मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर २२८ डॉक्टरांची भरती २०२०

MCGM Recruitment 2020- उपनगरांतील रुग्णालयांत २२८ डॉक्टरांची भरती

डॉक्टरांची संख्या कमी असल्याने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर ताण येत असल्याची तक्रार नेहमीच केली जाते. त्यावर उपाय म्हणून पालिका उपनगरांतील १६ रुग्णालयांमध्ये २२८ डॉक्टरांची भरती करणार आहे. त्यामुळे उपनगरातील रुग्णांना काहीसा दिलासा मिळेल. ही भरती सहा महिन्यांसाठी असून, त्यानंतर या पदावर डॉक्टरांना कायम केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरांतील १६ रुग्णालयांमध्ये दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात ताण असतानाही रुग्णालयांमधील अनेक रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत व पालिका सभागृहात शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी रिक्त पदे भरण्याची मागणी वारंवार लावून धरली आहे. त्याची दखल घेत पालिकेने उपनगरांतील रुग्णालयांत ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

इच्छुक उमेदवारांनी १७ ते ३१ जानेवारी या कालावधीत आपले अर्ज वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या इमारतीत सातव्या मजल्यावरील कक्षात दाखल करावयाचे आहेत. खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. तसेच, मागास आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ४३पेक्षा जास्त वय असू नये, असे नमूद करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना १५,६०० अधिक ३९,१०० अधिक ग्रेड पे ६ हजार रुपये अधिक भत्ते देण्यात येणार आहेत.

विभाग व पदे

  • -स्त्रीरोग व प्रसूतिगृह शास्त्र: २०
  • -बालरोग चिकित्सा: २९
  • -अस्थिव्यंग: १५
  • -वैद्यक शास्त्र: ४९
  • -शल्यक्रिया शास्त्र: २६
  • -बधिरीकरण: ८९
  • -एकूण: २२८

SOURCE: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.