लिपिक पदासाठी महा भरती २०२०

लिपिक पदासाठी महा भरती

कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक पदाच्या ८१० जागांसाठी होणाऱ्या सरळसेवा भरतीसोबतच महापालिकेतील ८७४ जागांसाठीही अंतर्गत भरती होणार आहे. अंतर्गत भरतीमुळे अटी पूर्ण करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही ‘क्लर्क’ होण्याची संधी चालून आली आहे. पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे तर अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार आहे.

सरळसेवा भरतीसाठी खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात सुमारे एक लाख तर अंतर्गत भरतीसाठी तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दोन्ही भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरळसेवा भरती

  • जागा : ८१०
  • परीक्षा शुल्क
  • खुला प्रवर्ग : ९०० रुपये
  • मागास व इतर मागास प्रवर्ग : ७०० रुपये

पालिकेतील अंतर्गत भरती

  • जागा : ८७४
  • परीक्षा शुल्क
  • खुला प्रवर्ग : ५०० रुपये
  • मागास व इतर मागास प्रवर्ग : ३०० रुपये

Source 01: https://maharashtratimes.indiatimes.com/

Source 02: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.