Pimpri-Chinchwad Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Pimpri-Chinchwad Police Bharti 2019 Exam Question Paper

Pimpri-Chinchwad Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

पिंपरी चिंचवड आयुक्तालय

 

पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस भरती २०१९

1)’चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाचे लेखक कोण?

1) संत तुकाराम

2) संत ज्ञानदेव

3) संत चोखामेळा

4) संत सोपानदेव

उत्तर:2) संत ज्ञानदेव

 

2) ‘AMNESTY INTERNATIONAL’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

1) बौद्धिक हक्क

2) मानवी हक्क

3) महिला हक्क

4) वातावरण बदल

उत्तर:2) मानवी हक्क

 

3)’लोकटक तळे’ कोणत्या राज्यात आहे?

1) आंध्र प्रदेश

2) मेघालय

3) मणिपूर

4) सिक्किम

उत्तर:3) मणिपूर

 

4) ‘सुचेता दलाल’ या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

1) अर्थशास्त्र

2) कृषिशास्त्र

3) सिनेजगत

4) हवामान बदल

उत्तर:1) अर्थशास्त्र

 

5)राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 29 ऑगस्ट

2) 26 जुलै

3) 16 डिसेंबर

4) 5 सप्टेंबर

उत्तर:1) 29 ऑगस्ट

 

6) ——-हे क्रांतीकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.

1) पिंपरी

2) चिंचवड

3) लोणी

4) खेड

उत्तर:2) चिंचवड

 

7) सोनार: फुंकणी:: लोहार:?

1) ऐरण

2) विस्तव

3) भाता

4) लोखंड

उत्तर:3) भाता

 

8) शेतकरी शेती:?: लढाई

1) शूर

2) किसान

3) सैनिक

4) युद्ध

उत्तर:3) सैनिक

 

9) शीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे. तर त्याच्या उजव्या हाताला दिशा असेल.

1) उत्तर

2) दक्षिण

3) पूर्व

4) पश्चिम

उत्तर:1) उत्तर

 

10) 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

1) 17

2) 16

3) 15

4) 14

उत्तर:2) 16

 

11) वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 येते तर वडीलांचे वय किती?

1) 48

2) 27

3) 40

4) 45

उत्तर:4) 45

 

12) NOT या शब्दामधील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील?

1) एक

2) तीन

3) चार

4) दोन

उत्तर:2) तीन

 

13) सविता या शब्दाचा अर्थ काय?

1) चंद्र

2) सूर्य

3) गुरु

4) शुक्र

उत्तर:2) सूर्य

 

14) ‘कागद’ या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?

1) चौकोनी

2) रंगीत

3) उंच

4) कोरा

उत्तर:3) उंच

 

15) खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता?

1) अरेरे

2) अगाई

3) हाय हाय

4) अहाहा

उत्तर:4) अहाहा

 

 

 

16) अपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत——— गावाला वळसा’?

1) गाठ

2) कळसा

3) कोळसा

4) दुखणे

उत्तर:2) कळसा

 

17) खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?

1) कडू

2) रडतो

3) पाहतो

4) झोपला

उत्तर:1) कडू

 

18) ‘नाच रे मोरा’ या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?

1) त्र्यं. बा. ठोंबरे

2) विंदा करंदीकर

3) बा. भ. बोरकर

4) ग. दि. माडगूळकर

उत्तर:4) ग. दि. माडगूळकर

 

19) “तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता?

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) यापैकी नाही

उत्तर:2) कर्मणी

20) ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मी लांबीची आगगाडी 900 मी लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?

1) 84 सेकंद

2) 50 सेकंद

3) 60 सेकंद

4) 90 सेकंद

उत्तर:3) 60 सेकंद

 

21) खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही?

1) सहा

2) सात

3) दोन

4) तीन

उत्तर:1) सहा

 

22) 5×5+5+5+ (5-5) =?

1) 26

2) 27

3) 25

4) 35

उत्तर:1) 26

 

23)एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज १२० असल्यास पहिली संख्या कोणती?

1) 90

2) 30

3) 60

4) 40

उत्तर:1) 90

 

 

24) द.सा.दशे 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयेचे सरळ व्याज किती?

1) 210 रु

2) 215 रु

3) 225 रु

4) 250 रु

उत्तर:3) 225 रु

 

25) एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?

1) 77.44

2) 66.55

3) 55.66

4) 66.44

उत्तर:1) 77.44

 

26) ”अरुणाचल टेकड्या” कोणत्या राज्यात आहेत?

1) अरुणाचल प्रदेश

2) तामिळनाडू

3) आंध्र प्रदेश

4) कर्नाटक

उत्तर:2) तामिळनाडू

 

27) जी आय (जिओग्राफिक इंडिकेशन) ही कोणती मालमत्ता आहे?

1) चल

2) अचल

3) बौद्धिक

4) यापेकी नाही

उत्तर:3) बौद्धिक

 

28) हरित लवक कशाशी संबंधित आहे?

1) प्रकाश संश्लेषण

2) रक्ताभिसरण

3) मलविसर्जन

4) श्वसन

उत्तर:1) प्रकाश संश्लेषण

 

29) न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?

1) 47

2) 48

3) 45

4) 46

उत्तर:2) 48

 

30) जपानचे चलन कोणते आहे?

1) युरो

2) येन

3) डॉलर

4) दिनार

उत्तर:2) येन

 

31) खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे.

1) मराठा लाईट इन्फन्ट्री

2) सीमा सुरक्षा बल

3) भारतीय हवाई दल

4) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक

उत्तर:4) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक

 

 

32) अंक मालिका पूर्ण करा 11, 23,35,47,59, –,–

1) 73, 83

2) 71, 85

3) 71, 83

4) 73, 85

उत्तर:3) 71, 83

 

33) वेगळा शब्द ओळखा.

1) बीजिंग

2) न्यूयॉर्क

3) मोगादिशू

4) पॅरिस

उत्तर:2) न्यूयॉर्क

 

(34) लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?

1) 33

2) 3003

3) 333

4) 303

उत्तर:4) 303

 

35) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुलेकिती?

1) 30

2) 31

3) 29

4) 28

उत्तर:3) 29

36) एक दोरी सात ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?

1) 7

2) 8

3)9

4) 10

उत्तर:2) 8

 

37) 7, 11, 13, 17, 19,?

1) 27

2) 21

3) 23

4) 20

उत्तर:3) 23

 

38) ‘सीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?

1) लाल

2) फुल

3) सीतेला

4) आवडते

उत्तर:1) लाल

 

39) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता?

1) परंतु

2) जो

3) म्हणून

4) आणि

उत्तर:2) जो

 

40) “अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा?

1) अध्यक्षा

2) अध्यक्ष

3) अध्यक्षया

4) अध्यक्षी

उत्तर:1) अध्यक्षा

 

41) ‘आजी पोथी वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा?

1) रीति वर्तमानकाळ

2) रीति भविष्यकाळ

3) रीति भूतकाळ

4) पूर्ण भूतकाळ

उत्तर:3) रीति भूतकाळ

 

42) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

1) नायिका

2) विद्वानिन

3) नर्तकी

4) विदुषी

उत्तर:4) विदुषी

 

43) ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

1) पोर्तुगीज

2) फारशी

3) अरबी

4) इंग्रजी

उत्तर:2) फारशी

44) एक हेक्टर म्हणजे किती एकर?

1) एक

2) अडीच

3) दहा

4) दोन

उत्तर:2) अडीच

 

 

(45) 4913 या घन संख्येचे घनमूळ किती आहे?

1) 16

2) 17

3) 19

4) 23

उत्तर:2) 17

 

46) 49 ÷ 0.07 =?

1) 0.7

2) 70

3) 7

4) 700

उत्तर:4) 700

 

(47) 8, 12 व 15 यांचा लसावि किती?

1) 150

2) 240

3) 196

4) 120

उत्तर:4) 120

 

48) सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व सात संख्यांची सरासरी किती होईल?

1) 66.5

2) 68

3) 68.5

4) 69

उत्तर:4) 69

 

49) एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

1) 196 चौ. सेमी

2) 616 चौ. सेमी

3) 166 चौ. सेमी

4) 696 चौ. सेमी

उत्तर:2) 616 चौ. सेमी

 

50) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

1) 18

2) 16

3) 15

4) 12

उत्तर:2) 16

 

51)रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

1) जीवशास्त्र

2) भौतिकशास्त्र

3) रसायनशास्त्र

4) अर्थ शास्त्र

उत्तर:4) अर्थ शास्त्र

 

52)खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही?

1) जॉर्जिया

2) बल्गेरिया

3) बेलारूस

4) तुर्की

उत्तर:3) बेलारूस

 

53) सन २००५ मध्ये स्टँडफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री, स्टे फुलीशअसे कोण म्हणाले?

1) स्टीव्ह जॉब्स

2) जेफ बेझोस

3) बिल गेट्स

4) पॉल ऍलन

उत्तर:1) स्टीव्ह जॉब्स

 

54) रेटिना कोणत्या अवयवात आढळतो?

1) कान

2) डोळा

3) घसा

4) मेंदू

उत्तर:2) डोळा

 

55) को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे?

1) नारळ

2) कापूस

3) सोयाबीन

4) ऊस

उत्तर:4) ऊस

 

 

56) भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?

1) 21 ऑक्टोबर

2) 15 ऑगस्ट

3) 15 जानेवारी

4) 1 मे

उत्तर:1) 21 ऑक्टोबर

 

57) नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

1) क्रोएशिया

2) सर्बिया

3) अमेरिका

4) न्युझीलँड

उत्तर:2) सर्बिया

 

58) वेगळा क्रमांक ओळखा.

1) 47

2) 57

3) 77

4) 87

उत्तर:1) 47

 

59) एका सांकेतिक भाषेत MASTER हा शब्द 273190 व RING हा शब्द 0645 असा लिहीताततर STREAMING हा शब्द कसा लिहाल?

1) 312049765

2) 310972645

3) 210963745

4) 317092645

उत्तर:2) 310972645

 

60) संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे जर शंकरचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचाजन्मदिवस कोणता?

1) गुरुवार

2) शुक्रवार

3) मंगळवार

4) बुधवार

उत्तर:1) गुरुवार

 

61) घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?

1) 30°

2) 45°

3) 60°

4) 90°

उत्तर:1) 30°

 

62) Z हा Y पेक्षा लहान आहे. Xहा पेक्षा मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण?

1) X

2) Y

3) Z

4) सांगता येणार नाही.

उत्तर:1) X

 

63) जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पूर्वेला कोणती दिशा येईल?

1) ईशान्य

2) वायव्य

3) नैऋत्य

4) आग्नेय

उत्तर:3) नैऋत्य

 

64) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?

1) स्वरादी

2) स्वर

3) व्यंजने

4) जोडाक्षरे

उत्तर:3) व्यंजने

 

65) खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही?

1) नागपंचमी

2) वटपौर्णिमा

3) श्रीकृष्णजन्माष्टमी

4) रक्षाबंधन

उत्तर:2) वटपौर्णिमा

 

66) प्राणी / पक्षी व त्यांचा निवारा यांत चुकीची जोडी कोणती.

1) उंदीर – बीळ

2) मुंगी – वारुळ

3) गाय – गोठा

4) मधमाशी–फूल

उत्तर:4) मधमाशीफूल

 

67) खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता?

1) भावजय

2) जलतरण

३) चूकभूल

4) तापमान

उत्तर:३) चूकभूल

 

68) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

1) तांदुळ

2) चिमणी

3) पोलिस

4) कढई

उत्तर:3) पोलिस

 

69) मुले अभ्यास करतात. या वाक्याचा प्रकार कोणता?

1) प्रश्नार्थी

2) नकारार्थी

3) होकारार्थी

4) यापैकी नाही

उत्तर:3) होकारार्थी

 

70) एक क्युसेक म्हणजे किती लिटर?

1) 1000 ली.

2) 28.32 ली.

3) 1089 ली.

4) 100 ली.

उत्तर:2) 28.32 ली.

 

71) एका वस्तुची खरेदी किंमत 2500 रुपये व विक्री किंमत 2000 रुपये आहे, तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती?

1) 20 टक्के

2) 30 टक्के

3) 40 टक्के

4) 24 टक्के

उत्तर:1) 20 टक्के

 

72) 9999+999+99+9= किती?

1) 11116

2) 11106

3) 11006

4) 10006

उत्तर:2) 11106

 

73) 96, 60 व 72 यांचा मसावि किती?

1) 8

2) 10

3) 12

4) 15

उत्तर:3) 12

 

74)दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली. तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?

1) 55

2) 78

3)42

4) 52

उत्तर:3)42

 

75) 23 चा वर्ग किती?

1) 629

2) 729

3) 529

4) 229

उत्तर:3) 529

 

76) भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?

1)315

2)316

3)317

4)318

उत्तर:1)315

 

77) महाराष्ट्र पोलीस दलाची, पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) ही संस्था कोणत्या शहरात आहे?

1) मुंबई

2) पुणे

3) औरंगाबाद

4) नागपूर

उत्तर:2) पुणे

 

78) गीतांजली चे लेखक कोण आहेत?

1) बंकिमचंद्र चटर्जी

2) रवींद्रनाथ टागोर

3) अरविंद घोष

4) राजा राम मोहन राय

उत्तर:2) रवींद्रनाथ टागोर

 

79) अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

1) आंबोली

2) वरंधा

3) खंबाटकी

4) माळशेज

उत्तर:4) माळशेज

 

80) फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?

1)2017

2) 2018

3) 2019

4) 2020

उत्तर:3) 2019

 

81) ‘ग्लोबल टीचर प्राइज 2020’ पुरस्कार मिळविणारे पहीले भारतीय शिक्षक कोण?

1) सत्यम मिश्रा

2) मेघना मुसुरी

3) रणजितसिंह डिसले

4) बायजू रवींद्रन

उत्तर:3) रणजितसिंह डिसले

 

82) जर C=27, E=125 तर H = ?

1) 64

2) 225

3) 343

4) 512

उत्तर:4) 512

 

83) PSVY: ? :: BEGK ADFJ

1) VXOR

2) ORUX

3) UROX

4) XVRO

उत्तर:2) ORUX

 

84) डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात दात म्हणजे कान तर खाणार कशाने?

1) कान

2) नाक

3) दात

4) डोळे

उत्तर:1) कान

 

85) खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही?

1) 25/07/2010

2) 31/01/2008

3) 29/11/2006

4) 29/02/2009

उत्तर:4) 29/02/2009

 

86) वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे. नारायण हे सुधीरचे वडील आहेत तर नारायण हेसंजयचे कोण?

1) आजोबा

2) काका

3) मामा

4) सासरे

उत्तर:4) सासरे

 

87) एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेसहस्तांदोलन होईल?

1) 190

2) 290

3) 380

4) 180

उत्तर:1) 190

 

88) सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळाला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?

1) उत्तर

2) दक्षिण

3) पूर्व

4) पश्चिम

उत्तर:4) पश्चिम

 

89) ‘रस्ता’ या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल?

1) स्वच्छ

2) शूर

3) गोड

4) लाजरा

उत्तर:1) स्वच्छ

 

90) ‘देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

1) नंदादीप

2) दीपस्तंभ

3) लामण दिवा

4) आकाश दीप

उत्तर:1) नंदादीप

 

 

91)गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?

1) आनंदी राहणे

2) बेसावध राहणे

3) जागृत राहणे

4) अर्धपोटी राहणे

उत्तर:2) बेसावध राहणे

 

92) खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?

1) सैनिक

2) पुस्तक

3) तिकीट

4) कुटुंब

उत्तर:1) सैनिक

 

(93) खालीलपैकी विसंगत जोडी कोणती?

1) 100 वर्षे – शताब्दी महोत्सव

2) 50 वर्षे – सुवर्ण महोत्सव

3) 25 वर्ष – रौप्य महोत्सव

4) 75 वर्षे – हीरक महोत्सव

उत्तर:4) 75 वर्षे – हीरक महोत्सव

 

94) खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता?

1) वार्षीक

2) दुष्काळ

3) निरीक्षण

4) खेळाडू

उत्तर:1) वार्षीक

95) आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

1) 74 वर्षे

2) 68 वर्षे

3) 67 वर्षे

4) 69 वर्षे

उत्तर:2) 68 वर्षे

 

96) 24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?

1) 203 रु

2) 230 रु

3) 2003 रु

4) 2030 रु

उत्तर:4) 2030 रु

 

97) 7590001-6990000 =?

1) 600001

2) 60001

3) 699999

4) 60999

उत्तर:1) 600001

 

98) रोहितने 4 डावात काढलेली धावांची सरासरी 80 आहे तर चार डावात एकूण किती धावा काढल्या?

1)360

2) 320

3) 290

4) 240

उत्तर:2) 320

 

 

99) 825 चे 4% म्हणजे किती?

1) 32

2) 33

3) 34

4) 35

उत्तर:2) 33

 

100) 0.25 x 2.5 × 1.2=?

1) 0.075

2) 0.90

3) 7.5

4) 0.75

उत्तर:4) 0.75

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT