Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

Solve these नळ – टाकी (Nal taki) problems to ace Reasoning part

Shanku
शेअर करा:WhatsApp
Solve these नळ – टाकी (Nal taki) problems to ace Reasoning part

This is the sixth topic article on Nal taki for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the नळ – टाकी Nal taki topic.

या घटका मधे आपण टाकी एका नळाने किंवा दोन नळाने किती वेळात भरेल यासाठी लागणारा वेळ काढणार आहोत.

1.) जर एका नळाने एक टाकी A या वेळेत भरत असेल आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने B या वेळेत भरत असेल, तर दोन्ही नळ त्या टाकी मधे चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल हा वेळ आपण T समजू.

आणि खालील सूत्र वापरून आपण दोन्ही नळ चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल तो वेळ महणजेच T हा काढू.

1/T = 1/A + 1/B

म्हणून, T = (A×B)/(A+B)

2.) जर एक टाकी एका नळाने A या वेळेत भरत असेल आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने B या वेळेत रिकामी होत असेल, तर दोन्ही नळ चालू केल्यास भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल हा वेळ आपण T समजू.

आणि खालील सूत्र वापरून आपण तो वेळ T काढू शकतो.

1/T = 1/A – 1/B

म्हणून,

T = (A×B)/(B-A)

3.) जर एक टाकी एका नळाने A या वेळेत भरते, दुसऱ्या नळाने B या वेळेत तीच टाकी रिकामी होते आणि तिसऱ्या नळाने तीच टाकी C या वेळेत रिकामी होते, जर हे तिन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल हा वेळ आपण T समजू.

आणि तो वेळ आपण खालील सूत्र वापरून काढू शकतो.

1/T = 1/A + 1/B – 1/C

 1.) एका नळाने एक टाकी 10 मिनिट मधे भरते आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने 20 मिनिट मधे भरते. जेव्हा हे दोन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केले तर ती टाकी पूर्णतः भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

a) 7 मिनिटे

b) 4 मिनिटे

c) 5 मिनिटे

d) 6 मिनिटे

उत्तर: c) 5 मिनिटे

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात, एक टाकी एका नळाने 10 मिनिट मधे तर दुसऱ्या नळाने 20 मिनिट मधे भरते असे दिले आहे. आणि हे दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी पूर्णतः भरण्यासाठी लागणारा वेळ T आपणास काढायचा आहे.

त्यासाठी आपण खालील सूत्र वापरू.

T = (A×B)/(A+B)

 

T = (10×20)/(10+30)

T = (10×20)/40 = 10/2 = 5

म्हणून जेव्हा दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तेव्हा ती टाकी 5 मिनिट मधे पूर्ण भरेल.

 2.) एक पाण्याची टाकी एका नळाने भरल्यास 6 तास लागतात व तीच टाकी दुसऱ्या नळाने रिकामी होण्यास 2 तास लागतात. तर दोन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल.

a) 4 तास

b)5 तास

c)6 तास

d)3 तास

उत्तर: d) 3 तास

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात, एक टाकी एका नळाने 6 तासात भरते आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने 2 तासात रिकामी होते. आणि जेव्हा हे दोन्ही नळ त्या टाकीत सुरू केले तेव्हा ती टाकी T या वेळेत रिकामी होईल असे समजू.

खालील सूत्र वापरून आपण तो वेळ काढू

T = (A×B)/(A-B)

T = (6×2)/(6-2)

T = 12/4=3

म्हणून जेव्हा दोन्ही नळ त्या टाकीत सुरू होतील तेव्हा ती टाकी 3 तासात रिकामी होईल.

 3.) एक टाकी A, B, C या नळा द्वारे अनुक्रमे 4,8,16 या तासा मधे भरली जाते किंवा रिकामी होते असे समजा. जर आपण एकाच वेळी A आणि B या नळा द्वारे ती टाकी भरू आणि C या नळा द्वारे ती टाकी रिकामी करू किती तासा मधे भरलेली दिसेल.

a) 2.3 तास

b) 3 तास

c) 3.2 तास

d) 2 तास

उत्तर: c) 3.2 तास

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात, एक टाकी A, B आणि C या नळा द्वारे अनुक्रमे 4,8 आणि 16 तासा मधे भरते. आणि त्याच टाकीमध्ये आपण A एकाच वेळी A आणि B हे नळ भरण्यासाठी वापरले आणि C हा नळ ती टाकी रिकामा करण्यासाठी वापरला तर ती टाकी किती वेळात आपणास भरलेली दिसेल हे काढायचे आहे.

म्हणून आपण खालील सूत्र वापरून तो वेळ T काढू शकतो.

1/T = 1/4 + 1/8 -1/16

1/T = (4+2-1)/16 = 5/16

1/T = 5/16

T = 16/5 =3.2 तास

म्हणून ती टाकी पूर्णतः भरण्यासाठी आपल्याला 3.2 तास लागतील.

 4.) एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासात भरते आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर हे दोन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल.

a) 4 तास

b) 5 तास

c) 2 तास

d) 6 तास

उत्तर: d) 6 तास

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात, एक टाकी एका नळाने 12 तासात भरते आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जेव्हा हे दोन्ही नळ एकाच वेळी त्या टाकीत सुरू केले तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल हे आपणास काढायचे आहे.

तो वेळ आपण T समजू आणि खालील सूत्र वापरू.

T = (A×B)/(A-B)

T = (12×4)/(12-4)

T = 48/8 = 6

अशा प्रकारे ती टाकी दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास 6 तासात रिकामी होईल.

5.) एका नळाने पाण्याची एक टाकीचा 3/5 भाग भरण्यास 18 तास लागतात तर ती टाकी पूर्णतः पाण्याने भरण्यास अजून किती वेळ लागेल.

a)10 तास

b)11 तास

c)13 तास

d)12 तास

उत्तर:d) 12 तास

स्पष्टीकरण :

दिलेल्या उदाहरणात, टाकीचा 3/5 भाग भरण्यास 18 तास लागतात यावरून आपण टाकीचा एक भाग म्हणजेच पूर्ण भाग भरण्यास किती वेळ लागतो हे काढू.

म्हणून,

3/5 भाग = 18 तास

1 भाग = (18×5)/3 = 30 तास

म्हणून टाकीचा पूर्ण एक भाग भरण्यास 30 तास लागतात.

पण इथे दिले आहे की, टाकी च 3/5 भाग 18 तासात भरतो म्हणून उरलेला भाग (30-18)= 12 तासात भरेल.

अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की टाकी पूर्णतः भरण्यास अजून 12 तास वेळ लागेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”