परीक्षा लांबणीवर; रद्द नाही: मुंबई विद्यापीठाने केले स्पष्ट

परीक्षा लांबणीवर; रद्द नाही: विद्यापीठाने केले स्पष्ट

‘मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश’ अशी चुकीची बातमी सोशल मीडियावर आली. ही बातमी खोटी असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या २०२० च्या उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या नसून त्या ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

करोना व्हायरसमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, रद्द झालेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाने केले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या ‘पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द’ ही बातमी मॉर्फ करून ‘विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द’ अशी चुकीची माहिती पसरवण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केला आणि विद्यापीठ प्रशासनाला आज मोठा मनस्ताप झाला. परीक्षा रद्द झाल्या का अशी चौकशी विद्यार्थी करू लागले.

याबाबत विद्यापीठाने असे स्पष्टीकरण दिले की, ‘आज मराठीतील एका दैनिकाच्या जुन्या बातमीचे संपादन करून ‘मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश’ अशी चुकीची बातमी सोशल मीडियावर आली. ही बातमी खोटी असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या २०२० च्या उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या नसून त्या ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.’

‘मुंबई विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २३ मार्च २०२० पासून होणाऱ्या सर्व परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तशा आशयाच्या परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहे. या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत तर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ परीक्षा व इतर महत्वाच्या सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्काळ प्रसिद्ध करीत असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. समाजमाध्यमावरील अशा चुकीच्या बातम्या दुसऱ्यास पाठवू नयेत. शासनाच्या निर्देशानुसार परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. त्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील,’असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).