DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 01 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक -०१

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 01

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER, MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक -०१

विभाग-१ मराठी

1) ‘त्याचे बाबा अगदी आग्यावेताळ आहेत. अधोरेखित शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
A. आग लावणारा वेताळ
B. अत्यंत रागीट मनुष्य
C. आग्या नावाचा मनुष्य
D. अत्यंत चैनी मनुष्य
Answer: B. अत्यंत रागीट मनुष्य

2) ‘बिनभाड्याचे घर’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
A. तुरुंग
B. इमारत
C. बंगला
D. सदन
Answer: A. तुरुंग

3) ‘मला नोकरी लागली, की मी पेढे वाटीन.’ अधोरेखित शब्दात कोणता उभयान्वयी अव्यय आलेला आहे?
A. विकल्पबोधक
B. स्वरूपबोधक
C. परिणामबोधक
D. संकेतबोधक

Answer: D. संकेतबोधक

4) ‘रमेश गाणे गातो.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
A. गाणे गातो
B. रमेश
C. गाणे
D. गातो
Answer: C. गाणे

5) ‘विरजण पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. एखाद्या कामातला आनंद, उत्साह नाहीसा होणे.
B. दुधात दही पडणे.
C. दूध नासणे.
D. चांगल्या कामात विघ्न आणणे.
Answer: A. एखाद्या कामातला आनंद, उत्साह नाहीसा होणे.

6) ‘साखरभात या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
A. साखर किंवा भात
B. साखर आणि भात
C. भातात घातलेली साखर
D. साखर घालून केलेला भात
Answer: D. साखर घालून केलेला भात

7) ‘कपडा’ या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
A. चोपडा
B. टोपडे

C. लत्ता
D. सत्ता
Answer: C. लत्ता

8) जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हां त्या वाक्यांना काय म्हणतात ?
A. विकल्पबोधक अव्यय
B. समुच्चयबोधक अव्यय
C. न्यूनत्वबोधक अव्यय
D. परिणामबोधक अव्यय
Answer: C. न्यूनत्वबोधक अव्यय

9) खालील आलंकारिक शब्दांची योग्य जोडी निवडा.
A. कर्णाचा अवतार – संकुचित दृष्टीचा
B. कोडगा – लबाड
C. काडीपैलवान- सशक्त माणूस
D. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची ओरड
Answer: D. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची ओरड

10) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. अफूचे भरपूर पीक येणे.
B. पदार्थात खसखस वाटून घालणे
C. मोठ्याने हसणे.
D. कुजबुजणे.
Answer: C. मोठ्याने हसणे.

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of adjective for the given sentence:
what it is right now with clot ————— Is it possible to make the room and toys strewn all over?
A. most messiest than
B. more messier than
C. lesser messier
D. messier than
Answer: D. messier than

12) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
The pressure to transform our institutions of learning———–
A. continues
B. continue
C. are continuing
D. have continued
Answer: A. continues

13) Choose appropriate tense for the given sentence:
Look! Jeny ————her lunch early today as she ———- her mother out later.
A. had has, will take
B. is having, plans to take
C. will have, will taken
D. have, would take
Answer: B.is having, plans to take

14) Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence:
The ————– enjoyed the humorous character that the ————– portrayed
A. spectaters, actor
B. spectaturs, acter
C. spectators, actor
D. spectetors, aktor
Answer: C. spectators, actor

15) Choose the option that has all words spelt correctly:
A. equally, finally, realy
B. equaly, finally, really
C. equally, finally, really
D.equally, finaly, reall
Answer: C. equally, finally, really

16) Choose appropriate conjunctions for the given sentence:
I like to eat cakes——–they are warm, —— you served it cold ——late.
A. while, but, and
B. and, but, and
C.so, yet, because
D.so, since, but
Answer: A. while, but, and

17) Choose the correct form of the noun for the given sentence:
———- can be defined as an excess of body fat.
A. Obscenest
B. Obese
C. Obesity
D. Obedience
Answer: C. Obesity

18) Choose the correct form of adjective for the given sentence:
She has a good credit rating with other stores, so I’m sure she is ———
A. incredible
B. credible
C. creditworthy
D. creditor
Answer: C. creditworthy

19) Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.
A. Have you made a wish?’ I ask the boy.
B. ‘Have you made a wish? ask the boy.
C. ‘Have you made a wish! I ask the boy.’
D. ‘Have you made a wish ask the boy ‘
Answer: A. ‘Have you made a wish?’ I ask the boy.

20) Choose the appropriate preposition for the given sentence:
The man had been recuperating ———— an accident which left him bedridden.
A. from
B.by
C. on
D. over
Answer: A. from

विभाग-३ गणित

21) जर 1, 2, 3, 4 आणि 9 अंक एकदाच वापरुन संभाव्य लघुत्तम पाच अंकी सम संख्या तयार केली, तर दशम स्थानी संख्या येईल.
A.9
B.4
C.3
D. 2
Answer: A.9

22) अरुण आणि अनु एकमेकांपासून 150 किमी. अंतरावर राहतात. म्हणून ते मधे कोठेतरी भेटण्याचे ठरवतात. जर अरुण ताशी 20 किमी. वेगाने आणि अनू ताशी 40 किमी. वेगाने प्रवास करीत असेल तर त्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल?
A. 2 तास
B.2.5 तास
C. 3 तास
D.3.5 तास
Answer: B.2.5 तास

23) जर CLASS ला BJXON असे संकेतबद्ध केले जात असेल तर RADIO ला कसे संकेतबध्द केले जाईल?
A. PYAEJ
B.QYBEJ
C.QXAEJ
D.QYAEJ
Answer: D.QYAEJ

24) सूत्र VARGHESEVARGHESEVARGHESE VARGHESE चा विचार करा, जेथे VARGHESE ची 20 वेळा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. टप्पा 1 मध्ये सदर सूत्रातील सर्व सम स्थानातील अक्षरे काढून टाकण्यात येतात आणि पुढील टप्प्यांमध्ये क्रमाक्रमाने एकच अक्षर शिल्लक असेपर्यंत सम स्थानी असणारी अक्षरे काढून टाकण्यात येतात. तर ते अक्षर काय आहे?
A.S
B.R
C.V
D.H
Answer: C.V

25) 27 रुपये देण्यासाठी 5 रुपयाची नाणी आणि 2 रुपयांच्या नाण्यांची किती भिन्न संयोजने देता येतील.
A.1
B.2
C.3
D.4
Answer: C.3

26) 7 लाल चेंडू आणि 5 निळे चेंडू असलेल्या पिशवीतून एक चेंडू काढताना लाल चेंडू निघण्याची संभाव्यता किती असेल?
A.5/12
B.7/12
C.1/12
D.1/7
Answer: B.7/12

27) कुमारने जत्रेत त्याचे निशाणेबाजीचे कौशल्य पारखले. त्याला लक्ष्याला नेम मारायचा होता आणि जर त्याचा नेम लक्ष्याला लागला असता तर त्याला 1 रुपया मिळणार होता आणि जर तो चुकला तर त्याला 50 पैसे द्यावे लागणार होते. त्याने 25 शॉट मारले आणि 10 रुपये जिंकला. त्याने किती वेळा लक्ष्याला मारले?
A.10
B.15
C.18
D.20
Answer: B.15

28) A B आणि C ने एका भागीदारीमध्ये प्रवेश केला. A ने सुरूवातीला 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि 1 वर्षांनंतर आणखी 10 लाख रुपये त्याने गुंतवले. B ने सुरूवातीला 35 लाखांची गुंतवणूक केली आणि त्याने 2 वर्षांनंतर 10 लाख रुपये काढून घेतले. C ने 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली. 3 वर्षांनंतर C ला नफ्याचा किती भाग मिळेल?
A.19/56
B.19/28
C.9/28
D.17/28
Answer: C.9/28

29) ——– हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो.
A. सीएनजी
B. निर्माता वायू
C.जलवायू
D. एलपीजी
Answer: A. सीएनजी

30) वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा 46, 65,13, 32, 24, 43, 35, ?
A.45
B.52
C.54
D.55
Answer: C.54

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31. ——— हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो?
A. 3 ऑक्टोंबर
B. 4 ऑक्टोंबर
C. 2 ऑक्टोंबर
D. 5 ऑक्टोंबर
ANSWER: C. 2 ऑक्टोंबर

32. युनिसेफचे मुख्य कार्यालय ——— येथे आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. जिनिव्हा
D. टोकिओ
ANSWER: B. न्यूयॉर्क

33. भारतीय रेडक्रॉस सोसायटी ——— मध्ये स्थापन झाली?
A. 1917
B. 1918
C. 1919
D. 1920
ANSWER: D. 1920

34. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सुरुवात कधी झाली?
A. 1985
B. 1995
C. 2000
D. 2005
ANSWER: B. 1995

35. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे ——– एवढे रक्त असते?
A. 2 ते 3 लिटर
B. 3 ते 5 लिटर
C. 6 ते 7 लिटर
D. 8 ते 9 लिटर
ANSWER: B. 3 ते 5 लिटर

36. अन्न चावताना त्यात ——– हा पाचक रस मिसळतो?
A. लाळ
B. थुंकी
C. अन्नरस
D. पाचक रस
ANSWER: A. लाळ

37. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील ——— होय?
A. भिंत
B. दुवा
C. जोड
D. सांधा
ANSWER: A. भिंत

38. सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने त्वचा ——– जीवनसत्व तयार करते?
A. अ
B. ड
C. ब
D. क
ANSWER: B. ड

39. लसीकरणामुळे रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो?
A. असंसर्गजन्य
B. आनुवांशिक
C. साथीच्या
D. पारंपारिक
ANSWER: C. साथीच्या

40. शरीर बांधणीसाठी ———— गरज असते?
A. हाडांची
B. बोटांची
C. नखांची
D. प्रथिनांची
ANSWER: D. प्रथिनांची


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT