Latur District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Latur District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Latur Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

लातुर जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 22 सप्टेंबर 2021

 1. खालील शब्दाची संधी सोडवा. गंगौघ

1) गंगा + औघ

2) गंगा + ओघ

3) गंगा + उघ

4) गंगो + ओघ

उत्तर:2) गंगा + ओघ

 

 1. खालील वाक्य पहा.

अ. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.

ब. तु त्या राजपुत्राला वर.

क. पक्षी झाडावर बसतो.

ड. वरची खोली लहान आहे.

‘वर’ हा शब्द विविध अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे. त्याचे निरनिराळ्या ठिकाणी कार्य वरील वाक्यामध्ये अनुक्रमाने काय आहे ते सांगा.

1) नाम, शब्दयोगी अव्यय, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण

2) नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्ययसाधीत विशेषण

3) नाम, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण, शब्दयोगी अव्यय

4) वरीलपैकी काहीच नाही.

उत्तर:2) नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्ययसाधीत विशेषण

 

3.प्रथमा, द्वितीया, तृतीया चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत?

1) संधी

2) अलंकार

3) विभक्ती

4) नाम

उत्तर:3) विभक्ती

 

4.खालील शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे.

1) सनातनी

2) अवर्णनीय

3) निरक्षर

4) कृतघ्न

उत्तर: 2) अवर्णनीय

 

 1. ‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

1) तर्क विरहीत

2) असहाव्य

3) उपहास

4) अकाल्पनिक

उत्तर:1) तर्क विरहीत

 

 1. ‘तरबेज’ या शब्दाची योग्य जोडी ओळखा.

1) दालिन

2) व्यक्ती

3) हुशार

4) उमेद

उत्तर:2) व्यक्ती

 

‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) धाकटा

2) मोठा

3) चुलत

4) वारला

उत्तर:1) धाकटा

 

 1. ‘कानावर पडणे म्हणजे काय?

1) सहज ऐकू येणे

2) संपूर्ण बदल होणे

4) आधार घेणे

4) बावरणे

उत्तर: 1) सहज ऐकू येणे

 

 1. खालील म्हण पूर्ण करा. ऐकावे जनाचे,……..

1) करावे मनाचे

2) करावे धनाचे

3) करावे जनतेचे

4) करावे आदेशाचे

उत्तर: 1) करावे मनाचे

 

 1. फुलझाडांचा…….. (समूहदर्शक शब्द शोधा.)

1) जथा

2) ताटवा

3) जमाव

4) चवा

उत्तर: 2) ताटवा

 

 1. बाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मक्ता असणे

1) लालूच असणे

2) मन प्रफुलीन असणे

3) एकाधिकार असणे

4) भयंकर त्रास असणे

उत्तर:3) एकाधिकार असणे

 

 1. विरुद्धार्थी शब्द सांगा. निष्कांचन×…….

1) चिंतातुर

2) पुरातन

3) धनवान

4) हाडवैर

उत्तर: 3) धनवान

 

 1. समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =………

1) विवेचन

2) बैरागी

3) नमुना

4) कर्ज

उत्तर: 3) नमुना

 

 1. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. मुलगा चांगला खेळतो.

1) खेळतो

2) मुलगा

3) चांगला

4) काहीच नाही

उत्तर: 3) चांगला

 

 1. खालील वाक्यातील काळ ओळखा.

मधुने लाडु खाल्ला आहे.

1 पुर्ण वर्तनमानकाळ

2) पूर्ण भूतकाळ

3) पूर्ण भविष्यकाळ

4) रीती काळ

उत्तर:1 पुर्ण वर्तनमानकाळ

 

 1. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

1) उजनी

2) इसापुर

3) तोतला डोह

4) जायकवाडी

उत्तर: 4) जायकवाडी

 

 1. संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहीला?

1) अमृतानुभव

2) दासबोध

3) ग्रामगीता

4) ज्ञानेश्वरी

उत्तर:3) ग्रामगीता

 

 1. बिहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

1) तामीळनाडु

2) तेलंगणा

3) आसाम

4) ओडीशा

उत्तर:3) आसाम

 

 1. पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा.

1) अवशोषण (Absorption)

2) पचन (Digestion)

3) अंतग्रहण (Ingestion)

4) सात्मीकरण (Asimilation)

5) बहि:क्षेपण (Egestion)

1) 3, 2,1,4,5

2) 3, 1,2,4,5

3) 3, 1,4,2,5

4) 3, 2,4,1,5

उत्तर: 1) 3, 2,1,4,5

 

 1. खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, त्यांच्या बाबत काय खरे नाही?
 2. ते नाथं बेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्सचे पश्तुन लीडर होते.
 3. ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते.
 4. त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीना दोष दिला.

1) 1

2) 2

3) 3

4) एकही नाही

उत्तर:3) 3

 

 1. अमेरीकन सेनेने गेले किती वर्षे अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले ज्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये तालिवान सेनेने या देशाचा ताबा घेतला? सर्वात योग्य पर्याय निवडा.

1) 5 वर्ष

2) 10 वर्ष

3) 20 वर्षे

4) 30 वर्ष

उत्तर:3) 20 वर्षे

 

 1. अक्षय शिंदे आठवडयाच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटेबोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत.

दिवस 1) मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो

दिवस 2 ) आज गुरुवार, रविवार, किंवा शनिवार आहे

दिवस 3 ) मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.

अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात, त्याची निवड करा.

1) सोमवार

2) मंगळवार

3) बुधवार

4) शुक्रवार

उत्तर: 2) मंगळवार

 

 1. खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडुन पुर्ण करा.

1, 1, 2, 3, 5, 8, 13,?, 34

1)19

2) 20

3) 21

4) 23

उत्तर: 3) 21

 

 1. पहिल्या दोन अक्षरसमुहांमध्ये जो संबंध आहे. तोच नंतरच्या दोन अक्षरसमुहामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?

TEACHER: SDIBBDU:: DOCTOR: ?

1) SUNBPC

2) SNUBPC

3) SUBPCN

4) SNPCBU

उत्तर:2) SNUBPC

 

 1. एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?

1) 12.5

2) 1.25

3) 1

4) 1.5

उत्तर: 1) 12.5

 

 1. 92 व 70 या संख्यांचे ल.सा.वि. व म.सा.वि अनुक्रमे खालीलप्रमाणेआहेत.

1) 2 व 1610

2) 6640 व2

3) 32207 व 2

4) 3220 व 4

उत्तर: 3) 32207 2

 

 1. डांबराच्या गोळ्याचा (Napthalene balls) आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण त्यांचे

1) बाष्पीभवन होते (Evaporation)

2) संघनन होते (Condensation)

3) संप्लवन होते (Sublimation)

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर: 3) संप्लवन होते (Sublimation)

 

 1. हायग्रोमीटर काय मोजते?

1) सापेक्ष आर्द्रता

2) द्रव्याची सापेक्ष घनता

3) नदीच्या पात्रातील प्रवाह

4) वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: 1) सापेक्ष आर्द्रता

 

 1. वारंवारतेचे (Frequency) SI एकक काय आहे?

1) न्युटन

2) वॅट

3) हटझ

4) ज्युल

उत्तर: 3) हटझ

 

 1. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणांमुळे (Tiny Particles) तयार होते, त्या कर्णाांना काय म्हणतात?

1) इलेक्ट्रॉन

2) पॉझीट्रॉन

3) फोटॉन

4) प्रोटॉन

उत्तर:3) फोटॉन

 

 1. 31. धनविधेयक प्रथम…….मध्ये प्रस्तुत केले जाते.

1) दोन्ही सभागृहात

2) फक्त लोकसभेत

3) फक्त राज्यसभेत

4) फक्त राष्ट्रपती भवनात

उत्तर: 2) फक्त लोकसभेत

 

 1. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

1) पुणे

2) नागपुर

3) नाशिक

4) ठाणे

उत्तर:2) नागपुर

 

 1. महाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

 

1) व्यंकटरमन

2) व्ही. व्ही. गिरी

3) शंकरदयाल शर्मा

4) पी.सी. अलेक्झांडर

उत्तर:4) पी.सी. अलेक्झांडर

 

 1. 1857 च्या उठावास काय कारणीभुत झाले?

1) डलहौसीचे आक्रमक धोरण

2) सामाजिक व धार्मीक जीवनातीलहस्तक्षेप

3) सैनिकांतील असंतोष

4) कंपनी काळातील राज्यविस्तार

1) (1) व (2)

2) (2) व (3)

3).(1), (2)व (3)

4) (1), (2), (3) व(4)

उत्तर:4) (1), (2), (3) (4)

 

 1. 0.004 ×0.5= ?

1) 0.00020

2) 0.0020

3) 0.020

4) 0.2000

उत्तर: 2) 0.0020

 

 1. सोडवा: (x2-v’2) (x + Y)/ (x + y) 2

1) (X-Y)

2) (X +Y)

3) (2X+Y)

4) यापैकी काहीही नाही

उत्तर: 2) (X +Y)

 

 1. 1, 2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत?

1) 10

2) 20

3) 9

4) 16

उत्तर: 2) 20

 

 1. छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणु म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडीलांचा एकुलता मुलगा आहे. माझी आई तिच्या वडीलांची एकटी मुलगी आहे. मुलीच्या आईंचे गणुशी नाते •दर्शविणारा पर्याय निवडा.

1) मावशी

2) आत्या

3) आई

4) आजी

उत्तर: 3) आई

 

 1. X Y चा अर्थ आहे, x आई आहे 2 ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे, x मुलगी आहे Z ची तर M -N * T + Q या संबधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

1) M सासु आहे. Q ची

2) Q पत्नी आहे, N ची

3) Q मुलगी आहे, M ची

4) T मुलगी आहे, Q ची

उत्तर: 3) Q मुलगी आहे, M ची

 

 1. एका चौकोनी टेबलच्या भोवती 2 मुले व 2 मुली वसलेले आहेत. ते उत्तर, पुर्व, दक्षिण, आणि पश्चिम दिशेला तोंड करुन बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पुर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलांचे तोंड दक्षिण दिशेला आहे. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करुन बसलेल्या आहेत?

1) पूर्व आणि पश्चिम

2) दक्षिण आणि पूर्व

3) उत्तर आणि पश्चिम

4) उत्तर आणि पूर्व

उत्तर: 3) उत्तर आणि पश्चिम

 

 1. हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढीलप्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असुन, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजुला गणेश आहे. भारत व धनराज याच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रीका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?

1) 1

2) 2

3) 3

4) 4

उत्तर: 3) 3

 

 1. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
5 6 7
15 ? 35
60 120 210

 

1)-10

2) 12

3) 18

4) 24

उत्तर:4) 24

 

 1. खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये असु शकतात.

1) साठी

2) बाहेर

3) आणि

4) परंतु

1) 1 व 4

2) 2 व 3

3) 1, व 2

4)1, 2 व 4

उत्तर:3) 1, 2

 

 1. इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा.

अ. किताब 1. हस्तस्पर्श

ब. दस्तपोशी 2. पदवी

क. फतेह  3. राजपत्र

ड. फर्मान 4. विजय

1) (अ)(3), (ब)(4), (क)(2), (ड) (1)

2) (अ)(2), (ब)(3), (का(2),(ड) (1 )

3) (अ)(2), (ब)(1), (क)(4). (ड) (3)

4) (अ)(4), (ब)3), (क)(2), (ड)(1)

उत्तर:3) (अ)(2), (ब)(1), (क)(4). (ड) (3)

 

45.छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?

1) गितारहस्य

2) ग्रामगिता

3) शंभुभुषण

4) बुधभुषण

उत्तर:4) बुधभुषण

 

 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालील पैकी कोण होते?

1) हंबीरराव मोहिते

2) मोरो त्रिंबक पिंगळे

3) अण्णाजी दत्तो

4) रामचंद्र त्रिंबक डबीर

उत्तर:4) रामचंद्र त्रिंबक डबीर

 

47.मानवी विकास निर्देशांक ठरवितांना प्रामुख्याने कुठले निकष विचारातघेतले जातात?

अ. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान)

ब. आरोग्य (अपेक्षित आयुर्मान )

क. शिक्षण (शैक्षणिक कालावधी)

ड. आनंदाचे प्रमाण

इ. अन्न उपलब्धता

पर्याय

1) ब, क फक्त

2) ब, क आणि इ

3) अ, ब आणि क

4) वरीलपैकी सर्व

उत्तर:3) , ब आणि क

 

48.नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?

1) Electronic Voting Machine EVM

2) Voter Verified Electronic Voting Machine – VVEVM

3) Voter Verified Paper Audit Trail-VVPAT

4) Electronic Paper Audit Machine – EPAM

उत्तर:3) Voter Verified Paper Audit Trail-VVPAT

 

 1. चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?

1) सुंदरलाल बहुगुणा

2) मृणाल गोरे

3) डॉ. फुलरेणु गुहा

4) प्रमिला दंडवते

उत्तर:1) सुंदरलाल बहुगुणा

 

 1. खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटार सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यातयेते?

1) 21

2) 17

3) 18

4) 16

उत्तर:4) 16

 

51.वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणुनमिश्रीत केले जाते?

1) सोडीयम क्लोराईड

2) क्युप्रस ऑक्साईड

3) इथेनॉल

4) नायट्रोजन पेरॉक्साईड

उत्तर:3) इथेनॉल

 

 1. नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास, किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहीती दिली पाहीजे?

1) 7 दिवसाच्या आत

2) 14 दिवसाच्या आत

3) 21 दिवसाच्या आत

4) 30 दिवसाच्या आत

उत्तर:2) 14 दिवसाच्या आत

 

 1. मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकीकुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?

1) कलम 84 मो. वा. का. च्या शर्तीचा भग

2) परवान्याशी संबंधित वाहनावर परवानाधारकाची मालकी संपुष्टातआल्यावर

3) लबाडीने किंवा चुकीची माहीती देवून परवाना प्राप्त केला असल्यास

4) परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास

उत्तर:4) परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास

 

 1. दारु प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहनकायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?

1) 184

2) 187

3) 185

4) 186

उत्तर:3) 185

 

 1. दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करीता पात्र ठरतो? (मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार)

1) 100 मिली रक्तात 30 मि. ग्रॅ. पेक्षा अधिक

2) 100 मिली रक्तात 20 मि. ग्रॅ. पेक्षा कमी

3) 100 मिली रक्तात 10 मि. ग्रॅ. पेक्षा कमी

4) कितीही प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास

उत्तर:1) 100 मिली रक्तात 30 मि. ग्रॅ. पेक्षा अधिक

 

56.टायरचे प्लाय रेटींग काय ठरवते?

1) टायरचे आयुष्यमान

2) टायर किती कि.मी. चालु शकते याचे प्रमाण

3) वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन

4) बाहुन नेण्याची परवानगी असलेले कमाल प्रवासी संख्या

उत्तर:3) वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन

 

 1. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील स्टॉपिंग डिस्टन्स हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?

1) किती भार टाकल्यानंतर थांबायचे

2) सिग्नल वरती वाहनांनी एकमेकांपासुन किती अंतरावर थांबायचे

3) ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहचण्यास लागलेले अंतर

4) टोल नाक्यावरती माग उभे असंताना ठेवावयाचे अंतर

उत्तर:3) ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहचण्यास लागलेले अंतर

 

 1. वाहनाचे PUC Certificate काढले जाते, त्याचा Full form पूर्ण रुप नक्की काय?

1) Pollution Under Check Certificate

2) Pollution under Center Certificate

3) Pollution Under Convey Certificate

4) Pollution Under Control Certificate

उत्तर:4) Pollution Under Control Certificate

 

 1. मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?

1) चिखलातून मोटार वाहन गाडी व्यवस्थित बाहेर काढण्यासाठीची सोय

2) चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय

3) दुसऱ्या मोटार वाहनाची धडक बसुन नुकसान होवु नये म्हणुन लावलेले यंत्र

4) मोटार वाहनाच्या चेन वरती लावलेले सुरक्षिततेचे आवरण

उत्तर:2) चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय

 

 1. मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?

1) चांकाना बळ आणि स्थैर्य देते

2) इंधन वायु मिश्रणामध्ये आग लावण्याचे कार्य करते

3) रासायनिक उर्जेला गतिज उर्जेमध्ये परावर्तित करते

4) विद्युत उर्जा निर्माण करते

उत्तर:3) रासायनिक उर्जेला गतिज उर्जेमध्ये परावर्तित करते

 

 1. कोणत्या ग्रहा भोवती कडी आहे?

1) गुरु

2) युरेनस

3) शनी

4) शुक्र

उत्तर:3) शनी

 

 1. उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस कोणता?

1) 21 जुन

2) 22 डिसेंबर

3) 22 जुलै

4) 21 डिसेंबर

उत्तर:1) 21 जुन

 

 1. मृदेचा PH (सामु) जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते?

1) उदासीन

2) अम्लयुक्त मृदा

3) आम्लारीधर्मी मृदा

4) उच्च मृदा

उत्तर:3) आम्लारीधर्मी मृदा

 

 1. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिक रित्या कोणत्या अवस्थेत सापडते?

1) स्थायु

2) द्रव

3) वायु

4) वरीलपैकी कोणतेच नाही

उत्तर:3) वायु

 

 1. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

1) अलबर्ट आईनस्टाईन

2) जेम्स वॅट

3) चॉमस एडिसन

4) न्युटन

उत्तर:2) जेम्स वॅट

 

 1. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान एक

1) मत आहे

2) धारणा आहे

3) वस्तुस्थिती आहे

4) दृष्टीभ्रम आहे

उत्तर:3) वस्तुस्थिती आहे

 

 1. 2/5 म्हणजे किती टक्के?

1) 20%

2) 50%

3) 40%

4) 60%

उत्तर:3) 40%

 

 1. 47.07 भागिले 1000 = किती?

1) 470.7

2) 4.707

3) 0.4707

4) 0.04707

उत्तर:4) 0.04707

 

 1. सगळेच शहाणे कसे असतील? या वाक्याचा प्रकार ओळखा

1) नकारार्थी

2) विधानार्थी

3) उद्गारार्थी

4) प्रश्नार्थक

उत्तर:4) प्रश्नार्थक

 

 1. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
6 60 5
8 112 17
14 ? 12

 

1) 172

2) 168

3) 252

4) 330

उत्तर:1) 172

 

 1. 1/2 + 2/3 =?

1) 3/4

2) 12/5

3) 7/6

4) 3/5

उत्तर:3) 7/6

 

72.25×24=/23= ?

1) 23

2) 26

3) 27

4) 2

उत्तर:2) 26

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी अचुक अक्षर आणि अंक असलेला पर्याय निवडा.
B F J N ?
4 8 12 16 ?

 

1) U/20

2) R/20

3) V/14

4) X / 22

उत्तर:2) R/20

 

 1. 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पुल ओलांडण्यास एक मिनीट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असावी?

1) 1000 मी

2) 1200 मी

3) 1500 मी

4) 1300 मी

उत्तर:1) 1000 मी

 

75.एका दिवसात किती सेकंद असतात?

1) 68400

2) 85400

3) 86400

4) 48500

उत्तर:3) 86400

 

76.खालीलपकी विसंगत गट ओळखा,

1) 2=6

2) 1=1

3)3=81

4) 4= 64

उत्तर:4) 4= 64

 

77.प्रश्नचिन्हाच्या जागी समर्पक पर्याय निवडा,

आगगाडी डबा : जंगल ?

1) फळ

2) झाड

3) फुल

4) बाग

उत्तर:2) झाड

 

 1. 10 सें.मी. चे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती?

1) 1:20

2) 2:20

3) 3:20

4) 4:20

उत्तर:1) 1:20

 

 1. अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे?

1) उत्तर अमेरिका

2) दक्षिण अमेरिका

3) आफ्रिका

4) ऑस्ट्रेलिया

उत्तर:2) दक्षिण अमेरिका

 

80.सरपटणारे प्राणी……असतात

1) शीत रक्ताचे

2) गरम रक्ताचे

3) ऐकू न येणारे

4) अंडी घालणारे

उत्तर:1) शीत रक्ताचे

 

 1. 260 चा 2/5 =?

1) 104

2) 106

3) 102

4) 108

उत्तर:1) 104

 

 1. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

1) आईनस्टाईन

2) न्यूटन

3) राईट बंधु

4) कोपरनिकस

उत्तर:3) राईट बंधु

 

 1. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहीला मानव कोण?

1) रॉबर्ट पिअरे

2) रोआल्ड आंमुढसेन

3) एडमंड हिलरी

4) तेनसिंग नोर्के

उत्तर:2) रोआल्ड आंमुढसेन

 

 1. खालीलपैकी कुठल्या नद्या लातुरशी निगडीत आहेत?
 2. तावरजा, 2. लेंडी, 3. तेरणा, 4. चंपा, 5. भामा,

1) 1.3 आणि 4

2) 1, 2, 3 आणि 4

3) 1, 2, 3

4) 1 आणि 3 फक्त

उत्तर:3) 1, 2, 3

 

 1. लातुरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद या किताबाने सन्मानित होते?

1) काका किशनराव पवार

2) शैलेश शेळके

3) शाहुराज बिराजदार

4) हरिश्चंद्र बिराजदार

उत्तर:4) हरिश्चंद्र बिराजदार

 

 1. लातुरातील वळुची (बैल) कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?

1) अहमदपुरी

2) जानवळ

3) जळकोट

4) देवणी

उत्तर:4) देवणी

 

 1. पुढीलपैकी कोणत्या गुप्ता राजाने महेन्द्रादित्य ही पदवी घेतली?

1) दुसरा चंद्रगुप्त

2) समुद्रगुप्त

3) कुमारगुप्त पहीला

4) स्कन्धगुप्त

उत्तर:3) कुमारगुप्त पहीला

 

 1. 1857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले?

1) प्रा. न. र. फाटक

2) पी.ई. रॉबर्टस

3) डॉ. मुजुमदार

4) वि. दा. सावरकर

उत्तर:4) वि. दा. सावरकर

 

 1. खालीलपैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घाटास जोडते?

1) बिलीगिरी

2) निलगिरी

3) निमगिरी

4) नल्लामल्ला

उत्तर:2) निलगिरी

 

 1. सुवर्णक्रांती (Golden Revolution) चा संबंध खालीलपैकी कशाबरोबरचा आहे?

1) अन्न उत्पादन

2) दुग्ध उत्पादन

3) मधुमक्षिका पालन

4) फुलोत्पादन

उत्तर:3) मधुमक्षिका पालन

 

 1. भारतीय राज्यघटनेतील नागरीकांच्या मुलभुत कर्तव्याची तरतुद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?

1) फ्रान्स

2) जर्मनी

3) यु.एस.एस. आर. (रशिया)

4) अमेरिका

उत्तर:3) यु.एस.एस. आर. (रशिया)

 

 1. अतारांकित प्रश्नाची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे?

1) 7 दिवस

2) 15 दिवस

3) 1 महिना

4) तीन महिने

उत्तर:2) 15 दिवस

 

 1. 9 विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तुप कसा असतो?

1) अरुंद पाया आणि रुंद माथा

2) रुंद पाया आणि रुंद माथा

3) रुंद पाया आणि अरुंद माथा

4) अरुंद पाया आणि अरुंद माथा

उत्तर:3) रुंद पाया आणि अरुंद माथा

 

 1. खालील चौकोनाकृती ठोकळ्यांच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि त्यावरुन जर 5 हा अंक ठोकळ्याच्या पृष्ठावर येत असेल तरत्याच्या तळाशी कोणता अंक येईल ते शोधा.

1)3

2) 4

3)1

4) 2

उत्तर:1)3

 

95 भारतामध्ये सीमाची सुरक्षा कोणाकडे आहे?

1) BSF

2) CRPF

3) CISF

4) RPF

उत्तर:1) BSF

 

 1. खालील आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?

 

1)69

2) 11

3) 12

4) 10

उत्तर:2) 11

 

 1. लातूर जिल्ह्यात वने तुलनेने………आहेत.

1) जास्त

2) अतिजास्त

3) कमी

4) यापैकी नाही

उत्तर:3) कमी

 

 1. साईनंदनवन हे लातुर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ कोठे आहे?

1) निलगीरी

2) तारजार

3) चाकुर

4) लातुर शहर

उत्तर:3) चाकुर

 

 1. गंजगोलाई बाजारपेठ असणारे शहर कोणते?

1) परभणी

2) बीड

3) उस्मानाबाद

4) लातुर

उत्तर:4) लातुर

 

 1. ‘बुस्टर डोस’ म्हणजेच……….. लसींची मात्रा.

1) क्षीण मात्रा

2) न्युनमात्रा

3) अल्पमात्रा

4) वर्धक मात्रा

उत्तर:4) वर्धक मात्रा

 

सुचना : या पेपरमधील तुरळक प्रश्न स्मरणावर आधारीत आहेत.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT