Pune City Police Bharti 2019 Exam Question Paper: पुणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019 प्रश्नपत्रिका

Maharashtra police constable salary 2024

Pune City Police Bharti 2019 Exam Question Paper

Pune City Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

पुणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019

Exam Date: दि. 05 ऑक्टोबर 2021

  1. “जीभेला हाड नसणे” याचा काय अर्थ होतो?

1) वाट्टेल ते बोलणे.

2) जीभ मऊ असणे

3) गोड बोलणे.

4) जीभ न वापरणे.

उत्तर:1) वाट्टेल ते बोलणे.

 

  1. 12+ [25-{25-(25-12)}] =?

1) 50

2) 25

3) 40

4) 75

उत्तर:2) 25

 

  1. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल.

1) 7/12

2) 3/12

3) 4/3

4) 3/4

उत्तर:1) 7/12

 

 

  1. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?

1) भारतरत्न

2) पद्मविभूषण

3) पद्मभूषण

4) पद्मश्री

उत्तर: 1) भारतरत्न

 

5) जर2×8 = 20, 3 × 9 = 31 आणि 5×8=44, तर 30 × 5 =?

1) 150

2) 154

3) 158

4) 145

उत्तर:2) 154

 

  1. लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे……..?

1) स्मशान

2) पाषाण

3) निशान

4) अज्ञान

उत्तर:2) पाषाण

 

  1. 2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती?

1) 24 महिने

2) 21 महिने

3) 20 महिने

4) 22 महिने

उत्तर:4) 22 महिने

 

  1. 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती?

1) 1:3

2) 3:1

3) 20:1

4) 1:20

उत्तर:3) 20:1

 

  1. एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?

1) 160 किमी

2) 175 किमी

3) 125 किमी

4) 150 किमी

उत्तर:2) 175 किमी

 

  1. ताशी 5 किमी/तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटांत ओलांडते तर त्या पुलाची लांबी (मीटरमध्ये) काढा.

1) 600

2) 750

3) 1250

4) 1000

उत्तर: 3) 1250

 

  1. 46, 105, 144, 158 यापैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे?

1) 144

2) 46

3) 105

4) 158

उत्तर:1) 144

 

  1. शी! काय हे अक्षर तुझे! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

1) विधानार्थी वाक्य

2) प्रश्नार्थक वाक्य

3) उदगासर्थी वाक्य

4) नकारार्थी वाक्य

उत्तर:3) उदगासर्थी वाक्य

 

  1. गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंदाच्या मामाचा कोण?

1) भाचा

2) पुतण्या

3) भाऊ

4)यापैकी नाही

उत्तर: 2) पुतण्या

 

14.एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?

1) 20

2) 25

3) 35

4) 40

उत्तर: 2) 25

 

  1. रितेश मितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती, तर आणखी 5 वर्षांनंतर ती बेरीज किती वर्षे होईल?

1)55

2)70

3) 50

4)60

उत्तर: 2)70

 

  1. “एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.” या वाक्यातील अलंकार कोणता?

1) अनुप्रास

2) अतिशयोक्ती

3) उपमा

4) यमक

उत्तर:2) अतिशयोक्ती

 

  1. एका जोडप्यास मुलगा झाला, तेव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते. पत्नीचे वय जेव्हा 35 वर्षे झाले, तेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा झाला होता, तर पती-पत्नीच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल?

1)10

2)5

3) 0

4) 15

उत्तर:2)5

 

  1. पुढील क्रम पुर्ण करा. 28, 35,…….., 77

1)42

2) 70

3)63

4) 49

उत्तर:4) 49

 

  1. संस्कृत मधून जसेच्या तसे (मुळ रूपात बदल न होता) मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

1) तद्भव शब्द

2) देशी शब्द

3) तत्सम शब्द

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर:3) तत्सम शब्द

 

  1. किल्ली: जुडगा::?

1) मत्स्यालयःमासा

2) शाळा विद्यार्थी

3) फूलःगुच्छ

4) मधःमधमाशा

उत्तर:3) फूलःगुच्छ

 

  1. जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात. तर 100 एकर जमिन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील?

1) 30

2) 40

3) 50

4) 60

उत्तर:3) 50

 

22.2500 रू. दोन वर्षांसाठी, द.सा.द.शे. 10% सरळ व्याजाने दिले तर व्याजाची दोन वर्षांची एकूण रक्कम किती होईल?

1) 400

2) 500

3) 550

4) 600

उत्तर: 2) 500

 

23.दुध आणि पाण्याच्या 70 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे, तर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे?

1) 63

2) 07

3) 70

4) 00

उत्तर: 2) 07

 

  1. 800 रू. किंमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्यखुचींची विक्री किंमत किती ?

1) 900

2) 920

3) 840

4) 940

उत्तर:2) 920

 

25) मल्लखांब पटू, मल्लखांबावरील प्रत्येक उडीत 3 फूट वर जातो व प्रत्येक उडीला । फूट खाली घसरतो तर 5 उड्यांमध्ये तो किती फूटवर जाईल?

1) 08

2) 12

3) 10

4) 06

उत्तर:3) 10

 

  1. दूटांगी‘ या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

1) दोन नरिया असलेला

2) दोन ठिकाणी फाटलेला

3) दोन पाय असलेला

4) यापैकी काही नाही

उत्तर:3) दोन पाय असलेला

 

  1. दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे, तर त्या संख्या…,….आहेत?

1) 82, 64

2) 100, 46

3) 20, 38

4) 82, 100

उत्तर:1) 82, 64

 

  1. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा एकूण अंक किती वेळा येतो?

1) 12

2) 14

3) 15

4) 13

उत्तर:3) 15

 

  1. महाराष्ट्राच्या लाच लुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नावकाय?

1) हेमंत नगराळे

2) राजेंद्र सिंह

3) रजनीश शेठ

4) संजय पांडे

उत्तर:3) रजनीश शेठ

 

  1. पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?

1) कमला नेहरू

2) कस्तुरबा गांधी

3) सरोजनी नायडू

4) फातीमा शेख

उत्तर:2) कस्तुरबा गांधी

 

  1. IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधीत नियामक म्हणून काम करते.

1) महसुल

2) विमा

3) दूरसंचार

4) क्रिडा

उत्तर:2) विमा

 

  1. पोलीस विभागातील K-9 Unit कशाशी संबंधीत आहे.

1) कराटे

2) बिनतारी संदेश

3) श्वान

4) शस्त्रसाठा

उत्तर: 3) श्वान

 

  1. “GST” हा खालीलपैकी कोणता कर आहे?

1) कृषी उत्पन्न

2) उत्पन्न

3) वस्तु व सेवा

4) गुंतवणुक उत्पन्न

उत्तर: 3) वस्तु व सेवा

 

  1. अर्जुन एमके 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला?

1) ISRO

2) DRDO

3) IITM

4) IISER

उत्तर: 2) DRDO

 

35 “कोव्हिड 19” म्हणजे कोरोना काय आहे?

1) जिवाणु

2) बुरशी

3) विषाणु

4) शेवाळ

उत्तर:3) विषाणु

 

  1. “को व्हक्सीन” ही लस कोणी तयार केली?

1) सिरम इंस्टीट्यूट

2) भारत बायोटेक

3) सिप्ला

4) फायझर

उत्तर:2) भारत बायोटेक

 

37- हरीत क्रांती ही कशाशी निगडीत आहे?

1) बाग उत्पादन

2) फळ उत्पादन

3) दुध उत्पादन

4) अन्न-धान्य उत्पादन

उत्तर:4) अन्न-धान्य उत्पादन

 

  1. मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

1) क्रिडा समालोचक

2) निसर्ग अभ्यासक

3) साहित्य समालोचक

4) पत्रकारिता

उत्तर:2) निसर्ग अभ्यासक

 

  1. अमेरीकेच्या सध्याच्या उप-राष्ट्रपती कमला हॅरीस या अमेरीकेच्या कितव्या महिला उप-राष्ट्रपती आहेत?

1) पहित्या

2) ददुसऱ्या

3) चौथ्या

4) सहाव्या

उत्तर:1) पहित्या

 

  1. “बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय” कोणत्या शहरात आहे?

1) नांदेड

2) नागपुर

3) मुंबई

4) औरंगाबाद

उत्तर:2) नागपुर

 

  1. इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधीन नाहीत?

1) अॅमेझॉन

2) टेस्ला

3) स्टार लींक

4) स्पेस एक्स

उत्तर:1) अॅमेझॉन

 

  1. 42. “नोवाक जोकोविच” याने 2021 मध्ये कोणती ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा गमावली?

1) विम्बल्डन

2)फ्रेंच ओपन

3) ऑस्टेलियन ओपन

4) यु.एस. ओपन

उत्तर:4) यु.एस. ओपन

 

  1. “लिळाचरित्र” हा ग्रंथ कोणी लिहीला?

1) मुकुंद राज

2) मिष्माचार्य

3) महाभट्ट

4) केशवदेव व्यास

उत्तर:3) महाभट्ट

 

 

  1. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समुहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात?

1) शब्द

2) वर्ण

3) स्वर

4) व्यंजन

उत्तर:1) शब्द

 

  1. उच्चार करण्यासाठी जास्तवेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो, त्यास कोणता स्वर म्हणतात?

1) र्हस्व

2) दिर्घ

3) संयुक्त

4) इंग्रजी

उत्तर:2) दिर्घ

 

  1. खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचुक शब्द कोणता?

1) अनुक्क्रम

2) अनुक्रम

3) अनुकूम

4) अनुक्रम

उत्तर:4) अनुक्रम

 

  1. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा?

1) हौतात्म्य

2.) हुतात्म्य

3) होनत्म्य

4) हीतत्मा

उत्तर:1) हौतात्म्य

 

  1. खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता?

1) गडगडाट

2) छनछनाट

3) खळखळाट

4) खनखनाट

उत्तर:3) खळखळाट

 

  1. “कोल्हा काकडीला राजी” या म्हणीचा अर्थ काय?

1) कोल्हा काकडी खातो.

2) लहान माणसे. लहान गोष्टींना भाळतात.

3) कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच..

4) चतुर माणसे संकटावर मात करतात.

उत्तर:2) लहान माणसे. लहान गोष्टींना भाळतात.

 

  1. खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो/आभासी चलनाचा व्यवहार होतो.

1) BSE 51.

2) MCX

3) WAZIRX

4) NSE

उत्तर:3) WAZIRX

 

51.खालील पर्यायातील वेगळा शब्द निवडा.

1) साडी

2) फ्रांक

3) स्कर्ट

4) पगड़ी

उत्तर:4) पगड़ी

 

  1. एका विशिष्ट संकेतात ‘BOLT’ हा शब्द ‘ANKS’ असा लिहतात तर त्या संकेतातील ‘OTMD’ कशासाठी लिहला गेला?

1) PALE

2) PUNE

3) POLE

4) PURE

उत्तर: 2) PUNE

 

  1. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत?

1) उज×वाडावा

2) गुरु×शिष्य

3) चढण×उतरण

4) आहार×भोजन

उत्तर:4) आहार×भोजन

 

  1. जर A-1, B-2,C-3, D-4 तर 8463′ या संख्येने काय दर्शविले जाते?

1) HEDC

2) HCFD

3) HFCD

4) HDFC

उत्तर:4) HDFC

 

  1. राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे.” तर राधाचे रामाशी नाते कोणते?

1) आई

2) बहीण

3) मुलगी

4) भाची

उत्तर:3) मुलगी

 

  1. 8, 14, 26,50? 194

1) 96

2) 98

3) 100

4) 102

उत्तर:2) 98

 

  1. शाम ला 10500 नाणी मोजावयास सर्वसाधारणपणे 60 मिनीटे लागतात. आज त्याने 14500 नाणी 1 तास 20 मिनीटांत मोजली. तर त्याने आज नाणी…….

1) हळू मोजला

2) जलद मोजली

3) नेहमीसारखी मोजली

4) यापैकी नाही

उत्तर:2) जलद मोजली

 

  1. आई आणि तिच्या पाच मुलाचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे?

1)55

2) 50

3) 42

4)40

उत्तर:2) 50

 

  1. खालील पैकी कोणता ग्रह नाही?

1) रवि

2) बुध

3) गुरु

4) शुक्र

उत्तर:1) रवि

 

60.खालील पैकी कोणते नक्षत्र नाही?

१) आश्लेषा

2) वर्षा

३) मघा

4) पूर्वा

उत्तर:2) वर्षा

 

  1. 1किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम?

1) 1000

2) 10000

3) 100000

4) 1000000

उत्तर:4) 1000000

 

 

  1. जर रोहन 1 तासाला 20 पाने लिहीतो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल?

1) 1 तास 15 मिनीटे

2) 2 तास 15 मिनीटे

3) 1 तास 45 मिनीटे

4) 2 तास 45 मिनीटे

उत्तर:2) 2 तास 15 मिनीटे

 

  1. एका रांगेत सुरज डावीकडून 25 वा आहे व उजवीकडूनही तो 25 वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

1) 49

2) 50

3) 51

4) 48

उत्तर:1) 49

 

  1. लिंग, वचन, विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्दम्हणतात?

1) विग्रही

2) अविकारी

3) प्रत्ययकारी

4) विकारी

उत्तर:4) विकारी

 

  1. A रेल्वे पुण्याहून दुपारी 4 वाजता निघते आणि लोणावळ्याला दुपारी 5 वाजता घोहोचते. B ही रेल्वे लोणावळ्याहून दुपारी 3 वाजता निघते आणि पुण्याला दुपारी 4 ला पोहोचते. तर दोन्ही रेल्वेची गती काय आहे?

1) A ही B पेक्षा जलद

2) B ही A पेक्षा जलद

3) A आणि B समान गती

4) यापैकी नाही.

उत्तर:3) A आणि B समान गती

 

  1. जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो?

1) अर्वाचीन

2) प्राकृत

3) अभिजात

4) सांस्कृतीक

उत्तर:3) अभिजात

  1. एक बोट 100 किमी अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 10 तासात जाते आणि 75 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल? (किमी / तास

1) 2.5

2) 3.5

3) 7.5

4) 10

उत्तर:1) 2.5

 

  1. खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गढ़ातील भाषा आहे?

1) तामिळ

2) मराठी

3) हिंदी

4) गुजराती

उत्तर:1) तामिळ

 

69 6, 24 या संख्यांचा भूमितीमध्य (Geometric mean) किती?

1) 8

2) 12

3) 14

4) 10

उत्तर:2) 12

 

  1. मराठी भाषेची लिपी कोणती आहे?

1) देवनागरी

2) मोही

3) खरोष्ठी

4) ब्राम्ही

उत्तर:1) देवनागरी

 

  1. 71. खालील पैकी कोणते पंचज्ञानेंद्रीयांपैकी नाही?

1) जीभ

2) डोळे

3) दात

4) कान

उत्तर:3) दात

 

  1. रमेश मावळतीकडे तोंड करून उभा होता. नंतर तो आपल्या डावीकडे काटकोनातून चार वेळा वळला; तर त्याचे तोड़ आता कोणत्या दिशेला येईल?

1) पूर्व

2) पश्चिम

3) दक्षिण

4) उत्तर

उत्तर:2) पश्चिम

 

  1. विसंगत घटक ओळखा?

1) पृथ्वी

2) चंद्र

(3) मंगळ

4) गुरु

उत्तर:2) चंद्र

 

  1. खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा?

1) अमूलाग्र = मुळापासून शेंड्यापर्यंत

2) खरेदी = विक्री

3) ताजा = शिळा

4) नफा = तोटा

उत्तर:1) अमूलाग्र = मुळापासून शेंड्यापर्यंत

 

  1. “जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू” या वाक्यामधील ‘रस’ ओळखा?

1) वीर रस

2) करुण रस

3) हास्य रस

4) शांत रस

उत्तर:1) वीर रस

 

  1. आमचे राम काका म्हणजे काय?अगदी नवकोट नारायणच!” यावाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय?

1) खूप श्रीमंत

2) अत्यंत गरीब

3) देवा मारखे

4) यापैकी काही नाही

उत्तर:1) खूप श्रीमंत

 

  1. अहमदनगर, हमदनगर, हमदनग, मदनग,मदन,?

1)मदग

2)दन

3) नंद

4) मद

उत्तर:2)दन

 

  1. 78. 10सेंमी म्हणजेकिती किलोमीटर?

1) 0.1

2) 0.01

3) 0.001

4) 0:0001

उत्तर:4) 0:0001

 

  1. 5x = 6y = 3z= 9m, तर x, y,z वmयापैकी कोणत्या अक्षराचीकिंमत अधिक आहे?

1) m

2) x

3) y

4)z

उत्तर:4)z

 

  1. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा सुद्धा तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

1) 2.5 दिवस

2) 4 दिवस

3) 3 दिवस

4) 3.5 दिवस

उत्तर:3) 3 दिवस

 

 

  1. सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकीओ ऑलिम्पीक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या?

1) अफ्रिका

2) उत्तर अमेरीका

3) दक्षिण अमेरीका

4) आशिया

उत्तर:4) आशिया

 

  1. महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे?

1) 268

2)278

3) 288

4)298

उत्तर:3) 288

 

  1. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत?

1)उदय सामंत

2) धनंजय मुंडे

4) नितीन राऊत

3) अस्लम शेख

उत्तर:2) धनंजय मुंडे

 

  1. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?

1) 12 वे

2) 13 वे

3) 74 वे

4) 15 वे

उत्तर:3) 74 वे

 

  1. उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत?

1) पुष्करसिंह धामी

2) तिरयसिंह रावत

3) त्रिवेंद्रसिंह रावत

4) नरेंद्रसिंह तोमर

उत्तर:1) पुष्करसिंह धामी

 

  1. निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

1) अमिताभ कांत

2) आर. कुमार

3) नरेंद्र मोदी

4) शतकांत दास

उत्तर:3) नरेंद्र मोदी

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत?

1) अजय मेहता

2) विकास खारगे

3) मनुकुमार श्रीवास्तव

4) देवाशिष

उत्तर:4) देवाशिष

 

  1. ज्यांचे नावे “नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फरेडचक्रवर्तीनोबेल यांनी खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला?

1) जिलेटीन

2) डायनामाईट

3) आर. डो.एक्स

4) गन पावर

उत्तर:2) डायनामाईट

 

  1. मुंबई इंडीयन्स या संघाचा सध्याचा कर्णधार कोण आहे?

1) रोहित शर्मा

2) विराट कोहली

3) महेंद्रसिंह धोनी

4) के.एल.

उत्तर:1) रोहित शर्मा

  1. शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?

1) उत्तर कोरीया

2) जपान

3) दक्षिण कोरीया

4) चीन

उत्तर:2) जपान

 

  1. सोहम ने 6000 रु.चा टेबल 7500 रु. ला विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला?

1) 30

2) 20

3) 15

4) 25

उत्तर:4) 25

 

  1. हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे?

1) गुणविशेषण

2) सार्वनामीक विशेषण

3) संख्या विशेषण

4) यापैकी काहीच नाही

उत्तर:1) गुणविशेषण

 

  1. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?

1) 81

2) 82

3) 75

4) 78

उत्तर:4) 78

 

  1. पुरण पोळी” या शब्दाचे लिंग कोणते?

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुसकलिंग

4) यापैकी एकही नाही

उत्तर:2) स्त्रीलिंग

 

  1. अमर एका रिक्षात बसला तेव्हा मीटर 00 होते व प्रत्येक कि.मी. ला 5 रू. भाडे होते. जर अमर ने रिक्षावाल्यास शेवटी 115 रू. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला?

1) 23

2) 21

3) 24

4) 22

उत्तर:1) 23

 

  1. “सिताराम पेक्षा आकाराम उंच आहे” या वाक्यातील “पेक्षा” हाशब्द, कोणते शब्दयोगी अव्यय दर्शवितो?

1) गतीवाचक

2) स्थलवाचक

3) हेतूवाचक

4) तुलनावाचक

उत्तर:4) तुलनावाचक

 

  1. 72, 60 आणि 96 चा मसावि किती?

1) 4

2) 8

3) 12

4)24

उत्तर:3) 12

  1. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

1) सात

2) पाच

3) तीन

4)नऊ

उत्तर:3) तीन

 

  1. 9: 25 तर 49:? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

1) 36

2) 64

3) 81

4) 16

उत्तर:3) 81

 

  1. रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?

1) 40 मीटर

2) 42 मीटर

3) 22 मीटर

4) 38 मीटर

उत्तर:4) 38 मीटर

Pune City Police Bharti exam question paper 2019 set B: Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT