स्वभावोक्ति
Answer: D. स्वभावोक्ति

4) कपोत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. कापूस
B. कबुतर
C. घुबड
D. किमान
Answer: B. कबुतर

5) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा:

प्रथमेश टीव्हीवरील गायनाच्या स्पर्धेत पहिला आला तेव्हा त्याच्या शाळेतील अभिषेक सगळ्यांना सांगत सुटला की त्याचे व प्रथमेशचे वडील एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. खरे तर ते एकमेकांना एकदाच भेटले होते. म्हणतात ना —–
A. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ
B. वाहत्या गंगेत हात धुणे.
C. बाप तसा बेटा
D. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा
Answer: A. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ

6) पक्षी आकाशात उडतो. या वाक्यातील प्रयोग कोणता?
A. सकर्मक कर्तरी प्रयोग

B. नवीन कर्मणी प्रयोग
C. अकर्मक कर्तरी प्रयोग
D. शक्य कर्मणी प्रयोग
Answer: C. अकर्मक कर्तरी प्रयोग

7) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सभेत धीटपणे भाषण करणारा
A. ढालगज
B. सभाधीट
C. आगंतुक
D. जहाल
Answer: B. सभाधीट

8) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा
A. गणेशोत्सव सार्वजनीक कार्यक्रम आहे.
B. तो समारंभ निर्विघ्नपणे पार पडला.
C. त्यांनी खूप मोठी मरवणूक काढली.
D. गुंडांची वृत्ती समाजविघाटक असते.
Answer: B. तो समारंभ निर्विघ्नपणे पार पडला.

9) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
कूपमंडूक
A. सप्तमी तत्पुरुष
B. कर्मधारय
C. बहुव्रीहि
D. द्विगु
Answer: A. सप्तमी तत्पुरुष

10) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सिंह x कैसरी
B. सगुण निर्गुण
C. ज्ञानी x अज्ञानी
D. हार x जीत
Answer: A. सिंह x केसरी

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
she said im going to make lunch
A. She said ‘Im going to make lunch’
B. She said, “Im going to make lunch ”
C. She said, “I’m going to make lunch.”
D. she said I’m going to make lunch.
Answer: C. She said, “I’m going to make lunch.”

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He walked with a slow stiff gait.
A. bearing
B. attitude
C. stride
D. behaviour
Answer: C. stride

13) Find the word opposite in meaning to the word:
Latter
A. Last
B. Prior
C. Tea
D. Lag
Answer: B. Prior

14) Convert the following active to passive voice.
The traffic might have delayed Jimmy
A. Jimmy is being delayed by the traffic.
B. Jimmy might have been delayed by the traffic.
C. The traffic is delaying Jimmy.
D. Jimmy is to have been delayed by the traffic.
Answer: B. Jimmy might have been delayed by the traffic.

15) pick the correct meaning of the highlighted idiom;
In my neighbourhood there is a decent house which is let out.
A. To study one’s surroundings
B. To allow to go free
C. To prove of worth
D. To lease on hire
Answer: D. To lease on hire

16) Identify the figure of speech in the following sentence:
Will ask the lawyer to give his unbiased opinion on the case
A. Oxymoron
B. Metaphor
C. Euphemism
D. Apostrophe
Answer: A. Oxymoron

17) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following
Her house is situated a km from here, as the crow flies
A. in a straight line
B. Go in the direction of the flying crow

C. At a very long distance
D. In a maze and in a jumbled up way
Answer: A. In a straight line

18) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
My not getting a job there proved to be a blessing in disguise.
A.a disguised appearance of pure evil
B.a disappointment to one’s morals and ideals
C. something good that isn’t recognized at first
D. a disaster that disguised itself as a bad thing
Answer. C. something good that isn’t recognized at first

19) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
it is hard to cope with even everyday without a certain amount of ——– events.
A. managerial
B. management
C. manages
D. manage
Answer. B. management

20) Pick the right antonym for the word:
Lanky
A. bulky
B. gangly
C. thin
D. pleasant
Answer: A. bulky

विभाग-३ गणित

21) जर IS =4595 NICE = 70451525, तर KNOW =
A.55775115
B.557075115
C.11141523
D.2565
Answer: B.557075115

22) आनंद आणि बाबु यांच्या वर्तमान क्यामधील गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे. 4 वर्षांपूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षांनंतर बाबुच्या वयामधील गुणोत्तर 1:1 आहे. 4 वर्षांनंतर आनंदचे वय आणि 4 वर्षांपूर्वी बाबुच्या वयामधील गुणोत्तर काय असेल?
A. 1:3
B.2:1
C.3:1
D.4: 1
Answer: C.3:1

23) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: 6, 8, 14, 26, 46, 76, —–
A.84
B.96
C.112
D.118
Answer: D. 118

24) अरुण त्याच्या सायकलवर प्रवास करत आहे आणि त्याने जर 10 किमी/तास या वेगाने प्रवास केला तर तो A या ठिकाणी दुपारी 2 वाजता पोहचेल अशी त्याने गणना केली. त्याने 15 किमी तासाने प्रवास केला तर तो तेथे दुपारी 12 वाजता पोहचेल. दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्याने किती वेगाने प्रवास करावा.
A.8 किमी/तास
B. 10 किमी/तास
C. 12 किमी/तास
D. 14 किमी/तास
Answer: C. 12 किमी/तास

25) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 8 कि.मी. चालतो.मग तो डावीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 2 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.4 कि.मी.
B.5 कि.मी.
C.4.5 कि.मी.
D.5.5 कि.मी.
Answer. B.5.कि.मी.

26) 16/20+0.5-5/40 =?
A.2.975
B.1.175
C.0.775
D.1.025
Answer: B.1.175

27) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A. 350 चे 90%
B. 1700 चा 1/4
C.0.35 x 900
D.700 x 2/5
Answer: B.1700 चा 1/4

28) 44 x 1/8+ 44 x 25% + 0.40 x 140=
A.74
B.74.5
C.71.75
D.72.5

Answer: D.72.5

29) 9.5+12+2.25-(3.5+10-2.5+4) =
A.16.2
B.16.1
C.17.1
D 16.75
Answer: D.16.75

30) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.
A.48 किमी
B. 32 किमी
C.72 किमी
D. 60 किमी
Answer: A.48 किमी

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) सूरत हे ———- नदीच्या काठावर वसलेले आहे.
A नर्मदा
B. गोदावरी
C. माही
D. तापी
Answer: D. तापी

32) परिसंस्थेचा सजीव भाग ———- म्हणून संदर्भित आहे.
A. अजैविक घटक
B. जैविक घटक
C. सेंद्रिय घटक
D. असेंद्रिय घटक
Answer: B. जैविक घटक

33) जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.
A. आनुवंशिक
B. प्रजाती
C. परिसंस्था
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

34) ‘माँट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे?
A.2
B.3
C.5
D.7
Answer: A. 2

35) खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
A. यशवंतराव चव्हाण
B. बाळासाहेब ठाकरे
C. पी. के. सावंत
D. वसंतराव नाईक
Answer: B. बाळासाहेब ठाकरे

36) “फ्री थ्रो” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. व्हॉलीबॉल
C. फुटबॉल
D. बास्केटबॉल
Answer: D. बास्केटबॉल

37) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे?
A. दिल्ली
B. मुंबई
C. कोलकाता
D. अहमदाबाद
Answer: A. दिल्ली

38) 1926 मध्ये स्थापित श्री अरबिंदो आश्रम ———- येथे स्थित आहे.
A. ओडिसा
B. तामिळनाडू
C. पुडुचेरी
D. आंध्र प्रदेश
Answer: C. पुडुचेरी

39) पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ———- म्हणून ओळखले जाते.
A. प्रदूषण
B. हरित गृहाचे परिणाम
C. जागतिक तापमानवाढ
D. वरीलपैकी सर्व
Answer: C. जागतिक तापमानवाढ

40) पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सी.एफ.सी) चे गुणधर्म आहेत?
A. अत्यंत स्थिर
B. बिनविषारी
C. ज्वलनशील नसणे
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT