Vanrakshak Practice Paper 05 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०५

Maharashtra Vanrakshak Practice Paper 05 – Forest Guard Practice Paper 05

स्वांतत्र्य च्या अमृत महोस्तवी महाराष्ट्र सरकारने ७५,००० पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वन मंत्रालय मार्फत “वनरक्षक” या पदांची पदभरती राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आपण बदलत्या अभ्यास क्रमानुसार व परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……..

मराठी व्याकरण टेस्ट सीरीज 2

1) कामापुरता मामा ताकापुरती आजी’ या म्हणीचा अर्थ –
A. आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
B. मागून येऊन वरचढ होणे.
C. कधी गरीबी तर कधी श्रीमंती असणे.
D. नाती सांभाळणे
Answer: A. आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.

2) “मला हा डोंगर चढवतो.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
A. भावे
B. कर्मणी
C. कर्तरी
D. नवीन कर्मणी
Answer: B. कर्मणी

3) चुकीची जोडी ओळखा.
A. छे छे, छट – विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
B. हुडत, शी – तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
C. शिव-शिव, अरेरे – आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

D. अरे, अहो – संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Answer: C. शिव-शिव, अरेरे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

4) खालीलपैकी देशी शब्द नसलेला पर्याय निवडा.
A. वारकरी, चिमणी
B. घोडा, धोंडा
C. अडकित्ता, चाकरी
D. डोंगर लुगडे
Answer: C. अडकित्ता, चाकरी

5) ‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. घसा कोरडा पडणे.
B. तोंडाला पाणी सुटणे.
C. घाबरणे.
D. तोंड येणे.
Answer: C. घाबरणे.

6) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.

A. भाषीक
B. भाषिक
C. भाशीक
D. भाशिक
Answer: B. भाषिक

7) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. चंद्र x इंद्र
B. इलाज x नाइलाज
C. चांदणे x कौमुदी
D. जमीन x भूमी
Answer: B. इलाज x नाइलाज

8) उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल. या वाक्याचा काळ कोणता?
A. साधा भविष्यकाळ
B. अपूर्ण भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. रिती भविष्यकाळ
Answer: A. साधा भविष्यकाळ

9) पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?
A. शौर्य शाळेत गेला.
B. त्याने अभ्यास केला.
C. तिने जेवण केले.
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

10) खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणान्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा
. निरज आकाशात रात्रीच्यावेळी तारकांचा….. पाण्यात एक वेगळी मजा असते.
A. घोळका
B. कळप
C. थवा
D. पुज
Answer: D. पुज

11) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा ———— शासनाकडे पाठवण्यात आला.
A. प्रक्षालन
B. प्रजन
C प्रस्ताव
D. प्रसरण
Answer: C. प्रस्ताव

12) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
राज्यकत्यांनी विकासाचा कितीही ———- केला, तरी जनतेला सत्य कळत असते.
A. भाव
B. जीव
C. कीव
D. आव
Answer: D. आव

13) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
A. इहलोक = परलोक
B. बिकट = सुलभ
C. कपट = डाव
D. शीघ्र = मंद
Answer: C. कपट = डाव

14) प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टध्यायी’ ———- यांनी लिहिले होते.
A. बाणभट्ट
B. पाणिनि
C. सूरदास
D. तुलसीदास
Answer: B. पाणिनि

15) ‘गरज सरो अन वैद्य मरो’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
A. एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये
B. एखाद्याच्या मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे
C. आपलाच शहाणपणा आपल्यालाच नडणे
D. मुळीच हट्ट न सोडणे
Answer: A. एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये

16) ‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. आसक्ती
B. पर्वा
C. आवश्यक
D. बेसावध
Answer: B. पर्वा

17) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
A. पंचतारांकित
B. उपनिषद
C. गुरूकिल्ली
D. धीरगंभीर
Answer: C. गुरूकिल्ली

18) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
A. दिवस x वार
B. दूध x पेय
C. उपकार x अपकार
D. देऊळ x मंदिर
Answer: C. उपकार x अपकार

19) कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A. किती + एक
B. कित्येक
C. किती + ऐक
D. कि + एक
Answer: A. किती + एक

20) बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.
A. अर्थान्तरन्यास
B. भ्रांतिमान
C. व्यतिरेक
D. अनन्वय
Answer: A. अर्थान्तरन्यास

21) “दोरखंड” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. पाणी
B. चहाट
C. चंडांशू
D. कोदंड
Answer: B. चहाट

22) पोटीच एक पद लांबविला दुजा तो
पक्षी तनू लपवि भूप तपा पाहतो|
वरील वाक्यातील अलंकार कोणता?
A. उत्प्रेक्षा
B. अर्थान्तरन्यास
C. भ्रांतिमान
D. स्वभावोक्ति
Answer: D. स्वभावोक्ति

23) कपोत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. कापूस
B. कबुतर
C. घुबड
D. किमान
Answer: B. कबुतर

24) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
आपल्या आजूबाजूला नेहमीच मन ——– करणाऱ्या घटना घडत असतात.
A. विदीर्ण
B. गजकर्ण
C. अनुत्तीर्ण
D. अपवर्ण
Answer. A. विदीर्ण

25) दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
असेल तेव्हा दिवाळी,——-
A. नसेल तेव्हा शेवाळी
B. आरती ओवाळा सकाळी
C. कीर्तन व्हावे संध्याकाळी
D. नसेल तेव्हा शिमगा
ANS: D. नसेल तेव्हा शिमगा


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT