Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

Solve these सरासरी (Average) problems to ace Reasoning part

arup_admin
शेअर करा:WhatsApp
Solve these सरासरी (Average) problems to ace Reasoning part

This is the fifth topic article on Average for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the सरासरी Average topic.

कोणत्याही संख्यांची सरासरी काढण्यासाठी काही सूत्रे आपण वापरू शकतो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने सुध्दा आपण सरासरी करू शकतो.

त्यासाठी खालील काही सूत्रे आपण बघू.

1.) पहिल्या n क्रमवार सम संख्यांची सरासरी = (n + 1)

2.) पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची सरासरी = n

3.) पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी = (n +1)/2

4.) आपणास nth सम संख्या काढायची असेल तर = n×2

5.) आपणास nth विषम संख्या काढायची असेल तर = (n×2)-1

6.) पहिल्या n क्रमवार सम संख्यांची बेरीज = n×(n+1)

7.) पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची बेरीज = n2 = Square of n

8.) पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज = n×(n+1)/2

9.) जर आपणास क्रमवार संख्यापैकी पहिली आणि शेवटची संख्या माहिती असेल तर आपण खालील सूत्र वापरून सरासरी काढू शकतो.

सरासरी = (First term + Last term)/2

आता आपण वरील सूत्रांचा वापर करून खालील उदाहरणे सोडवू.

1.) पहिल्या 77 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

a) 77

b) 40

c) 39

d) 36

उत्तर: c) 39

स्पष्टीकरण :

इथे पहिल्या 77 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे.

नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1,2,3,4,5,… अशी होते.

म्हणून दिलेल्या उदाहरणात पहिली नैसर्गिक संख्या 1 आणि शेवटची नैसर्गिक संख्या 77 आहे.

म्हणून, सरासरी = (1+77)/2 = 78/2=39

किंवा आपणास माहिती आहे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्याचे सूत्र = (n+1)/2 = (77+1)/2 = 78/2 = 39

2.) चार क्रमवार संख्यांची सरासरी 55 असेल तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या कोणती?

a)55

b)56

c)57

d)58

उत्तर:d) 58

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की nth सम संख्या म्हणाजेच 2n.

2n नंतर क्रमाने येणाऱ्या पुढील 3 सम संख्या 2n+2, 2n+4, 2n+6 असतील.

त्यांची सरासरी 55 दिली आहे.

म्हणून,

सरासरी  =(2n+2n+2+2n+4+2n+6)/4

सरासरी = (8n +12)/4 = (2n+3)

55 = 2n +3

2n = 55-3 = 52

n = 26

आता त्या क्रमवार संख्या आपण काढू.

2n = 2*26=52

2n+2= 52+2=54

2n+4 = 54+2=56

2n+6 = 56+2=58

किंवा जर पहिली सम संख्या 52 असेल तर क्रमवार पुढच्या तीन सम संख्या 54,56,58 असतील.

आणि सगळ्यात मोठी सम संख्या इथे 58 आहे.

 3.) पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी किती?

a)50

b)51

c)52

d)49

उत्तर: b) 51

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की, पहिल्या n सम संख्यांची सरासरी = (n + 1)

म्हणून, पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी = (50+1) = 51

4.) पहिल्या 66 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

a)66

b)68

c)65

d)34

उत्तर:d) 34

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की, पहिल्या n क्रमवार संख्यांची सरासरी = (n+1)/2

म्हणून, पहिल्या 66 क्रमवार संख्यांची सरासरी = (66+1)/2 = 68/2 = 34

5.) पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती?

  1. a) 8

b)9

c)7

d)4

उत्तर: a) 8

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे की, पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची सरासरी = n

म्हणून, पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी=8

6.) पहिल्या 6 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती?

a)6

b)7

c)8

d)5

उत्तर: b) 7

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की, पहिल्या n क्रमवार सम संख्यांची सरासरी = (n+1)

म्हणून पहिल्या 6 क्रमवार सम संख्यांची सरासरी = (6+1) = 7

7.) पाचवी सम संख्या कोणती?

a)6

b)10

c)8

d)12

उत्तर: b) 10

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की, nth सम संख्या = 2×n

म्हणून पाचवी सम संख्या = 2×5 = 10

8.) पाचवी विषम संख्या कोणती?

a)7

b)9

c)11

d)13

उत्तर:b) 9

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे की, nth विषम संख्या= [(2×n)-1]

म्हणून, पाचवी विषम संख्या=[(2×5)-1] = 10-1 =9

In case you missed: Previous day Reasoning questions by Seema Mam


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”