Talathi Practice Paper 09 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ९

Talathi Practice Paper 09 | Talathi Practice Question Paper Set 09

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
वावडी उडवणे
A. हुप्या माकड पाहिल्याची राजेशने गावात वावडी उडवली.
B. राजू पडल्यावर मित्रांनी हसून त्याची वावडी उडवली.
C. शिल्पाचे लग्न चांगल्या घरी जमले नाही म्हणून तिच्या पालकांनी गावात वावडी उडवली.
D. अचानक आलेल्या वादळाने रस्त्यावर वावडी उडवली.
Answer: A. हुप्या माकड पाहिल्याची राजेशने गावात वावडी उडवली.

2) “दोरखंड” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. पाणी
B. चहाट
C. चंडांशू
D. कोदंड
Answer: B. चहाट

3) पोटीच एक पद लांबविला दुजा तो
पक्षी तनू लपवि भूप तपा पाहतो|
वरील वाक्यातील अलंकार कोणता?

A. उत्प्रेक्षा
B. अर्थान्तरन्यास
C. भ्रांतिमान
D. स्वभावोक्ति
Answer: D. स्वभावोक्ति

4) कपोत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. कापूस
B. कबुतर
C. घुबड
D. किमान
Answer: B. कबुतर

5) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा:

प्रथमेश टीव्हीवरील गायनाच्या स्पर्धेत पहिला आला तेव्हा त्याच्या शाळेतील अभिषेक सगळ्यांना सांगत सुटला की त्याचे व प्रथमेशचे वडील एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. खरे तर ते एकमेकांना एकदाच भेटले होते. म्हणतात ना —–
A. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ
B. वाहत्या गंगेत हात धुणे.
C. बाप तसा बेटा
D. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा
Answer: A. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ

6) पक्षी आकाशात उडतो. या वाक्यातील प्रयोग कोणता?
A. सकर्मक कर्तरी प्रयोग

B. नवीन कर्मणी प्रयोग
C. अकर्मक कर्तरी प्रयोग
D. शक्य कर्मणी प्रयोग
Answer: C. अकर्मक कर्तरी प्रयोग

7) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सभेत धीटपणे भाषण करणारा
A. ढालगज
B. सभाधीट
C. आगंतुक
D. जहाल
Answer: B. सभाधीट

8) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा
A. गणेशोत्सव सार्वजनीक कार्यक्रम आहे.
B. तो समारंभ निर्विघ्नपणे पार पडला.
C. त्यांनी खूप मोठी मरवणूक काढली.
D. गुंडांची वृत्ती समाजविघाटक असते.
Answer: B. तो समारंभ निर्विघ्नपणे पार पडला.

9) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
कूपमंडूक
A. सप्तमी तत्पुरुष
B. कर्मधारय
C. बहुव्रीहि
D. द्विगु
Answer: A. सप्तमी तत्पुरुष

10) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सिंह x कैसरी
B. सगुण निर्गुण
C. ज्ञानी x अज्ञानी
D. हार x जीत
Answer: A. सिंह x केसरी

विभाग-२ इंग्रजी

11) Find the word closest in meaning to the word:
Mediate
A. Cut in the middle
B. Arbitrate
C. Obliterate
D. Performance
Answer: B. Arbitrate

12) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
Don’t jeer at the students who came last in the race – it’s very unkind
A. To applause someone
B. To cheer someone
C. To ridicule or sneer at someone
D. To be disappointed with someone or something
Answer: C. To ridicule or sneer at someone

13) Pick the right idiom which fits into the sentence:
He is so lazy that to tell him about your adventures is like

A. Putting the cart before the horse
B. Smelling a rat
C. Casting pearls before a swine
D. Catching a tartar
Answer: C. Casting pearls before a swine

14) Fill in the blanks with the right set of words: the thief, He had to be ———– a lot before he was caught ————The policeman.
A. Was catching, pursuing
B. Catch, pursue
C. Caught, pursued
D. Catched, pursued
Answer: C. Caught, pursued

15) Identify the figure of speech in the following sentence:
Time marches at its own drum.
A. Oxymoron
B. Personification
C. Simile
D. Apostrophe
Answer: B. Personification

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
The law compels employers to provide health insurance.
A. Hinder
B. Dissuades
C. Halts

D. Urges
Answer: D. Urges

17) खाली दिलेल्या पत्यापैकी 3 पत्ते समान आहेत आणि भिन्न आहे. कोणता पत्ता भिन्न ते ओळखा?
A. B-271, SECTOR-2, Rourkela, Rourkela 769006 Odisha, PH0850850404
B. B-271, SECTOR-2, Rourkala Rourkela – 769006 Odisha, PH 0850850404
C. B-271, SECTOR-2. Rourkela, Rourkela 769006 Odisha, PH 0850850404
D.B-271, SECTOR-2, Rourkela, Rourkela – 769006 Odisha, PH 0850850404
Answer: B.B-271, SECTOR-2, Rourkala Rourkela-769006 Odisha PH 0850850404

18) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
I let the cat out of the bag when I reveled her secret birthday party details
A. To accidently revel a secret
B. To be smart and understand all details
C. To gossip about someone or something
D. To have animals perform at a party
Answer: A To accidently revel a secret

19) Pick the right idiom which fits into the sentence:
He ———— before his exams.

A. Died by inches
B. Burnt the candles at both ends
C. Held water
D. Saw red
Answer: B. burnt the candles at both ends

20) Pick the right antonym for the word:
Vicious
A. Pious
B. Fearsome
C. Acute
D. Intensive
Answer: A. Pious

विभाग-३ गणित

21) 9.25 +2.25 +3.5 – (9.25-5.50-4.75) =
A. 15
B.16.0
C.17
D. 16.25
Answer: B. 16.0

22) x चे पश्चिम दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: D. पूर्व

23) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A.55+22-75+42-12-23+45 +27
B.228 +27-25+32-221+204-44-37
C.79+42+215+42-31-203 +45 +27
D.38-207-25-32-21+ 204 +244-7
Answer: A.55+22-75+42-12-23+45 +27

24) जर $ आहे आणि @ आहे तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A.25 $ 22 @ 15 $42 $ 12 @ 203 $ 45 $ 27
B.28 $ 27 @ 25 $ 32 @ 21 $ 204 @ 44 @37
C.29 $ 22 @ 215 $ 42 $ 31 $ 203 $45 $ 27
D.38 $ 207 @ 25 @ 32 @ 21 $ 204 @ 44 @ 37
Answer: A.25 $ 22 @ 15$ 42$ 12 @ 203 $45 $ 27

25) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर FUZZBALLS हा शब्द ———- असेल.
ALLSBAFUZZ
B.ZUFABZLLS
C.ZZFUBASLL
D.LLBASFUZZ
Answer: B.ZUFABZLLS

26) सहा जण P, Q, R, S x आणि 2 हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. x चा शेजारी बसलेला P हा S व्या कर्णाभिमुख आहे. 5 हा 2 व्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे हा कोणत्याही ररांगेच्या शेवटी बसलेला नाही. R हा Z. च्या शेजारी आहे. x आणि s ची जागेची अदलाबदल केल्यानंतर नव्या ठिकाणी S या शेजारी कोण असतील?
A.P आणि Q
B.2 आणि Q

C.Pआणि R
D. वरीलपैकी काहीही नाही
Answer: A.P आणि Q

27) 12/20 +5.5 + 5/40 = ?
A. 5.6
B. 6.225
C. 5.975
D. 7.9
Answer: C. 5.975

28) 15/25+0.5 + 5/40 = ?
A.0.975
8.0.625
C.0.875
D.1.55
Answer: A.0.975

29) 13.25+12.55 + 4.75 – (5.25-8.75 +2.25) =
A.31.55
B.32.15
C.31.8
D.31.65
Answer: C.31.8

30) x चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

A. पूर्व
B. पश्चिम
C. उत्तर
D. दक्षिण
Answer: A. पूर्व

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) परिसंस्थेमध्ये हिरव्या वनस्पतींना ——- सुद्धा म्हटले जाते.
A. द्वितीय उत्पादक
B. प्राथमिक उत्पादक
C. द्वितीय उपभोक्ता
D. प्राथमिक उपभोक्ता
Answer: B. प्राथमिक उत्पादक

32) पुढीलपैकी कोणती मणिपूरची राजधानी आहे?
A. कोहिमा
B. इंफाळ
C. ऐझवाल
D. दिसपूर
Answer: B. इंफाळ

33) महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. जळगाव
B. यवतमाळ
C. गडचिरोली
D. सिंधुदुर्ग
Answer: B. यवतमाळ

34) भारतात सतीप्रथा बंद होण्यासाठी प्रमुख कार्य खालीलपैकी कोणी केले?
A. राजाराम मोहन राय
B. मल्हारराव होळकर
C. शिवाजी महाराज
D. महात्मा फुले
Answer: A. राजाराम मोहन राय

35) कर्नाटकाचा राज्यप्राणी कोणता आहे?
A. इसी
B. अस्वल
C. हरिण
D. खार
Answer. A. हत्ती

36) संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
A. ग्रामगीता
B. अमृतानुभव
C. दासबोध
D. एकनाथी भागवत
Answer: A. ग्रामगीता

37) संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा ——– आहेत.
A. 545
B.5651
C.530
D.555
Answer: A. 545

38) भारतात नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय कोठे आहे?
A. जमशेदपूर
B. बोकारो
C. धनबाद
D. हजारीबाग
Answer: A. जमशेदपूर

39) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” ही घोषणा ——— म्हटली होती.
A. बाळ गंगाधर टिळक
B. लाला लजपत राय
C. बिपीन चंद्र पाल
D. गोपाळ कृष्ण गोखले
Answer: A. बाळ गंगाधर टिळक

40) पुढीलपैकी कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले?
A. सी. व्ही. रमन
B. अब्दुस सलाम
C. हरगोविंद खुराना
D. सुब्रमण्यम चंद्रशेखर
Answer: A. सी. व्ही. रमन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT