BARTI 2024 Notification

BARTI ही संस्था समाजातील वंचित बहुजन समाजातील जनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करते. BARTI याचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून या संस्थेची स्थापना २२ डिसेंबर १९७८ रोजी करण्यात आली. BARTI या संस्थेचे मुख्यालय शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात असून भव्य इमारत उपलब्ध करून दिली आहे. BARTI मधे एकूण ७ विभाग कार्यरत असून त्यात लेखा विभाग, प्रशासन विभाग, CBC विभाग, योजना विभाग, विस्तार विभाग, सेवा विभाग, प्रशिक्षण विभाग आणि संशोधन विभाग आहेत. तसेच या वास्तूत सुसज्ज लायब्ररी आणि तत्पर, विनयशील , कार्यक्षम कर्मचारी लाभले आहेत. BARTI या संस्थेचा मुख्य घोष वाक्य सदाचार, सहकार्य, समर्पण असल्याचे दिसून येते. इथे UPSC आणि MPSC करीता खास सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र असल्याचे दिसून येते. त्यामुळे होतकरू आणि हुशार विद्यार्थीना प्रशिक्षण मिळून शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. तसेच IBPS आणि पोलिस भरती स्पर्धा परीक्षा करीता सुध्धा योग्य मोफत  मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि मदत दिली जाते. हे प्रशिक्षण निवासी किंवा अनिवासी स्वरूपाचे सुद्धा असते. पोलिस, मिलिटरी भरती, बँक, रेल्वे, LIC भरती पूर्व प्रशिक्षण व तत्सम स्पर्धा परीक्षा चे प्रशिक्षण दिले जाते. तसेच फक्त शासकीय नोकरी च नव्हे तर व्यवसाय उभारून त्यात भरघोस वाढ कशी करता येईल याचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. येरवडा, येवला तसेच नागपूर इथे सुद्धा barti चे उपकेंद्र आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना M.Phill, PhD करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी BARTI तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधीछात्र वृती देण्यात येते. तसेच BARTI मार्फत येरवडा येथे सफाई कामगार यांच्या मुलांकरिता १ ते १० विची शाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच विभागीय, तालुका आणि जिल्हास्तरवर ऑनलाईन प्रशिक्षण कार्य शाळा सुद्धा घेतल्या जातात. विविध शैक्षणिक आणि नोकरी करीता जात वैधता प्रमाणपत्र ची गरज भासते त्याकरिता प्रतेक जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या असून या सगळ्यांचे  मुख्य समनव्यक च काम हे माननिय महासंचालक बार्टि यांचेकडे देण्यात आले आहे. अशा प्रकारे BARTI मार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि मदत केली जाते. आणि यातून असंख्य विद्यार्थी घडविले जातात जे उच्च पदावर विराजमान होतात. BARTI विषयी संपूर्ण अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही https://barti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊ शकता.

BARTI Scheme for Aspirants preparing Bank, Railway and LIC Exam/ बँक, रेल्वे, LIC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी कडून मोफत प्रशिक्षण योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे आणि LIC इत्यादी क्षेत्रात नोकरी ची संधी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी साठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण दिले जाते. BARTI ची २४ जिल्ह्यामधे एकूण ३० प्रशिक्षण केंद्रे आहेत. ते जिल्हे म्हणजेच अकोला, औरंगाबाद(२), अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली(३), जालना, मुंबई, नागपूर(२), नाशिक(२), उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, नवी मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा, वर्धा आणि वाशिम आहेत.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये १५० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्यात २०% विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी, ३०% जागा महिलांसाठी राखीव, तर ४% जागा ह्या दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव ठेवल्या जातात.

लाभार्थी करीता पात्रता

  • तो उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असून अनुसूचित जाती मधला असावा.
  • उमेदवाराचे वय हे १८ वर्षे ते ३४ वर्षे यामधे असावे.
  • अर्जदार हा किमान बारावी HSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण अटी शर्ती

BARTI मार्फत बँक, रेल्वे, LIC आणि तत्सम स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घ्यायचे झाल्यास आपण खालील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून ते प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल. दिलेल्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास कोणत्याही क्षणी तुम्ही या योजनेतून अपात्र केले जाऊ शकता. त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा असतो.
  • नोंदणी केलेल्या उमेदवारांची चाळणी परीक्षा घेऊन त्यातून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाते.
  • प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांनी रोज ३ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रती महिना ७५% पेक्षा जास्त उपस्थिती असणाऱ्या च विद्यार्थ्यांना ६०००/- रुपये प्रति महिना विद्या वेतन दिले जाते.
  • तसेच प्रशिक्षण पात्र उमेदवारास ५०००/- रुपये चे निःशुल्क अभ्यास साहित्य तसेच पुस्तके यांचा संच BARTI प्रशिक्षण केंद्रामार्फत दिल्या जातो.
  • हे प्रशिक्षण महाराष्ट्र मधील ३० जिल्ह्यांत उपलब्ध करण्यात येते व उमेदवारास सोयीनुसार त्या जिल्ह्याची निवड करू शकतो.
  • ज्या उमेदवाराने अगोदरच BARTI मधून कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतले असेल तर तो विद्यार्थी पुन्हा कोणत्याही प्रशिक्षणास पात्र नसतो.

आवश्यक कागदपत्रे

उपरोक्त प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर आपणास खालील सर्व साक्षांकित प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. त्यासाठी आपण वेळेत ही सर्व कागदपत्रे तयार ठेवणे हे आपले कर्तव्य असेल. एक ही प्रमाणपत्र सादर न केल्यास आपण या योजनेस अपात्र ठरू शकता. त्यासाठी योग्य ती काळजी घेऊन विहित मुदतीत सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

१.) उमेदवाराचा पासपोर्ट साइज फोटो

२.) जातीचे साक्षांकित प्रमाणपत्र (Caste Certificate)

३.) उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण केली असेल तर त्याचे साक्षांकित प्रमाणपत्र

४.) शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)

५.) दिव्यांग उमेदवार असल्यास त्याने ४% पेक्षा जास्त दिव्यांगतवाचा दाखला सादर करणे आवश्यक

६.) विद्यावेतन करीता SBI चे सुरू असलेले खाते असणे अनिवार्य

वरील प्रशिक्षण करीता करावयाचा नमुना अर्ज:

BARTI मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, LIC आणि तत्सम स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घायवयचे असेल तर खाली दिलेला नमुना अर्ज आणि त्यात भरावयाची माहिती आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्या करीता आपण काळजीपूर्वक दिलेला अर्ज भरणे आवश्यक आहे.

  • संपूर्ण नाव(वडील/पती):
  • लिंग(पुरुष/स्त्री):
  • जन्मतारीख:
  • जात:
  • पत्र व्यवहार चा संपूर्ण पत्ता:
  • कायमचा पत्ता:
  • दूरध्वनी/मोबाईल क्रमांक:
  • आधार क्रमांक:
  • ई मेल आयडी:
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण गुण:
  • दिव्यांग व्यक्ती(होय/नाही):
  • रहिवासी दाखला:
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (रू.):
  • ठिकाण:
  • दिनांक:
  • विद्यार्थी स्वाक्षरी:

अशा प्रकारे संकेत स्थळावर दिलेला संपूर्ण अर्ज भरून त्यासोबत वर दिलेली कागदपत्रे जोडून तुमच्या जिल्ह्याच्या प्रशिक्षण केंद्रात हा अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज दाखल केल्यावर तुम्हाला त्या संबंधीची माहिती फोनवर/ईमेल आयडीवर/मेसेज द्वारे/पत्यावर पाठवण्यात येऊ शकते.

अशा प्रकारे आपण जर BARTI मार्फत बँक, रेल्वे, LIC आणि तत्सम स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असल तर नक्कीच या प्रकारे अर्ज करू शकता.

BARTI Scheme for MPSC Aspirants/ बार्टी मार्फत MPSC पूर्व प्रशिक्षण करीता योजना:

BARTI मार्फत दरवर्षी MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिले जाते ते विविध केंद्र स्तरावर दिले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्यसेवा पूर्वपरीक्षा करीता निःशुल्क आणि अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण बार्टी मार्फत दरवर्षी दिले जाते. त्याकिता उमेदवाराने https://barti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन संपूर्ण माहिती बघून त्यानुसार अर्ज करावा. तसेच आम्ही आपणास खाली माहिती दिली आहे त्यानुसार सुद्धा आपण अर्ज करू शकता. ही योजना फक्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या प्रशिक्षण करीता आपणास नागपूर येथे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिले आहे.

या प्रशिक्षण करीता एकूण २०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निवडले जाईल. आणि दोन बॅच मधे या विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले जाईल. एकूण जागांपैकी ३०% जागा ह्या महिलांकरिता राखीव असतील, तर ४% जागा दिव्यांग उमेदवारास आणि ५% जागा अनुसूचित जाती मधील अंतर्गत वंचित जमाती जसे की होलार, बेरड, मातंग, मांग, मदगी अशा विद्यार्थ्याना आरक्षित असतील. तसेच एकूण जागांपैकी ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतात.

लाभार्थी करीता पात्रता:

महारष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी करीता प्रशिक्षण घेण्यासाठी खालील पात्रता सिद्ध करणे गरजेचे आहे. करीता खाली दिलेली पात्रता लाभार्थी ने पूर्ण करावी.

  • इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • उमेदवाराकडे महाराष्ट्र मधील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास दाखला असावा.
  • उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्य सेवेच्या अटी व शर्ती नुसार असावे.
  • सदर उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेली असावी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षी असावा.
  • तो MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा करीता पात्र असावा.
  • उमेदवाराकडे उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाच्या अटी शर्ती:

BARTI मार्फत MPSC आयोग द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा करीता मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेण्यास इच्छुक उमेदवारांनी खालील अटी व शर्ती यांचे पालन करणे गरजेचे आहे.

तसेच निवड यादीमध्ये ८ लाखा पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल.

  • सदर उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.
  • एकूण प्रशिक्षण कालावधी १० महिने असेल.
  • उमेदवारांची निवड चाळणी परीक्षा घेऊन त्यांची निवड यादी प्रसिद्ध केल्या जाते.
  • निवड झालेल्या उमेदवारांना रोज किमान ४ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ प्रशिक्षणास उपस्थित असणे अनिवार्य असेल. तसेच प्रती महिना ८०% पेक्षा जास्त उपस्थिती दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महा ९०००/- रुपये विद्यावेतन दिले जाते.
  • विद्यार्थ्याना ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि विशेष शैक्षणिक साहित्य करीत प्रती विद्यार्थी १५,०००/- रुपये रक्कम देण्यात येईल.
  • उमेदवाराने विहित मुदतीत अर्ज करून संबंधित प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा.

अशा प्रकारे पात्र उमेदवाराने वरील अती व नियमांचे काटेकोर पालन केले तरच तो या योजनेस पात्र केल्या जाईल.

प्रशिक्षण करीता आवश्यक कागदपत्रे

BARTI मार्फत MPSC व अन्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण करीता ही योजना दिली जाते. त्यात पात्र उमेदवाराने वरील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपण लक्षपूर्वक दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी.

१.) उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो

२.) जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

३.) उत्पन्न दाखला (Income Certificate)

४.) अधिवास प्रमाणपत्र

४.) शाळा सोडल्याचा दाखला

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्यात खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

  • पासपोर्ट सायझ फोटो
  • स्वाक्षरी
  • आधार कार्ड
  • बँक अकाऊंट पासबुक
  • Domicile Certificate
  • Caste Certificate
  • Birth Certificate/School Leaving Certificate
  • Degree Marksheet

अशा प्रकारे अर्ज करून संबंधित प्रशिक्षण केंद्र यांच्याशी संपर्क करणे गरजेचे आहे.

BARTI UPSC Free Coaching Scheme/ बार्टी मार्फत UPSC मोफत प्रशिक्षण:

BARTI मार्फत दरवर्षी UPSC परीक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जाते. त्याची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. त्याकरिता विद्यार्थ्याना दिल्ली मधील यशदा  किंवा महाराष्ट्र मधील प्रशिक्षण केंद्र सुद्धा उपलब्ध करून दिले जातात. त्यापैकी आपण येरवडा पुणे येथे दिल्या जाणारे प्रशिक्षण याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. ही योजना फक्त अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्याना असते.

योजनेचे स्वरूप:

  • या प्रशिक्षण करीता अनुसूचित जाती मधील एकूण ७० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
  • बार्टी संकुल, येरवडा, पुणे येथे संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा परीक्षेचे (पूर्व आणि मुख्य) निवासी पूर्व प्रशिक्षण दिले जाते.
  • हा प्रशिक्षण कालावधी १० ते ११ महिन्यांचा असतो.
  • दर महा २५००/- रुपये विद्यावेतन दिले जाते जर उमेदवाराची ७५% उपस्थिती दर महिन्याला असेल तर.

लाभार्थी विद्यार्थी करीता पात्रता

  • सदर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती मधील असावा.
  • उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३७ वर्ष पर्यंत असावे.
  • आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे .
  • जर उमेदवाराने अगोदरच BARTI मार्फत एखादे प्रशिक्षण घेतले असेल तर तो या प्रशिक्षणास अपात्र ठरतो.

आरक्षण:

  • एकूण जागेच्या ३०% जागा ह्या महिलांकरिता राखीव असतील.
  • एकूण जागांच्या ५% जागा ह्या दिव्यांग उमेदवार करीता राखीव असतील.

तसेच उमेदवाराची निवड करण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई, यांच्या कडून एकत्रित सामाईक परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेचे स्वरूप हे खालील प्रमाणे असते.

पेपर १ (सामान्य अध्ययन I): ५० प्रश्न (१०० गुण)

हे प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असून भाषेचे माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असेल.

पेपर १ (सामान्य आध्ययन II): ४० प्रश्न (१०० गुण), वेळ -२ तास, नकारात्मक गुण १/३

मुलाखत: ५० गुण (ऑनलाईन पद्धतीने)

अशा प्रकारे ही परीक्षा एकूण २५० गुणांची असेल. पेपर २ CSAT हा qualifying पेपर आहे. पेपर २ (CSAT) मधे किमान ३३% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

आणि उमेदवारांची अंतिम यादी ही सामान्य अध्ययन I आणि मुलाखतीचे गुण यावर आधारित असेल.

योजनेच्या अटी शर्ती

  • प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना रुजू झाल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी आधारे विद्यावेतन दिली जाते. प्रतेक महिन्याची उपस्थितीत बघूनच हे विद्यावेतन दिले जाते. बायोमेट्रिक करताना विद्यार्थी येताना आणि जाताना दोन्ही वेळेचे thumb impression बघितल्या जाईल. एक वेळचे च thumb impression असेल तर त्या दिवशी ची अनुपस्थिती ग्राह्य धरल्या जाते.
  • विद्यार्थ्याची निवड अंतिम करण्याआधी त्याचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक कागदपत्रे यांची पडताळणी BARTI पुणे मार्फत केल्या जाते.
  • पात्र विद्यार्थ्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रशिक्षण अटी व शर्ती यांचे पालन करण्याचे हमी पत्र द्यावे लागते.
  • सदर उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किवा त्यापेक्षा कमी असावे.
  • हे प्रशिक्षण निवासी प्रशिक्षण असल्याने या दरम्यान नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई आहे.
  • सदर उमेदवारस मधून च प्रशिक्षण सोडायचे असल्यास प्रशिक्षण दरम्यान संस्थेने केलेला खर्च पुन्हा BARTI संस्थेस द्यावा लागतो.

कागदपत्र पडताळणी करीता आवश्यक कागदपत्रे:

उपरोक्त प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास आपल्याकडे खाली दिलेले कागदपत्र असणे गरजेचे आहे.

१.) दहावी प्रमाणपत्र/जन्माचा दाखला (SSC Certificate or Date of Birth Certificate)

२.) पदवी प्रमाणपत्र (Certificate of Graduation)

३.) जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

४.) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

५.) उत्पन्न दाखला (Income Certificate)

६.) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

७.) SIAC-CET २०२२ परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card)

८.) १०० रुपयाचा कोरा स्टॅम्प पेपर

९.) आधार कार्ड/ओळख पत्र/पॅनकार्ड/वाहन चालक परवाना/निवडणूक ओळखपत्र

१०.) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

११.) दिव्यांग करीता ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र

अशा प्रकारे आपणास BARTI मार्फत UPSC चे मोफत प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर वरील प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे व दिलेल्या नियमांचे काटेकोर पने पालन करून अमलबजवणी करणे गरजेचे आहे.

अशाच प्रकारे विविध योजना, मोफत प्रशिक्षण आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षा यांची खोलात जाऊन अधिकृत माहिती करिता तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आम्ही आपणास त्वरित, जलद व अधिकृत माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी खाली दिलेले लिंक आणि channel नक्कीच फॉलो करा.

👉🏻 Telegram Channel: https://telegram.me/mahasarkar


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT