ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील २०५ जागांसाठी भरती २०२०

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची २०५ रिक्त पदे

उपचारासाठी सरकारी रुग्णालयांत धाव घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे डॉक्टरांअभावी हाल होत असून ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदांची संख्या मोठी आहे. आजघडीला २००च्या आसपास वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त पदांमध्ये वर्ग एक आणि दोनच्या अनेक पदांचा समावेश असून ही सर्व रिक्त पदे भरून रुग्णांना दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

खासगी रुग्णालयातील उपचारपद्धती परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यावाचून पर्याय नसतो. मात्र, सरकारी रुग्णालयात आल्यानंतर रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने काहीवेळेला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णांना पाठवले जाते. त्याही रुग्णालयात यंत्रसामुग्रीचा अभाव असल्यास रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात जावे लागते. मात्र प्रवासामध्येच अधिक वेळ गेल्यास एखादा रुग्ण वाटेतच दगावण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांपासून उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. परंतु सरकारी पातळीवर त्यादृष्टीने प्रयत्न होत नसल्याने रुग्णांची होणारी परवड थांबेनाशी झाली आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयात रुग्णांची वर्दळही खूप असून संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र सिव्हिल रुग्णालयांसह जिल्ह्यातील इतरही विविध सरकारी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे वैद्यकीय अधिकारी नाहीत. विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई गाठावी लागते.

पालघर आणि रायगडमधील सरकारी रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. हे तिन्ही जिल्हे मिळून वर्ग एक, गट ब आणि वर्ग दोनची मिळून एकूण रिक्त पदांची संख्या २०५ असल्याची माहिती ठाण्यातील उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. या पदांमध्ये कंत्राटी स्वरूपाच्या पदांचा समावेश आहे. वर्ग एकची पदे भरण्याविषयी शासनस्तरावर प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात येते. सर्वाधिक डॉक्टरांची ८६ रिक्त पदे ठाणे जिल्ह्यातच असून त्यानंतर रायगडमध्ये ७१ आणि तिसऱ्या क्रमांकावर पालघर जिल्हा आहे. पालघरमधील रिक्त पदांची संख्या ४२ असून मुंबईत सहा पदे रिक्त आहेत.

ठाणे जिल्ह्यात वर्ग एकची ५५ पदे रिक्त

ठाणे जिल्ह्यात वर्ग एकची ८५ पदे मंजूर असून त्यापैकी ५५ पदे रिक्त आहेत. पालघरमध्ये २१ मंजूर पदांपैकी १४ पदे रिक्त असून रायगडमध्ये अनुक्रमे ३९ मंजूर पदांपैकी २८ पदे रिक्त आहेत. गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये ठाणे जिल्ह्यात एकही पद रिक्त नसून २४ पदे भरलेली आहेत. तर, पालघरमध्ये ६८ पदांपैकी ६ पदे रिक्त असून रायगडमध्ये आठ पदांपैकी केवळ एकच पद रिक्त आहे. गट ‘ब’ची राज्यस्तरीय सर्वच्या सर्व २७ पदे भरलेली आहेत.

पगार कमी

सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना तसेच कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पगार कमी मिळतो. त्यामुळे कोणी काम करण्यास तयार होत नाही. तसेच भरती झालेले डॉक्टरही नंतर सोडून जात असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकदा कंत्राटी भरतीला प्रतिसादही मिळत नाही.

वर्ग दोन पदांची संख्या (राज्य आणि जिल्हास्तर)

मंजूर पदे = रिक्त पदे

ठाणे २५२ = ३१

पालघर १३५ = २२

रायगड २५१ = ४२

मुंबई ६९ = ६

एकूण ७०७ = १०१

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.