करिअरसंबंधी प्रश्नोत्तरे

करिअरसंबंधी प्रश्नोत्तरे

कोणत्या शाखेतून एमबीए करू?

→ मी आता मेकॅनिकल इंजिनीअरिंग कोर्सच्या चौथ्या वर्षाला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर मी कोणत्या शाखेतून एमबीए करणं योग्य ठरेल? एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा आहे?

– मनोज हेगिस्टे

कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्याला एमबीए कोर्सला प्रवेश घेता येईल. मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास असा कोणताही एमबीए कोर्स उपलब्ध नाही. दोन वर्षं कालावधीच्या या कोर्समध्ये तुम्ही ऑपरेशन्स, फायनान्स, एचआर, मार्केटिंग आणि सिस्टम्स यापैकी एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करू शकता. तुम्हाला यापैकी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, याचा आधी विचार करा आणि मगच स्पेशलायझेशनचा विषय ठरवा. मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घ्यायचा तर कॅट, एक्सएटी, मॅट, एटीएमए, सीमॅट, जीमॅट यासारखी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

→ मी बारावी पीसीएम आणि इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे. तर मी शेफचा कोर्स करण्यासाठी पात्र आहे का? तसंच मला करिअरमधील वेगवेगळ्या पर्यायांचीही माहिती द्या. मला चित्रकला आणि पाककला यामध्ये रस आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

– आनंद म्हस्के

हो, नक्कीच तुम्ही हा कोर्स करण्यासाठी पात्र आहात. एक लक्षात घ्या की, काही कोर्स करण्यासाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता पुरेशी ठरते तर काही कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी पास असणं आवश्यक आहे. या कोर्सेसचा कालावधी साधारण एक ते तीन वर्षं असतो. त्यामुळे कोर्सला प्रवेश घेण्याचे पात्रता निकष हे प्रत्येक कोर्सच्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात. त्याचबरोबर तत्सम विषयाचं प्रशिक्षण देणारे सर्टीफिकेट/डिप्लोमा तसंच बॅचलर डिग्री कोर्स या प्रकारात उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला नेमका कोणता कोर्स करायचा आहे, याबद्दलचा तुमचा विचार पक्का झाला की मग पुढची वाटचाल तुम्हाला ठरवता येईल. करिअरसाठी तुमच्याकडे अनेक क्षेत्रांचे पर्याय असू शकतात, पण केवळ त्यात रुची आहे किंवा तुम्हाला अमुक एखादं क्षेत्र आवडतं हा एवढाच निकष त्यासाठी असू शकत नाही. तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं तुम्ही एखाद्या व्यावसायिक काऊन्सेलरची मदत आणि मार्गदर्शन घेतल्यास पुढील योजना आखणं तुम्हाला शक्य होईल.

→ इंग्रजी कसं बोलायचं, हेच मला कळत नाही. घरच्या घरी इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी मला योग्य ते मार्गदर्शन करा.

– प्रियंका घोलप

इंग्रजी बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुम्हाला सर्व पद्धती अवलंबायला हव्या, प्रयत्न करायला हवे. लहान लहान गोष्टींची पुस्तकं मोठ्याने वाचण्यापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. इंग्रजी बातम्या ऐका, इंग्रजी कार्यक्रम किंवा सिनेमा टीव्हीवर पाहता येतील. भाषेवर प्रभूत्व मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारी अनेक अॅप्स आज उपलब्ध आहेत, तुम्हाला या अॅप्सचा पर्याय अवलंबता येईल. इंग्रजीमधील आपले उच्चार, अचूक शब्द जाणून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट्स, ऑनलाइन ट्यूटोरियल्स, अॅप्स यांचा आधार घेता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांशी इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

→ माझा मुलगा बारावी सायन्सला (पीसीएम) होता. त्याला एथिकल हॅकिंगचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर त्यानं कुठे प्रवेश घ्यायला हवा?

त्याला पुढे यात करिअर करता येईल का? कृपया योग्य ते मार्गदर्शन करावं.

– वैभव जाधव

बॅचलर डिग्री (बीएससी/ बीटेक/ बीइ/ बीसीए) इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स आणि त्यानंतर यात मास्टर्स प्रोग्रॅम करणं

किंवा

सायबर सिक्युरिटी अँड एथिकल हॅकिंग या विषयाचा बॅचलर कोर्स पूर्ण करणं. हा कोर्स बऱ्याचशा अभिमत विद्यापीठांमध्ये उपलब्ध असून संबंधित प्रवेश परीक्षा दिल्यावर या कोर्सला तुम्हाला प्रवेश मिळू शकेल.

याव्यतिरिक्त तुमच्या मुलाला काही आंतरराष्ट्रीय सर्टीफिकेशन पूर्ण करावे लागतील उदाहरणार्थ:

– सर्टीफाइड एथिकल हॅकर (इसी काऊन्सिल)

– सर्टीफाइड हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर (इसी काऊन्सिल)

– सॅन आणि जीआयएसी यांचा जीआयएसी सर्टीफाइड पेनीट्रेशन टेस्टर (जीपीइएन)

– सर्टीफाइड इंटरयुशन अॅनालिस्ट (जीसीआयए)

Source: https://maharashtratimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).