Rivers in Maharashtra: महाराष्ट्रातील नद्या

Rivers in Maharashtra महाराष्ट्रातील नद्या

महाराष्ट्र नदी प्रणाली:

1) कोकणातील नद्या:

 • पश्चिम वाहिनी
 • (अरबी समुद्रास मिळतात)
 • दमणगंगा, सुर्या, वैतरणा, तानसा,काळ, कुंडलिका, तेरेखोल, शास्त्री,वशिष्ठी, उल्हास, सावित्री मिळतात.

2) पठारावरील नद्या:

i) पूर्व वाहिनी

 • बंगालच्या उपसागरास मिळतात.भिमा, कृष्णा, गोदावरी

ii) पश्चिम वाहिनी

 • अरबी समुद्रास मिळतात. नर्मदा, तापी

iii) दक्षिण वाहिनी नद्या

 • वर्धा, वैनगंगा गोदावरीस मिळतात.

महाराष्ट्रात पूर्ववाहिनी नदया व पश्चिमवाहिनी नदया आहेत.

पूर्ववाहिनी नदया:

 • सह्याद्री पर्वतात उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहतात व बंगालच्या उपसागराला मिळतात. पूर्ववाहिनी नदया तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहतात. पूर्ववाहिनी नदयांमधून गोदावरी, भीमा, कृष्णा नदया प्रामुख्याने आहेत.

पश्चिमवाहिनी नदया:

 • सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहतात. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या नदया सुद्धा पश्चिमवाहिनी आहेत. पश्चिमवाहिनी नदया अरबी समुद्राला मिळतात. पश्चिमवाहिनी नदयांमध्ये कोकणातील वैतरणा, उल्हास, सावित्री या नदया तसेच तापी, पूर्णा आणि नर्मदा या पश्चिमवाहिनी नदया आहेत. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करून वाहणारी पश्चिमवाहिनी नदी म्हणजे नर्मदा नदी होय.

गोदावरी नदी:

 • दक्षिण भारतातील गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखतात. गंगा नदीच्या खालोखाल गोदावरी नदी पवित्र मानली जाते. गंगा नदीनंतर देशातील दुसरी मोठी नदी गोदावरी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे. सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी टेकडीवर गोदावरीचा उगम झालेला आहे. गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी असून महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यातून वाहत जाऊन राजमहेंद्री जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
 • गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 कि.मी असून गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 कि.मी. आहे.
 • गोदावरी नदी दख्खन पठारावर वाहते. पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत प्रवास करते.
 • महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यातून प्रामुख्याने गोदावरी नदी वाहते. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या 49 टक्के क्षेत्र व्यापले आहे.

गोदावरी नदीच्या उपनदया:

 • गोदावरीच्या उजव्या तिरावरून म्हणजे दक्षिणेकडून गोदावरीला दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका या नदया मिळतात. गोदावरीच्या डाव्या तिरावरून म्हणजेच उत्तरेकडून शिवणा, खाम, कादवा या नदया मिळतात.
 • गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. तेथे गोदावरीला प्राणहिता व इंद्रावती नदया मिळतात.

भीमा नदी:

 • भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पाच ज्योर्तिलिंगापैकी एक आहे.
 • भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 कि.मी. आहे. महाराष्ट्रात भीमा नदीचे क्षेत्र 46184 चौरस कि.मी. आहेत.
 • कर्नाटकातील रायपुर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा नदयांचा संगम होतो. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी म्हणजे भीमा नदी होय.
 • भीमा नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने पुणे व सोलापूर जिल्ह्याचासमावेश होतो. पवित्र तीर्थ क्षेत्र पंढरपुरातून भीमा नदी वाहते.
 • भीमा नदीच्या उपनदया म्हणजे वेळ नदी, घोड नदी, भामा नदी, इंद्रायणी नदी, मुळा-मुठा नदी, नीर नदी होय.

कृष्णा नदी:

 • कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो. याच ठिकाणी कृष्णा, वैण्णा, कोयना,गायत्री, सावित्री या पाच नद्यांचा उगम होतो.
 • कृष्णा नदी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून वाहते. कृष्णा नदी मच्छली पट्टणमजवळ बंगालच्या उपसागरालामिळते. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 कि.मी. असूनमहाराष्ट्रातील कृष्णेची लांबी 282 कि.मी. आहे.
 • कृष्णा नदी खोऱ्यात प्रामुख्याने सातारा, सांगलीचा काही भाग व संपूर्ण कोल्हापूर जिल्हयाचा समावेश होतो. कृष्णा नदीच्या उपनदया वैण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा,दूधगंगा,वेधगंगा, येरळा या नदया होय.

तापी नदी:

 • तापी नदी मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वत रांगामध्ये मुलताई येथे उगम पावते.
 • तापी नदीची एकूण लांबी 724 कि.मी असून महाराष्ट्रातील तापीची लांबी 208 कि.मी. आहे.
 • तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
 • दक्षिणेला सातमाळा, अजिंठा डोंगर रांग आणि उत्तरेला सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान तापी नदी पूर्व, पश्चिम वाहते. तापीची प्रमुख उपनदी पूर्णा नदी आहे.

नर्मदा नदी:

 • नर्मदा नदीची भारतातील एकूण लांबी 1312 कि.मी. आहे आणि महाराष्ट्रातील लांबी फक्त 54 कि.मी. आहे.
 • महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यातून नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहते.
 • नर्मदा नदी अतिशय खोल घळईतून वाहते.
 • आक्राणी टेकड्यांमुळे तापी नदी व नर्मदा नदी अलग झाल्या आहेत.

कोकणातील नद्या:

 • कोकणातील नदया लांबीने खूप आखूड असतात आणि त्या वेगवान वाहतात. कारण पूर्वेकडील सह्याद्री पर्वत व पश्चिमेकडील अरबी समुद्र यामुळे कोकणचा भाग अगोदरच अरूंद आहे व तीव्र उताराचाही आहे. म्हणून कोकणातील नदया वेगाने वाहतात व अरबी समुद्रास मिळतात.
 • देशावरील नदया पूर्व वाहिन्या असतात, तर कोकणातील नदया पश्चिमवाहिनी असतात.
 • देशावरील नदया लांब लांबीच्या असतात तर कोकणातील नदया आखूड लांबीच्या असतात.
 • उत्तर कोकणामधून दमण गंगा, सूर्या, वैतरणा, तानसा,काळू, भातसई, उल्हास, मुरबाडी या नदया वाहतात.
 • मध्य कोकणातून पातळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्टी, शास्त्री या नदया वाहतात.
 • दक्षिण कोकणातून वाघोठाणे, शुक, गड, कर्ली, तेरेखोलया नदया वाहतात.

पंचगंगा नदी:

 • ही पाच नद्या मिळून तयार झालेली आहे. कुंभी कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या पाच नदया मिळून पंचगंगा नदी बनलेली आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग येथे उगम पावते.

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT