GCC TBC Marathi 40 WPM Important Passeges For Practice

MSCE Pune Logo

GCC TBC Marathi 40 WPM Important Passeges For Practice

GCC TBC मराठी ४० श.प्र.मि. महत्वाचे उतारे सरावासाठी

आपण घेऊन आलो आहोत GCC TBC मराठी ४० श.प्र.मि. महत्वाचे उतारे सरावासाठी जी जुलै २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त……….

उतारा क्रमांक १)

जानेवारी ते मार्च च्या दरम्यान शेतकऱ्याकडून या मिरच्या इथं मुंबईत पोहचतात. वाशीच्या मार्केटमधूनही मिरच्यांची खरेदी होते. धने इंदूरहून,मिरी केरळहून, बडीशेप राजस्थानच्या उंजावरून मुंबईत येतात. त्यानंतरमार्चनंतर खऱ्या अर्थानेतिखट,मसाले करायला सुरवात होते. संपूर्ण मार्केटमध्ये  या काळात हजार किलोच्या मिरच्याचा मसाला तयार होतो.

कोल्हापूरची लवंगी इथं लालबाग मध्ये आली तरी आपला ठसका कसा सोडेल,तिला पाहताच तिखटपणा आपल्याला जाणवतोच. त्याठसक्यातच एकबाई भेटल्या.त्या गोणीतल्यामिरच्यांचीदेठ काढत होत्या. आपण मिक्सरवर जरी झणझणीत ठेचा केला तरी हाताची आग नको म्हणून चमच्याने तो वाटीत काढतो.तिथे या बाई देठ काढण्याचं कामअसं भर उन्हात रोज करतात. मिर्चीचतिखट करायचं असेलतर देठ काढावीच लागतात. हि देठ वेगळी करणं अक्षरशः सोहळा असतो, असं म्हंटलं तरी चालेल. एका गोणीत साधारण ३५ किलो मिरच्या असतात. या मिरच्यांची सुरवातीला देठ काढून टाकावी लागतात. ते काद्न्याच काम या महिलांकडे रोजांन दिलं जात. या भागात राहणाऱ्या काही महिला रोज २,३ गोण्या घरी नेऊन देठ काढतात. तर काही दुकानात बसून दोन गोण्या तरी देठ काढून देतात. उन्हाळ्याच्यादिवसात अश्या देठ काढणाऱ्या बायका गल्लीत अगदी  प्रत्येक दुकानाच्या बाहेर दिसतात. आता देठ काढण्यातहिंदी,बंगाली महिलांची संख्या भरपूर वाढली आहे.

उतारा क्रमांक २)

अनेक वर्षापूर्वी आपण आपल्या भवितव्याविषयी एक ध्येय निश्चित केले होते. ते ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा पुन: घेण्याची आज वेळ आली आहे. आज मध्यरात्री सारे जग जेव्हा        शांतझोपलेले असेल तेव्हा भारतात स्वातंत्र्याचा उदयहोऊन नाव चेतन्य भारताला प्राप्त होईल. दीर्घ काळापर्यंत दडपणाखाली असलेले राष्ट्र जागे करणारा , एक युगाचा अंत होऊन नवे युग सुरु करणारा असा दिवस राष्ट्राच्या इतिहासात क्वचितच उगवत असतो. तो दिवस आता भारताच्या इतिहासात उगवणार आहे. अशा या मंगल प्रसंगी भारताची, भारतीय जनतेची आणि त्याहून श्रेष्ठ अशी मानवतेची सेवा करण्याची आज आपण पुन:प्रतिज्ञा घेऊ या.

आजपर्यंत आपण खडतर परिश्रम केले.आपल्याल्या कधी यश आले,कधीअपयशही आले पण मार्गात अनेक अडचणी येऊनही, ज्या उदात्त ध्येयाने आपल्याला सतत प्रेरणा दिली त्या ध्येयाचा आपण कधीही विसर पडू दिलेला नाही. आपला दुर्देवाचा काळ आज संपला असून भारताचे हरपलेले स्वत्वपुन: प्राप्तझाले आहे. आज आपण जे यश साध्य केले आहे ते यश म्हणजे यापुढे यापेक्षाही महान यश साध्य करण्यासाठी मिळालेली संधी आहे. भविष्यकाळाचे आव्हान आपण स्वीकारू या.

स्वातंत्रआणि सत्ता हाती आली म्हणजे ओघाने जबाबदारीही आलीच.आपला भविष्यकाळ आता आराम करण्याचा नाही, तर अनेक वेळा आपण जी प्रतिज्ञा घेतली आणि आजही आपण तिचा पुनरुच्चार करणार आहोत ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करण्याचा आहे, स्वातंत्र्य नंतरऔद्योगिक प्रगती करायची आहे,त्यासाठी निश्चित ध्येय,धोरणे आखून प्रगत भारत घडवू या.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT