पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या 〉 Maha Police Bharti First Field Test

‘राज्यातील पोलिस भरतीची परीक्षा पूर्वीच्या नियमांप्रमाणे घेण्यासोबतच, या परीक्षेबाबत गेल्या सरकारने काढलेला शासन निर्णय रद्द करावा,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Also See: Maharashtra Police Bharti 2022 GR

राज्य सरकारने पोलिस भरतीच्या परीक्षेमध्ये जानेवारी २०१९ मध्ये शासन निर्णयाद्वारे बदल केले. या भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षेला महत्त्व देण्यात आले असून, मैदानी चाचणीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. या भरती परीक्षेतील बदलांमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची तक्रार उमेदवारांकडून होत आहे. त्यामुळे राज्यात पोलिस भरतीची परीक्षा पूर्वीप्रमाणे घेण्याची मागणी सातत्याने उमदेवारांकडून करण्यात येत आहे. या अनुषंगाने खासदार सुळे य़ांनी पोलिस भरती परीक्षा पूर्वीच्या निकषाप्रमाणे घेण्याची मागणी केली आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्वस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. यासाठी ते शारीरिदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस भरती प्रक्रियेतील उमेदवार मैदानी चाचणीद्वारे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, हे पाहिले जाते. गेल्या सरकारने मैदानी चाचणीपेक्षा लेखी परीक्षेचे महत्त्व वाढवून भरतीप्रक्रियेत अचानकपणे अन्यायकारक बदल केला. या बदलाचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य उेमदवारांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ‘गेल्या राज्य सरकारने १८ जानेवारी २०१९ रोजी या परीक्षेसंदर्भात काढलेला सरकारी निर्णय मागे घ्यावा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी पदांची संख्या वाढविण्यासोबत विविध पदभरतीच्या परीक्षांचे वेळापत्रक वर्षभरापूर्वी जाहीर करावे,’ अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या

  • पोलिस भरतीची लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे घेऊ नये.
  • मैदानी चाचणी झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घ्यावी.
  • मैदानी चाचणीही लेखी परीक्षेप्रमाणे १०० गुणांसाठी व्हावी.

Source : https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.