पुणे महानगर परिवहन महामंडल मध्ये 600 चालकांची भरती २०२०

PMPML Driver Mega Bharti  2020

PMPML (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd), Pune will be published a new job notification for Driver Posts. The process of appointing Probably 600 Drivers Posts for the new bus arriving at the Pune Mahanagar Parivahan has been finalized. For more details of PMPML Bharti 2020 Read Below.

पीएमपीबाबत सद्यःस्थिती

  1. चालक – २८००
  2. मार्गावरील बस – १५५०
  3. आणखी बस वाढणार – १०० ते १५०
  4. चालकांअभावी बंद राहणाऱ्या बस – १००
  5. भरतीमुळे वाढणाऱ्या फेऱ्या – १०००

पीएमपीच्या ताफ्यात सहा महिन्यांत १२० ई-बस दाखल झाल्या. तत्पूर्वी, २३५ मिडी आणि सीएनजीवरील ४०० बस दाखल झाल्या. परंतु, चालकांची पुरेशी संख्या नसल्याने त्यातील शंभरहून अधिक बस रोज आगारांतच ठेवाव्या लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीने चालकांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार ६९४ चालक पात्र ठरले. त्यांची वजन, उंची आणि शारीरिक चाचणी आदींबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किमान ६०० उमेदवार चालक म्हणून नियुक्त होऊ शकतात. त्यांना एक महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ते पीएमपीच्या सेवेत रुजू होतील. त्यांच्या नियुक्‍त्या पहिल्या टप्प्यात बदली चालक म्हणून असेल, असे प्रशासनाने सांगितले.

राष्ट्रीय निकषांनुसार एका बसमागे सुमारे तीन चालक आवश्‍यक आहेत. उपलब्ध असलेले चालक सकाळ आणि सायंकाळ, अशा दोन शिफ्टमध्ये विभागले आहेत. त्यातही अनेकांच्या रजा, सुट्यांचा आढावा घेतला; तर बस जास्त आणि चालक कमी, असे प्रमाण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे चालक नियुक्तीच्या प्रक्रियेस वेग आला आहे. चालक मिळाल्यास किमान एक हजार फेऱ्या वाढतील. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

नव्या बस ज्या प्रमाणात उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात चालकांच्या नियुक्‍त्या करण्यात येतील. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे. चालकांअभावी बस बंद राहू नये, यासाठी काळजी घेण्यात येईल.

Source: www.esakal.com

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.