IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 01 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 01
Updated on July 1, 2023
July 1, 2023ShankuStudy MaterialsComments Off on IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 01 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 01
TCS/IBPS Exam TOP GK Questions Part 01| TCS Pattern Exam General Knowledge Questions & Answers
नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS GENRAL KNOWLEDGE (सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे १५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव प्रश्न…………………..
Q.1 एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील खालीलपैकी कोणत्या नदीत हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले होते?
1. नीरा
2. मांजरा
3. भीमा
4. पूर्णा Answer: 1. नीरा
Q.2 एप्रिल 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी कोणत्या भारतीय राज्याच्या सीमेवरील गावात ‘व्हायब्रेट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला होता?
1. उत्तराखंड
2. हिमाचल प्रदेश
3. अरुणाचल प्रदेश
4. सिक्कीम Answer: 3. अरुणाचल प्रदेश
Q.3 2023 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते?
1. दुसऱ्या
2. चौथ्या
3. पहिल्या
4. पाचव्या Answer: 4. पाचव्या
Q.4 महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे?
1.45.8%
2.38.9%
3.56.9%
4.49.7% Answer: 4.49.7%
Q.5 खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या DNA मधील परिवर्तनास जबाबदार असते?
1. जीनसंच नियमन ( जीनोम रेग्युलेशन)
2. पश्चजात बदल (एपिजेनेटिक चेंजेस)
3. दृश्यकेंद्रकी संपादन (युकॅरिओटिक एडिटिंग)
4. जीनसंच संपादन (जिनोम एडिटिंग) Answer: 4. जीनसंच संपादन (जिनोम एडिटिंग)
Q.6 वाकाटक राजवंशातील पहिला विंध्यशक्ती चा उत्तराधिकारी कोण होता?
1. पहिला प्रवरसेन
2. दुसरा प्रवरसेन
3. दुसरा रुद्रसेन
4. पहिला रुद्रसेन Answer: 1. पहिला प्रवरसेन
Q.7 संविधानाने अनेक मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे. न्यायपालिकेने अनुच्छेद. आणि अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करणे आणि अशा मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे.
1.31; 12
2.35; 12
3.34; 14
4. 32; 13 Answer: 4. 32; 13
Q.8 भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?
1.11
2.7
3.8
4.10 Answer: 1.11
Q.9. मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी ‘जुगलबंदी’ हा बहुभाषिक AI- चॅटबॉट सुरु केला होता?
1. गूगल
2. अॅपल
3. मायक्रोसॉफ्ट
4. इंटेल Answer: 3. मायक्रोसॉफ्ट
Q.10 मच्छिमार आणि इतर भागधारकांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठीचा सागर परिक्रमा यात्रेचा पाचवा टप्पा (Sagar Parikrama Yatra Phase-V) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम (मे 2023) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किनारी प्रदेशातून जात नाही?
1. रायगड
2. मुंबई
3. रत्नागिरी
4. ठाणे Answer: 4. ठाणे
Q.11 खालीलपैकी कोणत्या तारखेला G20 च्या ‘एन्वायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप (ECSWG)’ ची तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती?
1. एप्रिल 21-23, 2023
2. एप्रिल 11-13, 2023
3. मे 11-13, 2023
4. मे 21-23, 2023 Answer: 4. मे 21-23, 2023
Q.12 मे 2023 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण किती जागा जिंकल्या होत्या?
1.66
2.19
3.135
4.145 Answer: 3.135
Q.13 महाराष्ट्रातील नागरिक हे कोणत्या मोबाईल अॅपचा वापर करून लोकसेवा हक्क कायदा, 2015 ची संपूर्ण माहिती मिळवू शकतात?
1. RTS2015 महाराष्ट्र
2. RTES महाराष्ट्र
3. RTSI महाराष्ट्र
4. RTS महाराष्ट्र Answer: 4. RTS महाराष्ट्र
Q.14 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते?
1.10.3%
2.11.2%
3.6.3%
4.9.3% Answer: 4.9.3%