SRPF Gr 19 Kusadgaon/ Jalgoan Police Bharti 2019 Exam Question Paper: SRPF Gr 19 कुसडगाव/ जळगाव पोलीस भरती 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका

SRPF Gr 19 Kusadgaon/ Jalgoan Police Bharti 2019 Exam Question Paper

SRPF Gr 19 Kusadgaon/ Jalgoan Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 19 कुसडगाव/जळगाव पोलीस शिपाई 2019

Exam Date- दि. 13 डिसेंबर 2021

1.खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पध्दती नाही?

1) उत्पादन पध्दती

2) आयात निर्यात पध्दती

3) उत्पन्न पध्दती

4) खर्च पध्दती

उत्तर:2) आयात निर्यात पध्दती

 

2.खालीलपैकी समासघटित विशेषण सांगा.

1) सुंदर मुलगी

2) धर्मवीर संभाजी

3) राजा हरिश्चंद्र

4) आजन्म कारावास

उत्तर: 4) आजन्म कारावास

 

 1. एका ठरावीक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?

1)7000 रु.

2)8000 रु.

3) 8500रु.

4) 10450 रु.

उत्तर:2)8000 रु.

 

 1. खाली दिलेले शब्द तार्किक व अर्थपूर्ण पध्दतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा.

अ. पृथ्वी ब. शनि क. गुरु. ड. बुध इ. शुक्र फ. मंगळ

1) इ, ड, क, ड, ब, अ, फ

2) ड, इ, अ, फ, क, ब

3) फ, क, ड, अ, ब, इ

4) क, अ, ड, ब, इ, फ

उत्तर:2) , , , , ,

 

5.13_2_3021_0_

1) 0321

2) 0132

3) 3120

4) 1320

उत्तर:2) 0132

 

 1. 20 भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्त्यांमुळे झाले आहे?

1) 73.74 वी घटनादुरुस्ती

3) 45.46 वी घटनादुरुस्ती

2) 42.43 वी घटनादुरुस्ती

4) 75, 76 वी घटनादुरुस्ती

उत्तर: 1) 73.74 वी घटनादुरुस्ती

 

7.चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केलातर त्या गोलाची त्रिज्या किती?

1) 6 सेंमी

2)7 सेमी

3) 8 सेमी

4) 9 सॅमी

उत्तर: 1) 6 सेंमी

 

8.पुढील प्रश्नांत आकृत्यांचा संच दिलेला आहे. त्यापैकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्या विशिष्ट बाबतीत समान आहेत. अशी इतररांपेक्षा वेगळी (विसंगत ) असणारी आकृती शोधून काढा.

J F T N

1      2     3     4

1) 1

2) 2

3) 3

4) 4

उत्तर:3) 3

 

9.जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस ………. म्हणतात.

1) केंद्रकीय संम्मीलन

2) केंद्रकीय विखंडीकरण

3) रासायनिक प्रक्रिया

4) संयोग प्रक्रिया

उत्तर:2) केंद्रकीय विखंडीकरण

 

10.एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लीटर पाणी टाकले, तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?

1) 35 ली.

2) 24 ली.

3) 18 ली.

4) 29 ली.

उत्तर:2) 24 ली.

 

 1. 5/36:7/64:9/100:?

1)13/169

2)11/144

3) 11/121

4) 12/128

उत्तर:2)11/144

 

 1. तापमानात 1° से.ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग…… इतका वाढतो.

1)0.2 मी/से

2) 2 मी/से

3) 0.6 मी/से

4) 11 मी/से

उत्तर:3) 0.6 मी/से

 

 1. वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षापुर्वी एकूण झाडांची संख्या किती होती?

1) 30000

2) 31000

3) 28500

4) 30500

उत्तर: 1) 30000

 

 1. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

1) मराठा

2) केसरी

3) ज्ञानप्रकाश

4) दर्पण

उत्तर: 2) केसरी

 

 1. खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.

1) सळसळ, खळखळ, थरथर, कूडकूड

2) नासका, सडका, कुजका, खराब

3) हुशार, चलाख, तरबेज, पारंगत

4) मोडले, उघडले, तोडले, बांधले

उत्तर:1) सळसळ, खळखळ, थरथर, कूडकूड

 

 1. काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.

1) शिक्षिका

2) देवघर

3) पेटी

4) दांडी

उत्तर: 4) दांडी

 

 1. जर 484×144 = 69696 तरवर्गमुळात169.696/14.4=?

1) 2.2

2) 2.22

3) 4.84

4) 48.4

उत्तर:1) 2.2

 

 1. 0.57, 9.5 यांचा मसावी आणि लसावी काढा.

1) मसावी 0.4, लसावी -16.8

2) मसावी 0.18 लसावी -0.019

3) मसावी 0.09 लसावी-2:85

4) मसावी 0.19 लसावी -28.5

उत्तर:4) मसावी 0.19 लसावी –28.5

 

 1. तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा?

1) त+र+अ+ष+ण+आ

2) त+र+ष+ण+आ

3) त+ऋ+ष+ण+आ

4) त+ऋ+ष+ण+अ

उत्तर:3) त+ऋ+ष+ण+आ

 

 1. एका समलंब चौकोनामध्ये समांतर खाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेंमीआणि 15 सेंमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंमीअंतरावर आहे तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?

1) 50 सेमी

2) 25 सेमी

3) 70 समी

4) 100 मी

उत्तर:1) 50 सेमी

 

 1. खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल?

4, 196, 16, 144, 36, 100, 64, X

1) 48

2) 64

3) 125

4) 256

उत्तर:2) 64

 

 1. जर BICYCLE हा C3DZDM2 शब्द असा लिहिला तर LABOURहा शब्द कसा लिहाल?

1) MIC45S

2) MIC4V5

3) MBCPSS

4) MBC4S

उत्तर:1) MIC45S

 

 1. विधान 1. काही गाजर वांगे आहेत. 2. काही वांगे सफरचंद आहेत
 2. सर्व सफरचंद केळी आहेत.

निष्कर्ष: काही सफरचंद गाजर आहेत. 2. काही केळी वांगे आहेत.

 1. काही केळी गाजर आहेत

1) फक्त निष्कर्ष सत्य

2) फक्त निष्कर्ष 2 सत्य

3) फक्त निष्कर्ष 3 सत्य

4) फक्तं निष्कर्ष 2 व 3 सत्य

उत्तर:2) फक्त निष्कर्ष 2 सत्य

 

 1. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.

मीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहिण

1) स्त्री, नपुंसक, पुल्लिंग, स्त्री

2) नपुंसक, स्त्री, स्त्री पुल्लिंग

3) पुल्लिंग, पुल्लिंग, स्त्री, नपुंसक

4) पुल्लिंग, नपुंसक, स्त्री, स्त्री

उत्तर:1) स्त्री, नपुंसक, पुल्लिंग, स्त्री

 

 1. गोगलगाय………या संघात मोडते.

1) मोलुस्का

2) आर्थोपोडा

3) इकायनोडर्माटा

4) नेमॅटोडा

उत्तर:1) मोलुस्का

 

 1. दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. असा योग्य पर्याय निवडा.

2×3+6-12÷4=17

1) Xआणि +

2) + आणि-

3) + आणि ÷

4) -आणि÷

उत्तर:1) X आणि +

 

 1. श्री X यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो, जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल?

1) सोमवार

2) गुरुवार

3) शनिवार

4) रविवार

उत्तर:2) गुरुवार

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा?

1) 100

2) 105

3) 200

4) 6

उत्तर:1) 100

 

29.रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे……

1) धमनीकाठिण्यता

2) परिहृदरोग

3) अतिलठठपणा

4) उच्चताण

उत्तर:4) उच्चताण

 

 1. मुंबई येथे प्रचारसभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचारसभेत किती आमदार असतील?

1) 12

2) 14

3) 10

4) 16

उत्तर:1) 12

 

 1. सागरी (नॅटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?

1) 1 कि.मी.

2) 1.25 कि.मी.

3) 1.5 कि.मी.

4) 1.85 कि.मी

उत्तर:4) 1.85 कि.मी

 

 1. पोलीस हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे?

1) केंद्रसुची

2) राज्यसुची

3) समवर्तीसुची

4) यापैकी नाही

उत्तर:2) राज्यसुची

 

 1. इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?

1) मोहम्मद तुघलक

2) अल्लाऊद्दीन खिल्जी

3) सिकंदर लोधी

4)इब्राहिम लोधी

उत्तर:3) सिकंदर लोधी

 

 1. शी! किती घाण आहे! या वाक्यातील अव्ययांचा प्रकार ओळखा.

1) उभयान्वयी

2) शब्दयोगी

3) केवलप्रयोगी

4) यापैकी नाही

उत्तर:3) केवलप्रयोगी

 

 1. पुढील विधान वाचा. प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलीवाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनीजोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.

1) पूर्वाध बरोबर

2) उत्तरार्ध बरोबर

3) संपूर्ण विधान बरोबर

4) संपूर्ण विधान चूक

उत्तर:3) संपूर्ण विधान बरोबर

 

 1. एक खलाशी 48 कि.मी. चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी (प्रवाहाच्या विरुध्द दिशेने) 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल?

1) 0.5 किमी/तास

2) 1 किमी/तास

3) 1.5 किमी/तास

4) 2 किमी/तास

उत्तर:2) 1 किमी/तास

 

 1. मूधर्न्य वर्ण ओळखा.

1) घ्

2) खू

3) ब्

4) ट्

उत्तर:4) ट्

 

38.(-85)/ (-17) × (-13) / (-91) ×(-69)/23 =?

1) 19/ 84

2) -19/ 60

3) -7/12

4)-15/7

उत्तर:4)-15/7

 

 1. एक 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?

1) 3 सेंमी

2) 4 सेंमी

3) 2 सेंमी

4) 1.5 सेंमी

उत्तर:3) 2 सेंमी

 

 1. 3 2/3 + 6 7/12+ 4 9/36+5+7 1/12या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता पूर्ण संख्या मिळेल?

1)1/15

2)1/5

3) 7/12

4)2/5

उत्तर:1)1/15

 

 1. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाची मिश्रण होते म्हणून याला……….. प्रयोग म्हणतात.

1) कर्म-भाव संकर प्रयोग

2) कर्तृ-कर्म संकर प्रयोग

3) कर्तृ-भाव संकर प्रयोग

4) पुराण कर्मणी प्रयोग

उत्तर:2) कर्तृ-कर्म संकर प्रयोग

 

 1. जर 0.75: X:: 5:8 तर X ची किंमत किती?

1) 1.12

2) 1.20

3) 1.25

4) 1.30

उत्तर:2) 1.20

 

 1. योग्य विरामचिन्ह दिलेल्या वाक्याची अचूक निवड करा.

1) सोड, मला! तो जोराने ओरडला.

2)’ सोड मला, ‘तो जोराने ओरडला.

3) सोड मला! तो जोराने ओरडला.

4) ‘ सोड मला “, तो जोराने ओरडला.

उत्तर:4) ‘ सोड मला “, तो जोराने ओरडला

 

 1. खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा.

1) व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते.

2) ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात.

3) दिर्घस्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घश्वास घ्यावा लागतो.

4) स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात.

उत्तर: 3) दिर्घस्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घश्वास घ्यावा लागतो.

 

 1. चार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पाहोचला. अशोक 6.15pmवाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनीटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30pm वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00pmवाजता पोहोचला. तर 6.00pm वाजता कोण पोहोचला?

1) अजय

2) अरुण

3) अनिल

4) अशोक

उत्तर:3) अनिल

 

 1. मिली, दीप, डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एकजण याप्रमाणे उभे आहेत. डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत. पिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही. टेबलाच्या पृष्ठभागावर मधोमधी भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे. दिपने काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटिवत दिशेने काटकोनातून फिरवला. मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलत्या तर आता मिलीच्या बाजूला असलेला नकाशातील भाग निवडा.

1) अरबी समुद्र

2) बंगालचा उपसागर

3) हिंदी महासागर

4) हिमालयाच्या रांगा

उत्तर:2) बंगालचा उपसागर

 

 1. एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कॉम्प्युटर प्रत्येकी 4000 रुपयास खरेदी केले, त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी 20000 रु. खर्च झाला. त्याने प्रत्येक कॉम्प्युटरची छापील किंमत 5000 रु. ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किंमतीवर 10% सुट देण्याचे ठरविले तर या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती ?

1) 4%

2) 10%

3) 8%

4) 6%

उत्तर:3) 8%

 

 1. पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगारामू घाईने घरातून बाहेर आला.

1) चार

2) तीन

3) दोन

4) एक

उत्तर: 3) दोन

 

 1. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुमारे 400 वर्षापुर्वीचे एक भला मोठा वडाचा वृक्ष होता. महामार्ग बनविण्यासाठी त्या वृक्षाची तोडणी करण्यात आली. वृक्ष तोडल्यानंतर त्याची मापणे पुढीलप्रमाणे होती.

वृक्षाचा1/4 भाग जमिनीत म्हणजेचे मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांदयांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?

1) 23 एकक

2) 42 एकक

3) 36 एकक

4) 54 एकक

उत्तर:3) 36 एकक

 

 1. आपल्या या शब्दाचे भाववाचक रुप कोणते?

1) आपण

2) आपुलकी

3) आम्ही

4) आपली

उत्तर: 2) आपुलकी

 

 1. खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते?

अ. सर्वनामे अनेकवचनी असतात.

ब. सर्वनामाच्या अनेकवचनांना प्रत्यय असतात.

क. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच नामाचा वापर होतो.

ड. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते.

1) फक्त अ आणि ब बरोबर

2) फक्त क बरोबर

3) फक्त ब आणि क बरोबर

4) फक्त ड बरोबर

उत्तर:4) फक्त ड बरोबर

 

 1. बाळासाहेबांनी समजावून सांगितले; म्हणून त्याने हे काम केले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय…….. प्रकारातील आहे.

1) परिणामबोधक

2) उद्देशबोधक

3) संकेतबोधक

4) कारणबोधक

उत्तर:1) परिणामबोधक

 

 1. प्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिद्रियांना आधार देतात व ऊंतींची झीज भरुन काढतात.

1) अस्थिबंध

2) अक्षतंतू

3) विरल ऊती

4) मूल ऊती

उत्तर:3) विरल ऊती

 

 1. पाच वर्षापुर्वी बीणाचे वय आरतीच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षापुर्वी बीणाचे वय चित्राच्या वयाच्या निम्मे होते. जरचित्राचे सध्याचे वय या अक्षराने दर्शविले. तर आरतीचे वयखालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविले जाईल ?

1) (C-10) /3

2) C/6 +5

3) 3C-5

4) 5C /3 -10

उत्तर:2) C/6 +5

 

 1. 1मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो?

.1) एड्सविरोधी दिन

2) शिक्षक दिन

3) जागतिक कामगार दिन

4) यापैकी नाही

उत्तर:3) जागतिक कामगार दिन

 

 1. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

1) उरण

2) खापरखेडा

3) अंबरनाथ

4) परळी

उत्तर:3) अंबरनाथ

 

 1. फाश्याच्या दोन अवस्था दिलेल्या आहेत?

 

2 च्या विरुध्द अंगास कोणती संख्या असेल?

1) 1

2) 6

3) 4

4) 5

उत्तर:4) 5

 

 1. रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे. परंतु महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश ऐवढाच आहे. परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे, तर. अ. अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे.

ब. अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे.

क. अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे.

ड. अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते कोणती विधाने बरोबर आहे/आहेत.

1) अ आणि ड

2) ब आणि क

3) फक्त ड

4) फक्त क

उत्तर: 4) फक्त क

 

59…….. ही अशुध्द धातूचे शुध्दीकरण करण्याची सर्वात व्यापक पध्दत आहे.

1) औष्णिक अपघटन

2) विद्युत अपघटन

3) प्रक्षालन

4) निस्तापन

उत्तर: 2) विद्युत अपघटन

 

60.एका पिशवीमध्ये 13 पांढरे आणि 7 काळे चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर ते दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता किती?

1) 41/ 190

2) 21/190

3) 59/190

4) 99/190

उत्तर:4) 99/190

 

 1. जर 2256 ला 17 ने भागले तर बाकी शोधा.

1) 1

2) 2

3) 3

4) 5

उत्तर:1) 1

 

 1. खालीलपैकी शुध्द शब्दयोगी अव्यय ओळखा.

1) कुत्रासुध्दा

2) घराच्याबाहेर

3) गावोगावी

4) मांडवाखाली

उत्तर: 1) कुत्रासुध्दा

 

 1. ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातीलविधेयविस्तार कोणते?

अ. ताजमहाल ब.शारदीय पौर्णिमेत क.अधिकच देखणा ड. दिसतो

1) अ, ड, बरोबर बाकी सर्व चूक

2) फक्त क बरोबर बाकी सर्व चूक

3) फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक

4) ब, क बरोबर बाकी सर्व चूक

उत्तर: 3) फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक

 

 1. A, B आणि C यांच्या पगाराचे गुणोत्तर 7:9:12 आहे आणि A त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 8:9:15 आहे जर हा त्याच्या पगाराच्या 1/ 4 भागाची बचत करतो तर A, Bआणि C यांच्या बचतीचे गुणोत्तर किती?

1) 56:99:69

2) 69:56:99

3) 99:56:69

4) 99:69:56

उत्तर:1) 56:99:69

 

 1. वडिलांचा पारा क्षणोक्षणी वाढत होता. या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

1) स्थितीदर्शक

2) आवृत्तीदर्शक

3) कालदर्शक

4) सातत्यदर्शक

उत्तर: 2) आवृत्तीदर्शक

 

 1. किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरुन A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत?

1) 9

2) 12

3) 14

4) 18

उत्तर:2) 12

 

 1. 4DK चा 15BI शी जसा संबंध आहे, तसा संबंध खालीलपैकी कोणाचा 35TW शी आहे?

1) 8YV

2) 6VY

3) 30WT

4) 7VW

उत्तर:2) 6VY

 

 1. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापुर्वी शब्दाच्या मुळरुपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात?

1) सामान्यरुप

2) अव्यय

3) शब्दसिध्दी

4) प्रत्यय

उत्तर: 1) सामान्यरुप

 

 1. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजु अनुक्रमे 16 सेंमी आणि 10 सेंमी असतील तर समभुज त्रिकोणाची बाजू किती?

1) 9.5 सेंमी

2) 12.5 सेंमी

3) 10.5 सेंमी

4) यापैकी नाही

उत्तर: 3) 10.5 सेंमी

 

 1. MSTUNUNMSTSTUNMNMST???NMS

1) UTU

2) STM

3) UTS

4) MSU

उत्तर:1) UTU

 

 1. खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.

अ. नाम हा अविकारी शब्द आहे.

ब. एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.

क. जेव्हा एखाद्या वस्तुला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

ड. गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असेम्हणतात.

1) फक्त अ बरोबर

2) फक्त ब व क बरोबर

3) फक्त ड बरोबर

4) फक्त ब आणि ड बरोबर

उत्तर: 3) फक्त ड बरोबर

 

 1. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

1) न्या. एस. के. दार

2) एस. के. पाटील

3) ब्रिजलाल बियाणी

4) काकासाहेब गाडगीळ

उत्तर:1) न्या. एस. के. दार

 

 1. अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ठ नाही?

1) वाशिम

2) वर्धा

3) यवतमाळ

4) अकोला

उत्तर:2) वर्धा

 

 1. अ व ब यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला. अ ने2000 रु. व ब ने 3000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर क ने त्यात 1000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर ब ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5200 रु. नफा झाला. त्यातील ब चा वाटा किती ?

1) 2200 रु.

2) 1000 रु.

3) 3200 रु.

4) 2400 रु.

उत्तर:4) 2400 रु.

 

 1. कोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?

1) कायमधारा

2) रयतवारी

3) महालवारी

4) वायदा

उत्तर:2) रयतवारी

 

 1. जर 150 पानांच्या पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल ?

1) 262

2) 342

3)360

4) 450

उत्तर:2) 342

 

 1. कर्मणी प्रयोगात कर्म हे कसे आहे?

1) धातुरुपेश

2) रुपकारात्क

3) संबंधित

4) क्रियापद

उत्तर: 1) धातुरुपेश

 

 1. संत हा शब्द पर-सवर्णाने लिहा.

1) सन्त

2) सणत

3) सङत

4) सन्त

उत्तर:1) सन्त

 

 1. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती?

1) ल.ना. बोंगीरवार

2) बाबुराव काळे

3) वसंतराव नाईक

4) प्राचार्य पी. बी. पाटील

उत्तर: 3) वसंतराव नाईक

 

 1. सामान्य भारतीय व्यक्तीस रोजच्या आहारातून किमान………..उष्मांकांची जरुरी असते.

1) 1850

2) 2000

3) 2250

4) 2500

उत्तर:3) 2250

 

 1. Mवस्तूमान असेली वस्तू V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा………

1) Mv 2

2) 1/2mv2

3) 1/3mv2

4) 1/2 kx²

उत्तर:2) 1/2mv2

 

 1. शेतकरी शेतात नांगरणी करीत होता एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला. (शब्दशक्ती ओळखा.)

1) व्यंजना

2) लक्षणा

3) प्रथमा

4) अभिधा

उत्तर:2) लक्षणा

 

 1. (-13)1+ (35+1/3)0+1629=?

1)-11

2) 16

3) -17

4) 11

उत्तर: 1)-11

 

 1. खालील आकृतीत किती चौकोन आहेत?

 

1) 308

2) 315

3) 209

4) 317

उत्तर: 2) 315

 

 1. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे……….राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

1) गोवा

2) पंजाब

3) महाराष्ट्र

4) तामिळनाडू

उत्तर:4) तामिळनाडू

 

 1. खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा.

अ. लंबोदर ब. देवालय 3. चंद्रानना 4. त्रिनयन

1) फ आणि क बरोबर बाकी सर्व चूक

2) ब बरोबर बाकी सर्व चूक

3) क बरोबर बाकी सर्व चूक

4) ड बरोबर बाकी सर्व चूक

उत्तर:2) ब बरोबर बाकी सर्व चूक

 

 1. राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?

1) संचालक

2) समादेशक

3) प्राचार्य

4) उपसंचालक

उत्तर:2) समादेशक

 

 1. A.B, C, Dआणि E या पाच क्रमागत सम संख्यांची सरासरी 66 आहे. तर यातील B आणि E या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

1) 2352

2) 4240

3) 4480

4) 4224

उत्तर:3) 4480

 

 1. आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला. तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

1) आग्नेय

2) नैऋत्य

3) वायव्य

4) ईशान्य

उत्तर:3) वायव्य

 

 1. खाली दिलेल्या संख्यामालिकेतील 1 हा अंक किती वेळा आलेला आहे की ज्यानंतर लगेच 2 हा अंक आलेला आहे. परंतु 2 नंतर 3 हा अंक नको, असे 1 किती आहेत. 12134512352 1 2 6 1 4 5 1 1 2 4 1 2 3 2 1 7 5 2 1 2 5

1) 2

2) 4

3) 5

4) 7

उत्तर: 2) 4

 

 1. नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही पण आपले कष्टकरी बळ म्हणजे “काम करणारे गरीब आहेत” ही समस्या आहे. वरिल युक्तीवाद दुबळा करणारे विधान निवडा.

1) गरिब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयं-रोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे.

2) विविध सरकारी योजनांतून गरिब व बेकार लोक मजूरी मिळवतात वप्रतिष्ठेचे जीवन जगतात.

3) भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात. त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात.

4) भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिकधाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते.

उत्तर: 2) विविध सरकारी योजनांतून गरिब व बेकार लोक मजूरी मिळवतात वप्रतिष्ठेचे जीवन जगतात.

 

 1. A-B चा अर्थ आहे, A, Bची मुलगी आहे.

A+Bचा अर्थ आहे, A, B ची पत्नी आहे.

A÷B चा अर्थ आहे, A, Bचे वडिल आहे.

A×B चा अर्थ आहे, A, B चा पुत्र आहे.

तर ‘PxR-S’ या संबंधात P चा Sशी काय संबंध आहे?

1) वडिल

2) आजोबा

3) नातू

4) बहिण

उत्तर:3) नातू

 

93 7(9+5[6+8x (-4)-42÷6+7)] =?

1)-2548

2) 1393

3) -847

4) 758

उत्तर:3) -847

 

 1. जानेवारीत सुरु झालेल्या दहा नव्या कार्यक्रमांतील पाच विनोदी, तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत. सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरु आहेत अन् त्यात पाचही विनोदी कार्यक्रमांचा समावेश आहे. वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत. त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे?

1) फक्त एक वार्तापत्र अद्याप सुरु आहे

2) फक्त एक नाटक अद्याप सुरु आहे

3) बंद झालेला किमान एक कार्यक्रम नाटक आहे

4) प्रेक्षकांना नाटकापेक्षा विनोदी कार्यक्रम अधिक पसंत आहेत

उत्तर: 3) बंद झालेला किमान एक कार्यक्रम नाटक आहे

 

 1. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

1) कॉर्निया

2) इरिस

3) प्युपील

4) रेटिना

उत्तर:2) इरिस

 

 1. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

1) Genus

2) Family

3) Order

4) Species

उत्तर:4) Species

 

 1. अ किंवा आ पुढे ऋ आल्यास त्या दोहोऐंवजी अर येतो?

1) निर्व्यसनी

2) राजर्षी

3) दुर्जन

4) अंतर्गत

उत्तर:2) राजर्षी

 

 1. A आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात (गोलाकार) Aला 1 फेरी पुर्ण करण्यासाठी 6 मिनीटे लागतात तसेच Bला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनीटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजताते दोघे एकत्र आरंभबिंदू जवळ भेटतील?

1) 6 वाजून 24 मिनीट

2) 8 वाजून 12 मिनीट

3) 8 वाजता

4) 6 वाजता

उत्तर:1) 6 वाजून 24 मिनीट

 

 1. 20 ओहम रोध असलेल्या विदयुत परिपथातून 0.5 अॅम्पियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात………. विभवांतर असावे.

1) 2 Volt

2) 1.5 Volt

3) 1Volt

4) 10 Volt

उत्तर:4) 10 Volt

 

 1. विरोधाभासामध्ये नेहमीच समाविष्ट असते……..

1) नावड

2) अन्याय

3) मतभेद

4) तीव्र भावना

उत्तर:3) मतभेद


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT