Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

TCS/IBPS Pattern “Marathi Grammar” Practice Paper 4 : TCS/IBPS पॅटर्न “मराठी व्याकरण सराव पेपर 04

Shanku
शेअर करा:WhatsApp
Talathi Bharti Practice paper

TCS/IBPS Pattern “Marathi Grammar Practice Paper 4

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे २५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS मराठी व्याकरण सराव प्रश्न…………………..

“TCS / IBPS पॅटर्न मराठी व्याकरण सराव पेपर – 4”

1. ‘खेडे’ या शब्दाचे वचन बदला.
(1) खेडी
(2) खेड्यात
(3) खेकडे
(4) खेडा
उत्तर : (1) खेडी
स्पष्टीकरण:
‘खेडे’ हे नाम त्याचे अनेकवचनी नाम ‘खेडी’ असे होईल.

2. ‘बेडूक’ या शब्दाचे लिंग बदला.
(1) बेडके
(2) बेडक्या
(3) बेडकी
(4) बेडका
उत्तर : (3) बेडकी
स्पष्टीकरण: ‘बेडूक’ या शब्दाचे लिंग – बेडकी

3. ‘विकास कविता वाचत आहे.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
(1) कविता
(2) आहे.
(3) वाचत
(4) विकास
उत्तर : (1) कविता
स्पष्टीकरण:
वाचलेली काय ? – कविता मिळणारे उत्तर कर्म असते.

4. ‘परात’ या शब्दाचे वचन बदला.
(1) पराती
(2) परिते
(3) पराते
(4) परात्या
उत्तर : (1) पराती
स्पष्टीकरण:
‘परात’ हे एकवचनी नाम आहे तर त्याचे अनेकवचनी रूप ‘पराती’ असेच होईल.

5. मराठीचे ‘पाणिनी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
(1) बाळशास्त्री जांभेकर
(2) संत तुकाराम
(3) दादोबा तर्खडकर
(4) महात्मा फुले
उत्तर : (3) दादोबा तर्खडकर
स्पष्टीकरण”
मराठीचे पाणिनी – दादोबा तर्खडकर

6. ‘सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(1) पूर्ण वर्तमानकाळ
(2) साधा वर्तमानकाळ
(3) रीति वर्तमानकाळ
(4) अपूर्ण वर्तमानकाळ
उत्तर : (4) अपूर्ण वर्तमानकाळ
स्पष्टीकरण:
‘करत आहेत’ क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचे कळते, म्हणून हे वाक्य अपूर्ण वर्तमानकाळाचे आहे.

7. ‘दास’ या शब्दाचे लिंग बदला.
(1) दासी
(2) नोकर
(3) सेवक
(4) चाकर
उत्तर : (1) दासी
स्पष्टीकरण:
‘दास’ – त्याचे स्त्रीलिंगी ‘दासी’ असे होईल.

8. ‘षटकोनी’ या शब्दाचा समास ओळखा.
(1) समाहार द्वंद्व समास
(2) द्विगु समास
(3) इतरेतर द्वंद्व समास
(4) अव्ययीभाव समास
योग्य उत्तर : (2) द्विगु समास
स्पष्टीकरण:
षटकोनी – सहा कोनांचा समूह
संख्याविशेषण असलेले सामासिक शब्द हे द्विगू समास असतो.

9. ‘मी निबंध लिहिला असेन.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(1) रीतिवाचक भविष्यकाळ
(2) पूर्ण भविष्यकाळ
(3) अपूर्ण भविष्यकाळ
(4) साधा भविष्यकाळ
उत्तर : (2) पूर्ण भविष्यकाळ
स्पष्टीकरण:
“लिहिला असेन” – क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचे कळते, म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण आहे.

10. ‘वृश्चिक’ या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.
(1) साप
(2) विंचू
(3) प्राणी
(4) पाल
उत्तर : (2) विंचू
स्पष्टीकरण
वृश्चिक = विंचू

11. ‘वेळ’ या शब्दाचे वचन बदला.
(1) समय
(2) काळ
(3) वेळा
(4) वेळी
योग्य उत्तर – (3) वेळा
स्पष्टीकरण:
‘वेळ’ – त्याचे अनेकवचन ‘वेळा’ असे होईल.

12. ‘विद्वान’ – या शब्दाचे लिंग बदला.
(1) विधुर
(2) विधवा
(3) विदुषी
(4) विदुर
उत्तर – (3) विदुषी
स्पष्टीकरण:
‘विद्वान’ – त्याचे स्त्रीलिंगी ‘विदुषी’ असे होते.

13. खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.
(1) कवियित्री
(2) कवयित्री
(3) कवयीत्री
(4) कवियत्री
योग्य उत्तर – (2) कवयित्री
स्पष्टीकरण:
शुद्ध शब्द ‘कवयित्री’ आहे.

14. ‘रत्नाकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(1) सूर्य
(2) पर्वत
(3) चंद्र
(4) समुद्र
उत्तर – (4) समुद्र
स्पष्टीकरण:
‘रत्नाकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द समुद्र आहे.

15. ‘लघु’ – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(1) महान
(2) मोठा
(3) दीर्घ
(4) लहान
उत्तर – (3) दीर्घ
स्पष्टीकरण:
‘लघु’ x दीर्घ

16. वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे?
(1) बालकवी
(2) केशवसुत
(3) केशवकुमार
(4) कुसुमाग्रज
उत्तर – (4) कुसुमाग्रज
स्पष्टीकरण:
कुसुमाग्रज = विष्णू वामन शिरवाडकर

17. ‘रामू लाडू खात असे.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(1) रीतिवाचक वर्तमानकाळ
(2) रीतिवाचक भूतकाळ
(3) रीतिवाचक भविष्यकाळ
(4) अपूर्ण भविष्यकाळ
उत्तर : (2) रीतिवाचक भूतकाळ
स्पष्टीकरण:
भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी रीतिवाचक भूतकाळ वापरतात.

18. ‘पंचशील’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
(1) वैकल्पिक द्वंद्व समास
(2) समाहार द्वंद्व समास
(3) इतरेतर द्वंद्व समास
(4) द्विगु समास
उत्तर : (4) द्विगु समास
स्पष्टीकरण:
पंचशील (संख्याविशेषण): पाच शीलांचा समूह

19. ‘सारे पोपट उडालें’ – या वाक्याचा प्रयोग ओळखा.
(1) भावे
(2) अकर्मक कर्तरी प्रयोग
(3) सकर्मक कर्तरी
(4) कर्मणी
उत्तर : अकर्मक कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण:
अकर्मक कर्तरी प्रयोग : अशा प्रकारच्या वाक्यात क्रियापदाने दर्शविलेले क्रिया करणारा आणि सोसणारा एकच असतो. आणि अशा कर्तरी प्रयोगात कर्म आलेले नसते.

20. ‘लिंबू’ शब्दाचे वचन बदला.
(1) लिंबा
(2) लिंबी
(3) लिंबो
(4) लिंबे
उत्तर : (4) लिंबे
स्पष्टीकरण:
‘लिंबू’ शब्दाचे वचन – लिंबे

21.’किमान’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(1) जास्त
(2) कमाल
(3) कमान
(4) कमी
उत्तर : (2) कमाल
स्पष्टीकरण:
किमान x कमाल

22. ‘उदंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(1) भरपूर
(2) पुष्कळ
(3) कमी
(4) निरंक
उत्तर : (3) कमी
स्पष्टीकरण:
उदंड x कमी

23. ‘सून’ या शब्दाचे वचन बदला.
(1) सुना
(2) सासू
(3) सूनी
(4) सासरे
उत्तर : (1) सुना
स्पष्टीकरण:
‘सून’ – त्याचे अनेकवचनी ‘सुना’ असे होईल.

24. ‘मुलांनी पालकांना घेऊन यावे.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
(1) कर्तरी
(2) सकर्मक भावे
(3) कर्मणी
(4) अकर्मक भावे
उत्तर : (2) सकर्मक भावे
स्पष्टीकरण:
भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय असतो.

25. ‘नास्तिक’ चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
(1) आस्तिक
(2) निकोप
(3) तरुण
(4) नायक
उत्तर : आस्तिक
स्पष्टीकरण:
नास्तिक x आस्तिक



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03