MPSC PSI Salary : महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उप निरीक्षक पगार माहिती 2023

MPSC PSI Salary | Maharashtra Police Sub Inspector Salary Details:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उप निरीक्षक पगार माहिती 2023:-

महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस विभागात रिक्त पदे भरली जातात. पोलीस विभागातील वर्ग अ व वर्ग ब (class १, class २) हि पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. वर्ग अ मधील पोलीस उपअधीक्षक (DYSP) व वर्ग ब मधील पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) हि पदे MPSC मार्फत भरली जातात. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) हे व वर्ग ब मधील अराजपत्रित (non gazzeted) पद आहे. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(mpsc) दरवर्षी “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” आयोजित केली जाते. “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” मधून विविध पदे भरली जातात त्यामधील पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) हे एक पद आहे. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) या पदांसाठी “ पोलीस कायदे” हे महत्वाचे असतात. भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (Indian Evidance Act), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, IPC असे विविध कायदे अभ्यासावे लागतात. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) या पदांच्या मुख्य परीक्षेसाठी “कायदा” हा घटक मुख्य होता परंतु २०२३ च्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता “पोलीस कायदे” मुख्य परीक्षेतून हटवले आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांची शारीरिक क्षमता चाचणी( Physical Test) घेऊन ते उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थीची मुलाखत (interview) झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) या पदासाठी नियुक्ती होते. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) पदाचे प्रशिक्षण “महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक” या ठिकाणी होते. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) यांचे नियुक्तीचे व कामकाजाचे ठिकाण “राज्य शासनाच्या पोलीस दलातील कोणत्याही कार्यालयात होते. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) सेवा ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) व त्यावरील पदे पदोन्नती द्वारे मिळवण्याची संधी उपलब्ध असते. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) या पदासाठी १९ ते ३१ वयापर्यंतचे खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थी व ३४ वयापर्यंतचे मागासवर्गीय परीक्षार्थी पात्र असतात. तसेच खेळाडू व माजी सैनिक हे ३६ वयापर्यंत पात्र असतात.

पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) Salary:-

पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) वेतन संरचना (Pay Matrix) पुढीलप्रमाणे आहे. पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) यांचा सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार (salary) S१४:३८,६०० ते १,२२,८०० + महागाई भत्ते + नियमानुसार मिळणारे इतर भत्ते. याप्रमाणे आहे.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT