एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std Geography All Chapter Short Questions Answers

MPSC Exam, Saralseva Bharti Preparation Balbharti 9th Standard Geography

वन व तलाठी विभाग परीक्षेसाठी बालभारती इयत्ता 9 वी भूगोल मधून खूप प्रश्न येत आहे. त्यासाठी आम्ही आपल्यासाठी इयत्ता 9 वी भूगोल वर आधारित सराव प्रश्न घेऊन आलो आहोत. याचा तुम्हा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल..

१) वितरण नकाश च्या पुढील पद्धती आहे?

१) टिंब पद्धत

२) क्षेत्रघनी पद्धत

३) समघनी पद्धत

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ४) वरीलपैकी सर्व

२) जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, अशा घटकांच्या वितरणासाठी कोणती पद्धत अधिक सोयीस्कर आहे.

१) टिंब पद्धत

२) क्षेत्रघनी पद्धत

३) समघनी पद्धत

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: १) टिंब पद्धत

३) जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी तेव्हा ते दाखवण्यासाठी कोणत्या पद्‌धतीचा वापर केला जातो.

१) टिंब पद्धत

२) क्षेत्रघनी पद्धत

३) समघनी पद्धत

४) यापैकी नाही

उत्तर: ३) समघनी पद्धत

४) खालीलपैकी कोणत्या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते.

१) भूकंप

२) ज्वालामुखी

३) वरीलपैकी दोन्ही

४) यापैकी नाही

उत्तर: ३) वरीलपैकी दोन्ही

५) भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः कोणाच्या वरच्या थरात होतात?

१) भूकवच

२) प्रावरण

३) गाभा

४) यापैकी नाही

उत्तर: २) प्रावरण

६) अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण कशाच्या आधारावर केले जाते?

१) गती,

२) दिशा

३) भूरूप

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ४) वरीलपैकी सर्व

७) हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख कोणते पर्वत आहेत?

१) गट पर्वत

२) वली पर्वत

३) खचदरी

४) यापैकी नाही

उत्तर: २) वली पर्वत

८) युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार हे जगातील प्रमुख कोणते पर्वत आहेत?

१) गट पर्वत

२) वली पर्वत

३) खचदरी

४) यापैकी नाही

उत्तर: १) गट पर्वत

९) भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात, त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच काय होय?

१) वली पर्वत

२) गट पर्वत

३) खचदरी

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ३) खचदरी

१०) भूकंपाची तीव्रता कोणत्या  एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात?

१) पास्कल

२) रिश्टर

३) केल्विन

४) मीटर

उत्तर: २) रिश्टर

११) भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी कसे असते?

१) समांतर

२) लंबरूप

३) तिरके

४) यापैकी नाही

उत्तर: २) लंबरूप

१२) भूकंप लहरींचे किती प्रकार पडतात?

१) एक

२) दोन

३) तीन

४) चार

उत्तर: ३) तीन

१३) दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves) फक्त कोणत्या पदार्थांतून प्रवास करतात?

१) स्थायू (घन)

२) द्रव

३) वायू

४) वरील सर्व

उत्तर: १) स्थायू (घन)

१४) सर्वात विनाशकारी लहरी कोणत्या आहे?

१) प्राथमिक लहरी

२) दुय्यम लहरी

३) भूपृष्ठ लहरी

४) यापैकी नाही

उत्तर: ३) भूपृष्ठ लहरी

१५) जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो हि कोणत्या ज्वालामुखीची उदाहरणे आहे?

१) केंद्रीय ज्वालामुखी

२) भेगीय ज्वालामुखी

३) वरील दोन्ही

४) यापैकी नाही

उत्तर: १) केंद्रीय ज्वालामुखी

१६) भारतातील दख्खनचे पठार कोणत्या ज्वालामुखीची उदाहरणे आहे?

१) केंद्रीय ज्वालामुखी

२) भेगीय ज्वालामुखी

३) वरील दोन्ही

४) यापैकी नाही

उत्तर: २) भेगीय ज्वालामुखी

१७) अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह मध्ये कोणते एकमेव जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे?

१) सडल बेट

२) बॅरन बेट

३) लक्षद्वीप

४) यापैकी नाही

उत्तर: २) बॅरन बेट

१८) कायिक विदारण मुख्यतः खालील कारणांमुळे घडून येते.

१)  तापमान , दहिवर

२) स्फटिकांची वाढ

३) दाबमुक्ती, पाणी

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ४) वरीलपैकी सर्व

१९) अहमदनगर जिल्ह्यातील कोठे येथे चुनखडीचे रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते.

१) दायमाबाद

२) वडगाव दर्या

३) पाथर्डी

४) शेवगाव

उत्तर: २) वडगाव दर्या

२०) रासायनिक विदारण चे पुढील प्रकार आहे?

१) कार्बनन

२) द्रवीकरण

३) भस्मीकरण

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२१) नदीच्या खनन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) घळई,

२) ‘व्ही’ (V) आकाराची दरी

३) धबधबा

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२२) नदीच्या संचयन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) पंखाकृती मैदान

२) पूरतट व पूरमैदान

३) त्रिभुज प्रदेश

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२३) हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) हिमगव्हर

२) शुककूट, गिरिशृंग

३) ‘यू’ (U) आकाराची दरी, लोंबती दरी

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२४) हिमोढगिरी, हिमोढकटक इत्यादी भूरूपे कशी तयार होतात?

१) नदीच्या संचयन कार्यामुळे

२) हिमनदीच्या खनन कार्यामुळे

३) हिमनदीच्या संचयन कार्यामुळे

४) नदीच्या खनन कार्यामुळे

उत्तर: ३) हिमनदीच्या संचयन कार्यामुळे

२५) वाऱ्याच्या खनन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) भूछत्र खडक

२) अपक्षरण खळगे

३) यारदांग

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२६) वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) बारखाण,

२) सैफ

३) ऊर्मिचिन्हे, लोएस मैदान

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२७) सागरी लाटाच्या खनन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) तरंगघर्षित मंच,

२) सागरी गुहा, सागरी कडा

३) सागरी कमान, सागरी स्तंभ

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२८) सागरी लाटाच्या संचयन कार्यामुळे खालील भूरूपे तयार होतात?

१) पुळण

२) वाळूचा दांडा

३) खाजण

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

२९) पृथ्वीचा किती भाग जलयुक्त आहे.

१) २१%

२) ७०.८%

३) ४९%

४) ५१%

उत्तर: २) ७०.८%

३०) वृष्टीची प्रमुख रूपे पुढील आहेत?

१) हिम

२) गारा

३) पाऊस

४) वरील सर्व

उत्तर: ४) वरील सर्व

३१) आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व द. अमेरिकेतील अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्‍तीय भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

१) आरोह प्रकारचा पाऊस

२) प्रतिरोध प्रकारचा पाऊस

३) आवर्त प्रकारचा पाऊस

४) यापैकी नाही

उत्तर: १) आरोह प्रकारचा पाऊस

३२) नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल हि आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास काय म्हणतात?

१) आरोह पर्जन्य

२) आवर्त पर्जन्य

३) आम्ल पर्जन्य

४) प्रतिरोध पर्जन्य

उत्तर: ३) आम्ल पर्जन्य

३३) सागरजलाची क्षारता मोजण्यासाठी कोणत्या  उपकरणांचा वापर केला जातो?

१) हायड्रोमीटर

२) रिफ्रॅक्टोमीटर

३) सॅलिनोमीटर

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ४) वरीलपैकी सर्व

३४) भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता किती आहे?

१) ३९‰

२) ३४‰

३) ३६‰

४) ३८‰

उत्तर: १) ३९‰

३५) इस्राईल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता किती आहे?

१) ३५२‰

२) ३३२‰

३) ३४२‰

४) ३२२‰

उत्तर: २) ३३२‰

३६) कोणत्या साली वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्त्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली.

१) १८६४

२) १८८४

३) १८७४

४) १८९४

उत्तर: २) १८८४

३७) अमर्याद गरजा (हाव) आणि मर्यादित, दुर्मीळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र कशाला म्हणतात?

१) भूगोल

२) समाजशास्त्र

३) अर्थशास्त्र

४) विज्ञान

उत्तर: ३) अर्थशास्त्र

३८) अर्थव्यवस्थेचे प्रकार पुढीलपैकी आहे?

१) भांडवलशाही अर्थव्यवस्था

२) समाजवादी अर्थव्यवस्था

३) मिश्र अर्थव्यवस्था

४) वरीलपैकी सर्व

उत्तर: ४) वरीलपैकी सर्व

३९) ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या ‘राष्ट्रांची संपत्ती’ (Wealth of Nations) हा ग्रंथ कोणत्या साली प्रसिद्ध केला?

१) १९७६

२) १८७६

३) १७७६

४) १९८६

उत्तर: ३) १७७६

४०) जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, तेव्हा त्या क्रियेला काय म्हणतात?

१) यापैकी नाही

२) आयात

३) निर्यात

४) पर्याय २ व ३

उत्तर: ३) निर्यात

४१) जागतिक व्यापार संघटना (WTO) (World Trade Organization) चे मुख्यालय कोठे आहे?

१) ब्रुसेल्स (बेल्जियम)

२) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

३) काठमांडू (नेपाळ)

४) शांघाय (चीन)

उत्तर: २) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

४२) आसियान (ASEAN) (Association of South-East Asian Nations) चे मुख्यालय कोठे आहे?

१) ब्रुसेल्स (बेल्जियम)

२) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

३) जाकार्ता (इंडोनेशिया)

४) शांघाय (चीन)

उत्तर: ३) जाकार्ता (इंडोनेशिया)

४३) ब्रिक्स (BRICS) (Brazil, Russia, India, China and South Africa.) चे मुख्यालय कोठे आहे?

१) ब्रुसेल्स (बेल्जियम)

२) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

३) जाकार्ता (इंडोनेशिया)

४) शांघाय (चीन)

उत्तर: ४) शांघाय (चीन)

४४) सार्क (SAARC) (South Asian Association for Regional Co-operation) चे मुख्यालय कोठे आहे?

१) ब्रुसेल्स (बेल्जियम)

२) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

३) काठमांडू (नेपाळ)

४) शांघाय (चीन)

उत्तर: ३) काठमांडू (नेपाळ)

४५) युरोपियन संघ (EU) (European Union) चे मुख्यालय कोठे आहे?

१) ब्रुसेल्स (बेल्जियम)

२) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

३) काठमांडू (नेपाळ)

४) शांघाय (चीन)

उत्तर: १) ब्रुसेल्स (बेल्जियम)

४६) विकसित नगरांना माहितीसंप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि या शहरांतील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी कोणती योजना आकाराला आली?

१) स्मार्ट पिपल योजना

२) स्मार्ट विलेज योजना

३) स्मार्ट सिटी योजना

४) यापैकी नाही

उत्तर: ३) स्मार्ट सिटी योजना

४७) कोयना धरणाच्या परिसरात कोणता जलाशय पसरलेला आहे?

१) रामसागर

२) शिवसागर

३) शक्तीसागर

४) गोविंदसागर

उत्तर: २) शिवसागर

४८) रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात प्रथम कोणत्या मार्गावर झाली?

१) मध्य रेल्वे

२) कोकण रेल्वे

३) पश्चिम रेल्वे

४) दक्षिण रेल्वे

उत्तर: २) कोकण रेल्वे

४९) कोणती रेल्वे गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे.

१) वंदे भारत रेल्वे

२) महाराष्ट्र एक्प्रेस

३) डेक्कन ओडिसी

४) यापैकी नाही

उत्तर: ३) डेक्कन ओडिसी

५०) महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने कोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचेस्कूबा डायव्हिंगप्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे?

१) हरिहरेश्वर

२) तारकर्ली

३) रत्नागिरी

४) मुंबई

उत्तर: २) तारकर्ली

Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exams (Maharashtra Public Service Commission).

Balbharti textbooks are one of the important study materials when it comes to preparation of MPSC Competitive Exam (Preliminary) / Recruitment Exam. Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exam (Competitive / Recruitment Exam / Departmental Exam).

In this article, We are providing Balbharti 9th Standard Geography study material in Marathi for MPSC Exams 2020. These study material will be very helpful for those candidates who are preparing for MPSC Exam.

या लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा  IX भूगोल अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.


Geography Class 9 (IX)

अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?

भूरूपांवर

गतीवर

दिशेवर

उत्तर:- गतीवर

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std Geography All Chapter Short Questions Answers

मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो?

दाब

ताण

पर्वत

उत्तर:- ताण

खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?

ताण

दाब

अपक्षय

उत्तर:- दाब

खालीलपैकी ‘वली पर्वत कोणता?

सातपुडा

हिमालय

पश्चिम घाट

उत्तर:- हिमालय

विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?

पर्वतनिर्माणकारी

खंडनिर्माणकारी

क्षितिजसमांतर

उत्तर:- खंडनिर्माणकारी

भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

उत्तर:- चुकीचे

आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

उत्तर:- योग्य

शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

उत्तर:- योग्य

खडकांचा चुरा कि ंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

उत्तर:- योग्य

अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते

उत्तर:- चुकीचे

तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होतेे.

उत्तर:- योग्य

वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

उत्तर:- चुकीचे

भूजलाचे कार्य मृदूखडकांच्या प्रदेशात जास्त होते.

उत्तर:- चुकीचे

वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असत

उत्तर:- योग्य

हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

उत्तर:- चुकीचे

एमपीएससी तयारी: Balbharti 8th Std History All Chapter Short Questions Answers

मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.

उत्तर:- चुकीचे

नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

उत्तर:- योग्य

हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

उत्तर:- चुकीचे

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?

(१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

(२) पश्चिमेकडून पूर्वेकडे.

(३) दक्षिणेकडून उत्तरेकडे.

(४) उत्तरेकडून दक्षिणेकडे.

उत्तर:- (१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर  किती वाजले असतील?

(१) बुधवार सकाळचे सहा.

(२) बुधवार रात्रीचे नऊ.

(३) गुरुवार दुपारचे दोन.

(४) गुरुवार संध्याकाळचे सहा.

उत्तर:- (२) बुधवार रात्रीचे नऊ.

जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?

(१) ०°

(२) ९०पूर्व

(३) ९०°पश्चिम

(४) १८०°

उत्तर:- (१) ०°

पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?

(१) पूर्व

(२) पश्चिम

(३) उत्तर

(४) दक्षिण

उत्तर:- (१) पूर्व

एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std History All Chapter Short Questions Answers

आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?

(१) जी. पी. एस. प्रणाली.

(२) संरक्षण खाते.

(३) वाहतुकीचे वेळापत्रक.

(४) गोलार्ध ठरवण्यासाठी.

उत्तर:- (३) वाहतुकीचे वेळापत्रक.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

 

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).