Osmanabad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Osmanabad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Osmanabad Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 22 सप्टेंबर 2021

1. भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?

1) महात्मा गांधी

2) मदर तेरेसा

3) रवींद्रनाथ टागोर

4) सि.व्हि. रमण

उत्तर:3) रवींद्रनाथ टागोर

 

2.खालील नृत्य प्रकार व राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा.

अ. लेझिम 1. हरियाणा

ब. गिड्डा  2. उत्तर प्रदेश

क. कजरी 3. राजस्थान

ड. घुमर 4. महाराष्ट्र

1) अ-4. ब- 1,क-2, ड-3

2) अ-4,ब-2,क-3,ड-1

3) अ-4,ब-3,क-ड,-2

4) अ-2,ब-3,क-4. ड-1

उत्तर:1) अ-4. ब- 1,क-2, ड-3

 

 1. एका वर्गातील 30 कि.ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ. ने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?

1) 40 कि. ग्रॅ.

2) 50 कि. ग्रॅ.

3) 20 कि.ग्रॅ.

4)60 कि.ग्रॅ.

उत्तर:2) 50 कि. ग्रॅ.

 

4.सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडुन सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत, व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर सिताने एकुण किती फळे आणले?

1) 60

2) 50

3)30

4) 45

उत्तर:3)30

 

 1. एका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?

1) 80%

2) 44%

3) 56%

4) 96%

उत्तर:4) 96%

 

 1. खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.

1) धरणी

2) घरा

3) पृथ्वी

4) धरणे

उत्तर:4) धरणे

 

7.ग्रथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकीयोग्य शब्द निवडा,

1) आवृत्ती

2) प्रक्षिप्त

3) प्रकरण

4) प्रहसन

उत्तर:2) प्रक्षिप्त

 

8.4162597,6259741,5974162, 741???9

1) 597

2) 625

3) 652

4)659

उत्तर:2) 625

 

9.गाडी चालवत असतांना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय कराल?

1) फोन घेणार नाही

2) ब्ल्यूटूथ हँडसट चा वापर करून फोन घेणार

3) समोरुन वाहने येत नसतील तर ब्ल्यूटूथ हँडसेट चा वापर करून फोनघेणार

4) रात्रीची वेळ असेल तर फोन घेणार

उत्तर:1) फोन घेणार नाही

 

 1. 120, 90, 65, 45, 30, 20,?

1) 20

2)10

3) 5

4) 15

उत्तर:4) 15

 

 1. एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला. तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?

1) 37/50

2) 15/27

3) 27/37

4) 25/52

उत्तर:1) 37/50

 

 1. ‘ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे ‘या’ कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणापैकी योग्य उत्तर ओळखा.

1) साने-सान्या सान्यांनी

 1. कुत्रा कुत्र्यास- कुत्र्या
 2. पाणी-पाण्या-पाण्याने पाण्यांनी
 3. राम रामा रामाला

उत्तर:1) साने-सान्या सान्यांनी

 

 1. जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20 11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल?

1) 11-7-20-16-11-24

2) 13-7-20-9-11-25

3) 10-7-20-13-11-24

4) 13-7-20-10-11-25

उत्तर:3) 10-7-20-13-11-24

 

 1. खालील पैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही?

1) अथवा

2) शिवाय

3) किंवा

4) अगर

उत्तर:2) शिवाय

 

 1. खालील पैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही?

1) LMV

2) HMV

3) HGMV

4) TMV

उत्तर:4) TMV

 

 1. खालीलपैकी कोरोना संदर्भात कोणती चाचणी केली जात नाही?

1) RE-PCR

2) RAT

3) अॅन्टीबॉडी टेस्ट

4) DOTS

उत्तर:4) DOTS

 

 1. खालील पैकी संहार शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.

1) नाश

2) झगडा

3) विनाश

4) सर्वनाश

उत्तर:2) झगडा

 

 1. विडंबन या शब्दाचा समान अर्थी शब्द खालील पैकी कोणता?

1) विसंगत

2) विजोड

3) उपहास

4) विरक्ती

उत्तर:3) उपहास

 

 1. खालील पैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?

1) अनारसा

2) दलाल

3) दूध

4) भोजन

उत्तर:3) दूध

 

 1. जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1)8मार्च

2) 8 एप्रिल

3) 8 मे

4) 10 मार्च

उत्तर:1)8 मार्च

 

 1. आपण चारचाकी वाहन घेवून घराकडून ऑफीसकडे एक मार्गीवाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असतांना 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर:

1) हळूहळू वेगात गाडी रिव्हर्स गिअर मध्ये मागे घराकडे घ्याल.

2) गाडी पटकन रिव्हर्स गिअर मध्ये घराकडे घ्याल.

3) मागे वाहने नसल्यास जाग्यावर गाडी वळवून माघारी जाल.

4) एकमार्गी रस्ता पार करुन संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल.

उत्तर:4) एकमार्गी रस्ता पार करुन संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल.

 

 1. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा- केसाने गळा कापणे

1) विश्वासघात करणे

2) खुन करणे

3) केसाने मान कापणे

4) केसाने धरून ठेवणे

उत्तर:1) विश्वासघात करणे

 

 1. उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात?

1) बालाघाट

2) अरवली

3) पुर्वघाटरांगा

4) पटकाय

उत्तर:1) बालाघाट

 

 1. ‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे’ वरील वाक्याचा प्रकार ओळखा.

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य

3) संयुक्त वाक्य

4) नकारार्थी वाक्य

उत्तर:2) मिश्र वाक्य

 

 1. ‘रामाने ब्रेक लावला म्हणुन गाडी थांबली. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय……… प्रकारातील आहे.

1) परिणामबोधक

2) उद्देशबोधक

3) संकेतबोधक

4) कारणबोधक

उत्तर:1) परिणामबोधक

 

 1. एप्रिल नंतर मे महिना येतो. अधोरेखित शब्दांची जात कोणती?

1) क्रियाविशेषण अव्यय

2) शब्दयोगी अव्यय

3) उभयान्वयी अव्यय

4) क्रियाविशेषण

उत्तर:2) शब्दयोगी अव्यय

 

 1. खालील पैकी कोणता संधी विग्रह चुकीचा आहे?

1) नाहीसा = नाही असा

2) नदीत = नदी आत

3) खिडकीत = खिड़की आत

4) लाडूत = लाड उत

उत्तर:4) लाडूत = लाड उत

 

 1. मध: मधमाशी: : कात?

1) खैर

2) लाल

3) पळस

4) कडू

उत्तर:1) खैर

 

29.0.9× 0.09 ×0.009/ 0.0009×9 = किती?

1) 0.9

2) 0.09

3) 0.009

4)9

उत्तर:2) 0.09

 

 1. ट्रॅफीक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्यारंगाच्या दिव्याचावापर केला जात नाही?

1) पांड

2) लाल

3) पिवळा

4) हिरखा

उत्तर:1) पांड

 

 1. गाडी चालवत असतांना रुग्ण वाहीकेच्या सायरन चा आवाज आल्यास

1) समोरुन कोणतेही वाहन येत नसला तरच मार्ग मोकळा करून द्यावा

2) तात्काळ मार्ग मोकळा करून देण्याची आवश्यकता नाही

3) वाहन रस्त्याच्या बाजूला घेवून तात्काळ रस्ता मोकळा करुन द्यावा

4) वाहन वेगात घेवून जावे

उत्तर:3) वाहन रस्त्याच्या बाजूला घेवून तात्काळ रस्ता मोकळा करुन द्यावा

 

 1. विनू एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5 कमिशन व 15000 रु. पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28000 रु. केली तर विनूने एकुण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले?

1) 1260 रु

2)6012 रु

3) 1860 रु

4) 1660 रु

उत्तर:4) 1660 रु

 

 1. दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे, 6 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षांनंतरचे वय किती?

1) 34 वर्ष

2) 30 वर्षे

3) 28 वर्षे

4) 40 वर्ष

उत्तर:1) 34 वर्ष

 

 1. तीन संख्या अशा आहेत की पहिली दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येचा तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती?

1) 42

2) 45

3) 48

4) 54

उत्तर:4) 54

 

 1. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील?

1) 16

2) 26

3) 28

4) 22

उत्तर:3) 28

 

 1. एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयांस विकले, तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्केझाला?

1) 1% तोटा

2) 01% तोटा

3) 1% नफा

4) ना नफा ना तोटा

उत्तर:1) 1% तोटा

 

 1. एका विद्याथ्र्यांने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परिक्षेमध्ये आलेले एकुण प्रश्न किती?

1) 36

2) 30

3) 25

4) 20

उत्तर:4) 20

 

 1. एक नळ एक टाकी 20 मिनीटांत भरतो आणि दुसरा तीच टाकी 30 मिनीटांत भरतो जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

1) 10 मिनिटे

2) 11 मिनिट

3) 12 मिनिट

4) 13 मिनिटे

उत्तर:3) 12 मिनिट

 

 1. एक व्यक्ती तळमजल्यावरून जिन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात नेवून ठेवली. तरीसुध्दा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती?

1) 6425

2) 2564

3) 4256

4) 5264

उत्तर:2) 2564

 

 1. एका शंकुची उंची 24 सेंमी व त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती? (π=22/7)

1) 4000cm3

2) 4258cm 3

3) 11088cm3

4) 4111cm3

उत्तर:3) 11088cm3

 

 1. रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल 11 जुलै 2011 ला कोणता बार असेल?

1) मंगळवार

2) शुक्रवार

3) बुधवार

4) रविवार

उत्तर:2) शुक्रवार

 

 1. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते?

1) तीन स्टार, लाल फित, मपोसे

2) तीन स्टार, लाल निळी फित व मपोसे

3) तीन स्टार व मपोसे

4) दोन स्टार लाल निळी फित व मपोसे

उत्तर:2) तीन स्टार, लाल निळी फित व मपोसे

 

 1. गटात न बसणारे शब्द ओळखा.

1) शंकु

2) गोल

3) वर्तुळ

4) अर्धगोल

उत्तर:3) वर्तुळ

 

 1. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?

1) कलम 14 ते 32

2) कलम 14 ते 18

3) कलम 19 ते 20

4) कलम 25 से 32

उत्तर:2) कलम 14 ते 18

 

 1. L? ML? NMLL? ML

1) LAN

2) NMM

3) NNN

4) NLN

उत्तर:4) NLN

 

 1. सिताची घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील?

1) नऊ वाजून दोन मिनीटे

2) नऊ वाजून आठेचाळीस मिनीट

3) नऊ वाजून चार मिनीटे

4) नऊ वाजून एक मिनीट

उत्तर:3) नऊ वाजून चार मिनीटे

 

 1. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उप विभाग आहेत?

1) सहा

2) पाच

3) चार

4) सात

उत्तर:2) पाच

 

 1. उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?

1) एन. एच. 52

2) एन. एच. 65

3) एन. एच. 361

4) एन. एच. 53

उत्तर:4) एन. एच. 53

 

 1. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते?

1) दादासाहेब फाळके

2) पृथ्वीराज कपूर

3) सलमान खान

4) गुरु दत्त.

उत्तर:1) दादासाहेब फाळके

 

 1. सन 2021 मध्ये झालेल्या टोकीयो ऑलिंम्पिक मध्ये भारतालाएकुण किती पदके मिळाली?

1) 07

2) 08

3) 09

4) 06

उत्तर:1) 07

 

 1. दोन नाणी हवेत फेकली असता कमीतकमी दोन छापा (Head) मिळण्याची संभाव्यता किती आहे?

1) 1/4

2) 3/4

3) 1/3

4) 1/2

उत्तर:1) 1/4

 

 1. सहा पुस्तके A, B, C, D, E F जी एकामागे एक लावलेली आहेत, B, C, E आणि F पुस्तकांना हिरवी कव्हर लावलेली आहेत. उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाची कव्हर लावलेली आहे. पुस्तक A, B आणि D हि नवीन आवृती आहे. A, B आणि C हे कायद्याचे पुस्तक आहे, व उरलेली पुस्तके वैद्यकिय पुस्तके आहेत, तर दोन हिरवी कव्हर असलेलीव वैद्यकिय असलेली पुस्तके कोणती?

1) B व C

2) Eव F

3) Cव E

4) C व F

उत्तर:2) E F

 

 1. महाराष्ट्रामध्ये RTO कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते?

1) 8 चा आकार

2) 9 चा आकार

3) 5 चा आकार

4) 3 चा आकार

उत्तर:1) 8 चा आकार

 

 1. या वेळी फॉग लाईट वापरले जातात.

1) रात्रीच्या वेळी

2) धुक्याच्या वेळी

3) विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाश झोत वापर करत नाहीत

4) यापैकी नाही

उत्तर:2) धुक्याच्या वेळी

 

 1. P1/P2 पाकींग स्किम म्हणजे काय?

1) सम विषम दिनांकानुसार रस्त्याचे एकाच बाजूस पार्कींग करणे,

2) बाजारच्या ठिकाणा पासून दूर पाकींग करणे.

3) प्रथम येणान्यास पाकींग साठी प्रथम प्राध्यान्य

4) यापैकी नाही

उत्तर:1) सम विषम दिनांकानुसार रस्त्याचे एकाच बाजूस पार्कींग करणे,

 

 1. रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकिय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?

1) 100

2) 100

3) 108

4) 102

उत्तर:3) 108

 

57.खालील पैकी कोणता शब्द उपसगंघटीत नाही?

1) अतिशय

2) अपयश

3) उत्कर्ष

4) राजकीय

उत्तर:4) राजकीय

 

 1. ACEG. HJLN. OOSU,?. CEGI

1) UWYA

2) VXZA

3) VWYA

4) VXZB

उत्तर:4) VXZB

 

 1. सध्या अमेरीकेचे राष्ट्रपती कोण आहेत?

1) बराक ओबामा

2) डोनाल्ड ट्रम्प

3) जो बायडेन

4) बिल क्लॉटन

उत्तर:3) जो बायडेन

 

 1. मोहन दक्षिणेला चालतो आहे, तो डावीकडे वळतो, परत डावीकडेवळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो.तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल ?

1) पूर्व

2) दक्षिण

3) ईशान्य

4) उत्तर

उत्तर:4) उत्तर

 

 1. 61. A) रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत.
 2. b) राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत.
 3. d) पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
 4. e) रत्नास पन्द्यापेक्षा आधिक मार्क आहेत.
 5. e) रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.तर सर्वांत जास्त मार्क कोणाला मिळाले?

1) राम

2) पद्मा

3) राणी

4) रत्ना

उत्तर:4) रत्ना

 

 1. 60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?

1) 6

2) 5

3) 4

4) 7

उत्तर:2) 5

 

 1. (3x+5) हि एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?

1)3x-1

2) 3x

3) 3x+1

4) 3x+3

उत्तर:2) 3x

 

 1. वाहतुकीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग कशा करीता आखलेले असतात?

1) दुचाकी स्वारांना रस्ता ओलांडण्यासाठी

2) पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी

3) रुग्ण वाहीकांना जाण्यासाठी

4) पोलीस बिट मार्शलला जाण्यासाठी

उत्तर:2) पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी

 

 1. म्हणींचा अचुक अर्थ ओळखा, “बैल गेलानी झोपा केला”

1) माणूस झोपल्याने बैल गेला

2) एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उपाययोजना करणे

3) बैल निघुन गेल्यावर मालक झोपी गेला

4) ज्या गोष्टी शोधुन सापडणार नाहीत त्याचे प्रयत्न करणे

उत्तर:2) एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उपाययोजना करणे

 

 1. RTO म्हणजे काय?

1) Regional Transport Office

2) Road Transport Office

3) Road Traffic Office

4) Registration Traffic Office

उत्तर:1) Regional Transport Office

 

 1. एक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 कि.मी. पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही, तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असतांना प्रचलित नियमानुसार सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे काय?

1) होय

2) नाही

3) वाहनाला हादरे नसतील तर आवश्यकता नाही

4) स्वतःला आवश्यता बाटत नसले तर नाही

उत्तर:1) होय

 

 1. अनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) राग

2) सहकार्य

3) मैत्री

4) वात्सल्य

उत्तर:1) राग

 

 1. न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?

1) कोणत्याही पदार्थावर बाह्यबल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तु स्थिर राहते व गतिमान वस्तु गतिमान राहते.

2) पदावर कार्य करणारे बाह्य बलाच्या समप्रमाणात त्वरण बदलते.

3) जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तु पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते,

4) स्थिती स्थापकत्वाच्या विशिष्ठ मर्यादेपर्यंत पदार्थावर कार्य करणारे बलहे पदार्थात होणाऱ्या छोटयात छोट्या बदलाच्या सम प्रमाणात असते.

उत्तर:3) जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तु पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते,

 

 1. अन्न:?: :पाणी: पाणपोई

1) खानावळ

2) धर्मशाळा

3) स्वयंपाकगृह

4) अत्रछत्र

उत्तर:4) अत्रछत्र

 

 1. √4+ √16+ √81 = किती?

1) 15

2) 9

3) 3

4) 2

उत्तर:3) 3

 

 1. अजी चा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?

1) भाऊ

2) मुलगा

3) भाचा

4) काका

उत्तर:2) मुलगा

 

 1. समजा तुम्ही वाहतुक पोलीस म्हणून कार्यरत आहात. जर एखाद्या वाहन चालकास आपण मागणी केल्यावर त्यांच्याकडे विहीत वाहन चालक परवाना नसेल तर आपण कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार कार्यवाही कराल?

1) मोटार वाहन कायदा 1988 कलम 181

2) मोटार वाहन कायदा 1988 कलम 199

3) मोटार वाहन कायदा 1988 कलम 192

4) मोटार वाहन कायदा 1988 कलम 110

उत्तर:1) मोटार वाहन कायदा 1988 कलम 181

 

 1. WHO चे मुख्यालय कोठे आहे?

1) न्यूयॉर्क

2) जिनिव्हा, स्वित्झर्लंड

3) चर्लिन, जर्मनी

4) पॅरिस, फ्रान्स

उत्तर:2) जिनिव्हा, स्वित्झर्लंड

 

 1. सकाळी 6:00 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 km व 70 km आहे. तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?

1) दुपारी 1:00

2) दुपारी 2:00

3) दुपारी 3:30

4) दुपारी 2:30

उत्तर:2) दुपारी 2:00

 

 1. प्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गीका असणाऱ्या उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते?

1) केवल अपातकालीन

2) ओव्हरटेक करण्यासाठी

3) पोलीस वाहनासाठीवाहनासाठी

4) केवळ जड वाहनासाठी

उत्तर:2) ओव्हरटेक करण्यासाठी

 

 1. दिपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनिल हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दिपकचे वय सुनिलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू आणि दिपक यांच्या वयांचे गुणोत्तर किती?

1) 6:5

2) 7:6

3) 6:7

4) 5:6

उत्तर:3) 6:7

 

 1. आपणास ऑफीसला महत्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असतांनाआपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहणास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे. तर आपण काय कराल?

1) आपण वारंवार हॉर्न वाजवून पटकन ओव्हरटेक कराल

2) समोर रुंद रस्ता असल्यास ओवरटेक कराल

3) समोरच्या वाहन चालकांने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यासओव्हरटेक कराल

4) डाव्या बाजूने ओव्हरटेक कराल

उत्तर:3) समोरच्या वाहन चालकांने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यास ओव्हरटेक कराल

 

 1. खालील बाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणे

1) चांगला बदडून काढणे

2) एकच परिस्थिती असणे

3) वाईटाची इच्छा होणे

4) विघ्न निर्माण करणे

उत्तर:3) वाईटाची इच्छा होणे

 

 1. खालीलपैकी कोणता शब्द द्वीगू तत्पुरुष समास नाही.

1) सप्ताह

2) पंचारती

3) पाचवड

4) लंबोदर

उत्तर:4) लंबोदर

 

 1. CCTNS चा अर्थ काय आहे?

1) Crime and Criminal Tracking Network & Systems

2) Criminal and Crime Tracking Network & Systems

3) Crime and Criminal Tracing Network & Systems

4) Criminal and Crime Tracing Network & Systems.

उत्तर:1) Crime and Criminal Tracking Network & Systems

 

 1. मराठी वृतपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते?

1) वि.रा.शिंदे

2)पंडीता रमाबाई

3) बाळशास्त्री जांभेकर

4) गो. ग. आगरकर

उत्तर:3) बाळशास्त्री जांभेकर

 

 1. देशामध्ये महाराष्ट्र लोकसंखेच्या बाबतीत…….क्रमांक तर क्षेत्रफळाच्यादृष्टीने…..क्रमांकाचे राज्य आहे.

1) 2 आणि 3

2) 3 आणि 2

3) 3 आणि 4

4) 4 आणि 2

उत्तर:1) 2 आणि 3

 

 1. द.सा.द.शे. 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळव्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे10% दराने किती व्याज येईल?

1) 1020 रुपये

2) 1600 रुपये

3) 1200 रुपये

4) 1800 रुपये

उत्तर:3) 1200 रुपये

 

 1. 1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात जर व्याजाचादर 5% नी वाढविला, तर रास किती?

1) 3220 रु.

2) 2080 रु.

3) 3022 रु.

4) 2230रु.

उत्तर:2) 2080 रु.

 

 1. दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. तर ती संख्या कोणती?

1) 83

2) 63

3) 73

4) 93

उत्तर:2) 63

 

 1. क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये उप बिजेता संघ कोणत्या देशाचा होता?

1) इंग्लंड

2) न्यूझीलंड

3) भारत

4) ऑस्ट्रेलिया

उत्तर:2) न्यूझीलंड

 

 1. ‘सिरस इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया’ कोठे आहे?

1) मुंबई

2) पुणे

3) दिल्ली

4) चेन्नई

उत्तर:2) पुणे

 

 1. ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे?

1) 08

2) 10

3) 01

4) 00

उत्तर:1) 08

 

 1. एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हफ्त्यात परत केले व प्रत्येक हफ्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रु. जास्त दिले. तर पहिला हफ्ता किती रुपयांचा होता?

1) 375

2) 425

3) 475

4) 525

उत्तर:2) 425

 

91 अधोरेखितशब्दांची विभक्तीओळखा.पावसात भिजू नका.

1) पंचमी

2) षष्ठी

3) चतुर्थी

4) सप्तमी

उत्तर:4) सप्तमी

 

 1. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहल्यास बरोबर मध्यभागी कोणताअपूर्णांक असेल?

5/9, 8/15, 11/17,7/11,6/13

1) 5/9

2) 8/15

3)7/11

4)6/13

उत्तर:1) 5/9

 

93.365 मिटर लांबीची एक रेल्वे 60 km/hrवेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 km/hrवेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते, तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा.

1) 760 मीटर

2) 670 मीटर

3) 860 मीटर

4) 680 मीटर

उत्तर:1) 760 मीटर

 

 1. जेव्हा तुम्ही रस्त्याने जातांना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?

1) वाहन थाबवाल, हॉर्न वाजवाल पूढे जाल

2) वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल

3) सतत हॉर्न वाजवाल कोणी न आल्यास पुढे जाल

4) हॉर्न वाजवाल कोणी नसल्यास पटकण पुढे जाल

उत्तर:2) वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल

 

 1. खालील ओळीतील अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पड़ो।

1) अनुप्रास

2) अपेक्षा

3) उपमा

4) यमक

उत्तर:4) यमक

 

1) अनुप्रास 96. ‘चित्त आनंद’ या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता?

1) चिद्वानंद

2) चिंतानंद

3) चिदानंद

4) चिन्मयानंद

उत्तर:3) चिदानंद

 

 1. दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास.

1) आपत्कालीन परिस्थितीमध्ये परवानगी आहे

2) कायद्याचे उल्लंघन आहे

3) वाहतूक कमी असल्यास परवानगी आहे

4) केवळ रात्रीच्या वेळी परवानगी आहे.

उत्तर:2) कायद्याचे उल्लंघन आहे

 

 1. चार चाकी हलके वाहन शिकावू चालक परवान्यासाठी किमान वयाचीपात्रता किती आहे?

1) 16 वर्षे

2) 17 वर्षे

3) 18 वर्षे

4) वरील पैकी एकही नाही

उत्तर:3) 18 वर्षे

 

 1. RTO कडुन दिला जाणारा वाहतूक परवाना, हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?

1) गाडीच्या हेडलॉइटस वरुन

2) गाडीच्या नंबर प्लेटवरुन

3) बाहेरुन पाहून सांगू शकत नाही,

4) गाडीच्या रंगावरुन

उत्तर:2) गाडीच्या नंबर प्लेटवरुन

 

 1. HSRP म्हणजे काय?

1) High Security Registration Plate

2) High Surveillance Registration Plate

3) High Security Roaming Plate

4) Heavy Security Registration Plate

उत्तर:1) High Security Registration Plate


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT