करोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन

करोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन

‘करोना’ मुळे देशात ‘लॉकडाउन’ घोषित झाल्याने, चालू शैक्षणिक वर्षात साधारण एक ते दीड महिन्याचा खंड पडला आहे. त्यामुळे येत्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षावर याचा प्रतिकूल परिणाम होणार असून, अकरावी प्रवेश, आरटीई प्रवेश, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आगमी शैक्षणिक वर्ष विस्कळित होणार आहे.

राज्यात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा आणि विविध विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. कृषी, अकृषी, अभिमत विद्यापीठांना आता १५ एप्रिलनंतर परीक्षांचे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. त्यामुळे या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. या कारणाने यंदा शैक्षणिक वर्षाचा मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. दहावीचा आणखी एक पेपर उर्वरित असून, त्यानंतर निकाल लागणार आहे. त्याचा फटका अकरावी प्रवेशाला बसणार आहे. परीक्षाच वेळेवर होणार नसल्यामुळे पुढचे सर्व शैक्षणिक वर्षच विस्कळित होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाठोपाठ राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या, तर १ एप्रिलपासून परीक्षा नियोजनानुसार घेण्यात येणार होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहणार असल्याची घोषणा केल्याने विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागणार आहेत.

दर वर्षी मार्चमध्ये परीक्षा सुरू झाल्या, की त्या जूनपर्यंत सुरूच असतात. दर वर्षी उन्हाळी सत्रात विद्यापीठांमध्ये चार विद्याशाखांतून ३०० पेक्षा अधिक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेसाठी दर वर्षी लाखो विद्यार्थी बसतात. आता या परीक्षा कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. त्यातच ‘आरटीई’ची प्रवेशाची लॉटरी जाहीर झाली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

Source: https://maharashtratimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).