Maharashtra Talathi Bharti Result 2023- Merit list and cut-off marks

Maharashtra Talathi result 2023

Talathi Bharti Result Pdf: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी ग्रुप सी संवर्गाचे सरळ सेवा पदभरती ची जाहिरात दिनांक 26 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदाभरतीमध्ये एकूण 4793 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी असणारे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असू शकते. ही परीक्षा 26 जून 2023 पासून 25 जुलै 2023 पर्यंत तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर सहा डिसेंबर २००२३ रोजी या परीक्षेची अंतिम उत्तर तालिका सुद्धा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जिल्हा नुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परंतु आता सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील संवर्गनिहाय रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड यादी जाहीर होण्याची. आणि ही निवड यादी जाहीर होण्याची काम शेवटच्या टप्प्यात आले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. हे काम पूर्ण होतात जिल्हा निहाय निवड यादी प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्यानंतर 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येईल असे सुद्धा समाज माध्यमातुन जाहीर होताना दिसत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर निवड यादी लावण्यासाठी विशिष्ट जिल्हा निवड मंडळ यांची स्थापना करण्यात आलेली आहे. अशी जिल्हा मंडळ सर्व 23 जिल्ह्यांमध्ये निवडली आहेत आणि त्यामुळेच निवड यादी जाहीर करण्याचे काम अगदी जोरदार पणे चालू आहे. अशी अधिकृत माहिती तलाठी परीक्षा महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा आप्पा जमाबंदी आयुक्त सरिता नरके मॅडम यांनी दिली आहे. तलाठी परीक्षेकरिता बसणाऱ्या उमेदवारांची आकडेवारी बघितली असता असे लक्षात येते की या परीक्षेकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील साडेअकरा लाखन पेक्षा जास्त उमेदवार यांनी अर्ज दाखल केले होते. एकूण 4466 तलाठी पदांची भरती करिता दहा लाख 41 हजार 713 एवढे अर्ज विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी तलाठी ची परीक्षा दिलेली आहे असे आढळून आले. असंख्य प्रमाणात अर्ज आल्याकारणाने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि तीन शिफ्ट मध्ये घेण्यात आली. नुकतीच म्हणजेच सहा जानेवारीला या परीक्षेची जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. येणाऱ्या आठवड्यात ही जिल्हा निहाय निवड यादी जाहीर होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळाले आहे. त्यानंतर लगेच 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देऊन उमेदवारांना सन्मानित करण्याचे ठरविले आहे असे कळते.

Talathi Result 2023 | तलाठी निकाल 2023

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या 4793 पदांच्या जागांसाठी तलाठी भरती करण्यात येणार असून त्याकरिता आवश्यक असणारी परीक्षा जून ते जुलै या या महिन्यात घेतली गेली. ही परीक्षा तीन टप्प्यात घेऊन दर दिवशी तीन शिफ्ट याप्रमाणे घेण्यात आली. या परीक्षेस जवळपास 9-10 लाख उमेदवार उपस्थित होते. आणि अंतिम उत्तर तलिका जाहीर केल्यानंतर सर्वांना आतुरता होती ती म्हणजे निकाल ची. आणि तीच आतुरता दिनांक 6 जानेवारी ल जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर करून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे गुण माहिती झाल्याने थोडाफार cut off च अंदाज सुद्धा आपण घेतला असेलच. TCS पॅटर्न नुसार जरी परीक्षा घेतली गेली असून काही ठिकाणी परीक्षा मधे घोळ झाल्याचे जरी दिसून आले तरी अजून त्याचे पुरावे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे जाहीर केलेला निकाल हा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यावरूनच निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही संपूर्ण जिल्हा निहाय गुणवत्ता यादी आम्ही आमच्या telegram channel वर आधीच उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही आमचे telegram channel “Mahasarkar” नक्की जॉईन करा. आणि ही गुणवत्ता यादी TCS पॅटर्न नुसार normalisation करून च प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही यात संभ्रम निर्माण न करता हीच अंतिम गुणवत्ता यादी आहे असे गृहीत धरून त्याप्रमाणे आपले गुण समजावे.

Talathi Bharti Revised Result Published: Click here

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ Response Sheet: Click Here

 

District-wise Maharashtra Talathi result 2023

Talathi Cut Off 2023 | तलाठी कट ऑफ 2023

आपणास माहिती आहे की महसूल विभाग कडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 23 जिल्ह्यामधे एकूण 4657 तलाठी पदासाठी ची परीक्षा जून 2023 मधे पार पडली असून नुकताच 6 जानेवारी रोजी या परीक्षेचा निकाल म्हणजेच जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी मिळालेल्या गुणांचे शिफ्ट नुसार normalisation करूनच जाहीर करण्यात आल्याचे समजले. आता प्रत्येकाला प्रश्न. पडतो तो म्हणजे cut off काय लागेल? यासाठी आपणाला प्रतेक जिल्ह्यात संवर्ग निहाय रिक्त असणारी पदे आणि त्याच जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत असणारी संवर्ग निहाय विद्यार्थी यांची सांगड घातली तर नक्कीच आपणास cutoff च अंदाज येईल. त्या त्या जिल्ह्यात लागण्यासाठी सदर उमेदवाराने त्याच्या प्रवरगाचा त्या जिल्ह्यातील cutoff पूर्ण करणे आवश्यक आहे. यावरून आपण असे सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांचा cutoff हा वेगवेगळा असू शकतो. हा अंदाज आम्ही खाली दिला आहे तो अधिकृत नसून आपण कागदपत्र पडताळणी करीता तो अंदाजित cutoff नक्कीच ग्राह्य धरू शकता.

  • General खुला प्रवर्ग: 173-181
  • OBC: 170-176
  • EWS: 168-173
  • SC: 159-163

वरील अंदाजित cutoff लक्षात घेऊन तुम्ही कागदपत्रे तयार ठेवून कागदपत्र पडताळणी ची तयारी करू नक्कीच करू शकता. तसेच तुम्ही आमच्या website वर जाऊन मागील तलाठी भरती च cutoff बघून सुद्धा अंदाज लावू शकता. जर तुम्ही त्या जिल्ह्याचा cutoff पूर्ण केलात तर तुम्हाला कागदपत्र पडताळणी करीता नक्कीच बोलविले जाईल.

Cutoff काय असेल हे पाहण्यासाठी त्या जिल्ह्यातील प्रत्येक प्रवर्गातील एकूण उमेदवारांची संख्या, उपलब्ध असलेली संवर्ग नुसार रिक्त पदांची संख्या आणि उमेदवारांनी मिळविलेले गुण या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच आपण cutoff निश्चित करू शकतो. वर दिलेला cutoff हा अंदाजित cutoff असून त्यामध्ये 10-12 गुण मागे पुढे होऊ शकतात.

2023 या वर्षात झालेल्या तलाठी भरती परिक्षेकरीता अन्य भर्तीपेक्षा सर्वात जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्याचे दिसून आले. त्यामुळेच तब्बल एकूण 4644 जागांसाठी 11 लाखच्या जवळपास ऑनलाईन अर्ज आले होते. यावरून असे स्पष्ट होते की या परिक्षेकरीता उमेदवारांमध्ये खूप जास्त स्पर्धा होती. आणि म्हणूनच प्रतेक जिल्हा निहाय गुणवत्ता यादी मधे आपण बघू शकतो की सर्वात जास्त गुण असणारे विद्यार्थी खूप आहेत आणि त्यांचे गुण सुद्धा जास्त आहेत. तुम्ही तुमचा निकाल तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत बघितल असेल च आणि त्यावरून एक अंदाजित cutoff सुद्धा काढला असेलच. ही परीक्षा TCS कडून घेण्यात आली होती आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण सुद्धा करण्यात आली. आता प्रत्येकाला उत्सुकता आहे ती म्हणजे निवड यादी आणि नियुक्त्या यांची. तर आम्ही आपणास अगदी गोड बातमी देणार आहोत ती म्हणजे तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण होवून नियुक्ती पत्र 26 जानेवारीला देण्याचे नियोजन सरकारने केले असल्याचे माहिती झाले आहे.

वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या अधिकृत माहिती करिता तुम्ही आमचे चॅनल नक्कीच फॉलो करू शकता. तसेच तलाठी भरती प्रक्रिया विषयी अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वर भेट देऊ शकता. या परीक्षेस कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले आहेत असे दिसून येते. तसेच ही परीक्षा विविध शिफ्ट मधे घेतल्या गेल्या मुळे प्रतेक शिफ्ट मधील पेपरच्या काठिण्य पातळी नुसार त्या शिफ्टच्या मुलांच्या गुणांचे normalisation केल्या गेले आहे असे आपणास गुणवत्ता यादी वरून दिसून येते. या परीक्षे करीता एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के मुलांनी परीक्षा दिली आहे. आणि या परीक्षेचा अभ्यास करणारी मुले खूप वर्षांपासून असल्याने नक्कीच cutoff जास्त लागेल याची शक्यता नाकारता येणार नाही.

तलाठी निवड यादी कधी जाहीर होणार आणि नियुक्त्या कधी मिळणार?

आपणास माहिती आहे की, तलाठी भरती परीक्षा ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी 6 जानेवारीला महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ वर TCS मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. आणि त्यांनंतर प्रतेक जन cutoff च अंदाज घेत आहे हे सुद्धा दिसून येत आहे. परंतु प्रत्यक्षात जिल्हानिहाय निवड यादी प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून ही जिल्हानिहाय निवड यादी येणाऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारने दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच ही निवड यादी जाहीर केल्यावर त्या त्या जिल्ह्यात कागदपत्र पडताळणी होऊन येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी नियुक्त पत्र देण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य सरकारने योजिले आहे. अशी अधिकृत माहिती उच्च पदस्थ अधिकारी वर्गाकडून मिळाली आहे. ही निवड यादी प्रसिद्ध करताना काही जिल्ह्यातील पेसा अंतर्गत रिक्त पदांची भरती ही सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिका निकाल नंतरच होईल. आणि असे जिल्हे वगळून उर्वरित 23 जिल्ह्यामधे निवड यादी येत्या आठवड्यात महणजेच 22 जानेवारी पासून राबविण्यात येईल असे सुद्धा सूत्रांनी सांगितले आहे. यासाठी वेगवेगळे जिल्हा निवड मंडळ यांची स्थापन करून महसूल विभाग मार्फत युद्ध पातळी वर हे काम सुरू करण्यात आले आहे. जे उमेदवार त्या त्या जिल्ह्यात पात्र ठरतील त्यांची जिल्हानिहाय निवड यादी लवकरच घोषित करण्यात येईल. परंतु उर्वरित 13 पैसा अंतर्गत जिल्ह्यामधे म्हणजेच पैसा अंतर्गत रिक्त पदे यांची निवड सर्वोच्च न्यायालयातील निकाल नंतरच होईल असे सुचविले आहे. संवर्ग नुसार निवड यादी ही प्रतेक जिल्ह्यातील सवांर्ग निहाय रिक्त पदांचा तपशील लक्षात घेऊन करण्यात येणार आहे आणि हे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपल्याने नक्कीच पुढच्या आठवड्यात या सर्व 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या प्रसिद्ध होणार याची खात्री आहे. या निवड याद्या जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सुद्धा सरिता नरके महसूल विभाग अप्पर आयुक्त यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले आहे. ज्या ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे आणि त्यांना चांगले गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांचे तलाठी होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि अशा विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र पडताळणी करीता सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व स्पर्धा परीक्षा यांच्या निवड याद्या प्रसिद्ध करून नियुक्त्या देण्याचे पुण्याचे काम मात्र महाराष्ट्र सरकारने पुढच्या आठवड्यापासून करण्याचे योजिले आहे. त्यामुळे आता सर्वात शेवटच्या टप्प्यात ही तलाठी भरती प्रक्रिया येऊन पोहोचली आहे असे आपण म्हणू शकतो यात शंका नाही.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, त्यांचे वेळोवेळी उपलब्ध होणारे अपडेट्स, खाजगी आणि सरकारी नोकरी यांच्या उपलब्ध होणाऱ्या जाहिराती , विविध परीक्षा यांचे वेळापत्रक, हॉलतिकीट, निकाल यापासून तर अगदी सोप्या भाषेत उपलब्ध होणाऱ्या नोट्स या सर्वांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्ही आमचे telegram channel Mahasarkar नक्किच जॉइन करा. तसेच नवनवीन घडणाऱ्या घडामोडी यांची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी तुम्ही आमचे पेज फॉलो करा आणि बुकमार्क मधे नक्कीच सेव्ह करून ठेवा. जेणेकरून कोणतीही माहिती जलद आणि तात्काळ तुमच्या पर्यंत पोहोचेल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाईल. आणि ही सुवर्ण संधी नक्कीच सोडू नका.

Frequently asked questions (FAQ):

What are the total marks for the Talathi exam?

The Talathi exam will be conducted for a total of 200 marks, with each question carrying 2 marks. Negative marking will be implemented according to the organization’s regulations. The exam duration is 2 hours.

Is it possible to apply for Talathi after completing 12th grade?

No, a bachelor’s degree in education is required to apply for Talathi. However, if you have a bachelor’s degree in another field, you may pursue an alternative teaching certification program offered by many states.

Who is Talathi in Maharashtra?

Talathi is the representative of the Government and he is the one who performs many duties like Govt Recovery, Land Administration, and Public Relations, as a professional and competent officer.

When will the Maharashtra Talathi results for 2023 be declared?

The Maharashtra Talathi results for 2023 are usually announced within a month after the examination is conducted.

What credentials are required to obtain the Maharashtra Talathi result 2023?

To download the Maharashtra Talathi result 2023, candidates need to have their registration number and password ready.

Where will the Maharashtra Talathi result 2023 be released?

The Maharashtra Talathi result 2023 will be released on the official website of the Revenue and Forest department of Maharashtra after the written exam for the 2023 recruitment cycle is conducted.

Who determines the final cutoff marks for the Maharashtra Talathi exam 2023?

The final cutoff marks for the Maharashtra Talathi exam 2023 are decided by the Revenue and Forest department of Maharashtra, taking into account various factors.

What is the monthly salary for Talathi in Maharashtra?

The selected candidates for Talathi vacancies in Maharashtra will receive a salary ranging from Rs. 5,200/- to Rs. 20,200/- per month.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2024.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT