GCC TBC Marathi 30 WPM Important Passeges For Practice

MSCE Pune Logo

GCC TBC Marathi 30 WPM Important Passeges For Practice

GCC TBC मराठी ३० श.प्र.मि. महत्वाचे उतारे सरावासाठी

आपण घेऊन आलो आहोत GCC TBC मराठी ३० श.प्र.मि. महत्वाचे उतारे सरावासाठी जी जुलै २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त……….

उतारा क्रमांक १)

प्राचीन मंदिराच्या संकल्पनेची बैठक धर्म हि असली तरी सामाजिक जीवनाचा या मंदिरांशी घनिष्ठ संबंन्ध   आला. सभा मंडपात नृत्य, गायन हे परमेश्वराच्या उपासनेचे साधन मानल्यामुळे निषिद्ध नव्हते व यामुळे या कलांचा विकास होण्यास मदत झाली. याच सभा मंडपात गावाच्या प्रश्नांची चर्चा होत असे.भजने,कीर्तने यासाठी लोक एकत्र येत.तेव्हा देवळे हि धार्मिक,सामाजिक,कलासंस्कृती यांच्या हालचालींची केंद्रे बनली,हे महत्वाचे आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ जवळ तळ्यiकाठचे शिवालय हे यादव काळातील एक उत्कृष्ट मंदिर समजले जाते.दोन चोकोनाच्या विशिष्ट मांडणीतून या मंदिराचा आकार आकर्षकरीत्या आकारला आहे.शिखराची रचना त्रिकोणी मनोऱ्या सारखी असून त्याच्या दोन मजली उन्चीभोवती छोटेखानी वास्तू घटकांची योजना आहे.या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे त्याच्या खांबावरील तक्तपेशीवरील मती गुंग करणारी कलाकुसर होय.

नाशिकजवळ सिन्नर येथील गोदेश्वराचे मंदिर उंच पातळीच्या चौथऱ्यावर डौलदारपणे उभे आहे.मुख्य मंदिराभोवती चार लहान मंदिरे असून प्रवेशद्वाराजवळ नदी मंडप आहे.या मंदिराच्या वास्तूची उंची व एकूण आकाराची व्याप्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.

उतारा क्रमांक २)

आजच्या काळात भल्या मोठ्या बागा दुर्मिळच झाल्या आहेत. ज्यांचे बंगले आहेत,त्यांच्याही घराबाहेर बागेसाठी मोजकीच जागा असते. त्यामुळे किचन गार्डन.टेरेस-बाल्कनी गार्डन्सच घरोघरी दिसतात. कमी जागेत भरपूर झाडे कशी लावावीत,आपलं घर नेमकं कोणत्या ठिकाणी आहे,तिथलं हवा पाणी कसं आहे. जमिनीचा पोत काय आहे याचं परीक्षण करून नेमक कोणत्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत याची माहिती कुणी देणार असेल टर अनेकांना अशा प्रकारच्या सेवा हव्या असतात.पण खरोखरच बागेची देखभाल हे फुलमाळी करतात.

बागकामाची पुस्तकं वाचून त्याविषयीच ज्ञान मिळवण्या इतका वेळ सगळ्याकडे असतोच असे नाही.त्याचप्रमाणे सगळ्यांना बागकामाची आवड असते असंही नाही. घराभोवती छान झाडं असावी एवढीच माफक अपेक्षा असते. तुमची बोट हिरवी असतील,तर तो तुमचा व्यवसाय होऊ शकतो.

हवा,पाणी,उजेड याच परीक्षण करून कोणत्या प्रकारची झाडं, कोणत्या सीझन मध्ये लावावीत याची माहिती असणे गरजेच आहे.त्यासाठी तशी रोपं आणि खत आणि कीटकनाशक उपलब्ध करून घेणं आवश्यक असतं,तशीच सुपीक जमीनही. घर आणि भोवतालची बाग खूप सुंदर दिसते.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT