ZP पुण्यात 714 रिक्‍त पदांची सरळसेवा भरती 2020

लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील नियुक्‍ती आदेश दिले गेले नव्हते. या प्रश्‍नी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा 10 टक्‍के सेवक भरतीचे आदेश काढले जातील, असे आश्‍वासन तत्कालीन अध्यक्ष देवकाते यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषद सेवक म्हणून भरावयाच्या 10 टक्‍के जागांची भरतीसाठी हालचाली झाल्या. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेली सेवक भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२० Click Here

दरम्यान, गतवर्षी जानेवारीत अंतिम ज्येष्ठता यादी ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केली होती. त्या यादीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मुळ कागदपत्रे पडताळणी करून कागदपत्रांच्या छायाकिंत प्रती प्राप्त करून घेण्यात आलेल्या आहेत. त्या कागदपत्रांच्या छाणनीनंतर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे आवश्‍यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती ग्रामपंचायतींकडून घेऊन त्याआधारे दुरुस्ती करून सुधारित अंतिम यादी करण्याचे काम सुरू आहे. हे काम दि.5 फेब्रवारीपर्यंत पूर्ण करून त्यावर हरकती व सूचना दोन दिवसांच्या आत मागवण्यात येणार आहे.

Source: Dainik Prabhat

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.